अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पर्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिर्वाद घेताना दिसतो.

दावा केला जात आहे की, जेव्हा रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडत होता, तेव्हा त्यांनी रोहित कडे दुर्लक्ष केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो खरा नसून एडिट केलेला आहे.

काय आहे दावा ?

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “सद्याच्या कर्णधार रोहित शर्मा याला मॅचनंतर सर्वांच्या समोर मोदींच्या पाया पडाव लागतं मात्र मोदी त्याच्याकडे दुर्लक्ष करून जातात.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

डिस्नी प्लस हॉटस्टारवर या अंतिम सामन्याचा संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडून बक्षीस वाटप करण्यात आले होते.

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते प्लेयर ऑफ द टूर्नामेंट विराट कोहली मिळाले. तसेच बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला पदक देण्यात आले.

https://www.hotstar.com/in/sports/cricket/icc-mens-cricket-world-cup-2023/993/replay-final-ind-vs-aus/1540025305/replay/watch?filters=content_type%3Dsport_replay

या बक्षिस वितरनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजेत्या संघाला विश्वचषक देण्यासाठी मंचावर येण्याची विनंती केली गेली. तेव्हा त्यांच्या सोबत बीसीसीआय सचिव जय शाह व इतर अधकाऱ्यासोबत मंचावर येतात.

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, या ठिकाणी रोहित शर्मा किंवा कोणताही खेळाडू नरेंद्र मोदींच्या पाया पडताना दिसत नाही.

खालील मूळ स्रिनशॉर्ट आणि व्हायरल फोटो यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल फोटो बनावट आहे.

पंतप्रधानाची भारतीय संघाशी भेट

अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यावर संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ निराश झाला होता. तेव्हा पंतप्रधानांनी संघाची भेट घेतली आणि त्यांच्या खेळाची प्रशंसा करत खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

https://youtu.be/akyu9pSbArY?si=cZSPHotciggSsa5f

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. मुळात रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडला नव्हता. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडला का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered