अंबादास दानवे यांनी ‘शहीद सैनिक’ औरंगजेबला प्रिय म्हटले आहे होते; मुघल सम्राटाला नाही.

Altered राजकीय | Political

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (उबाठा) अंबादास दानवे यांनी “औरंगजेब आम्हाला प्रिय आहे.”, असे बोलतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दानवे मुघल सम्राटाचे कौतुक करत आहेत.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. अंबादास दानवे मुघल सम्राट औरंगजेबविषयी नाही, तर 2018 मध्ये शहीद झालेला जवान औरंगजेबबद्दल बोलत होते. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अंबादास दानवे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणतात की, “औरंगजेब आम्हाला प्रिय आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेली क्लिप अंबादास दानवेंनी नुकतेच घेतलेल्या पत्रकार परिषदेची आहे.

एबीपी माझाने 16 एप्रिल 2024 रोजी या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला होता.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळाले की, या परिषदेत अंबादास दानवेंना पत्रकारद्वारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी मुघल सम्राट औरंगजेबांच्या कबरी भेट दिल्याबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की, “नेहमी औरंगजेब आणि त्यांच्या कबरीचा मुद्दा काढने योग्य नाही. ते छ. संभाजीनगर मधील एक पर्यटन स्थळ आहे आणि आपल्या पैकी प्रत्येकाने त्या ठिकाणाला एक पर्यटन स्थळ म्हणूनच भेट दिलेली आहे.”

पुढे दानवे सांगतात की, अफसर खान यांनी औरंजेबाच्या कबरीवर जाण्यास हरकत नाही. उद्धव ठाकरेंनी एकदा याच मुद्यावर स्पष्ट भूमिका मांडली होती की, “आम्हाला कश्मिरमध्ये लढलेला औरंगजेब (शहिद जवान) प्रिय आहे. संभाजी महाराजांचा छळ करणारा नाही.”

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.

कोण होते शहीद औरंगजेब? 

ईदच्या सुट्टीनिमित्त घरी परत जात असताना रायफलमॅन औरंगजेबचे 14 जुन 2018 रोजी दहशदवाद्यांनी पुलवामा येथून अपहरण केले होते. काही दिवसांनंतर औरंगजेबचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. 

औरंगजेब दक्षिण काश्मीरमधील 44 बटालियन राष्ट्रीय रायफल्सचा सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर तेरा महिन्यांनी त्याचे दोन्ही भाऊ सैन्यात भरती झाले. त्याचे वडीलही लष्करात होते.

या पूर्वी देखील उद्धव ठाकरेंनी मुघल सम्राट औरंगजेबला शहीद आणि आपला भाऊ म्हटल्याचा दावा करत खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाले होते. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत कळाले की, उद्धव ठाकरे मुघल सम्राट नाही तर शहीद रायफलमॅन औरंगजेबबद्दल बोलत होते.

निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. अंबादास दानवे मुघल सम्राट औरंगजेबविषयी नाही, तर 2018 मध्ये शहीद झालेला जवान औरंगजेबबद्दल बोलत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Avatar

Title:अंबादास दानवे यांनी ‘शहीद सैनिक’ औरंगजेबला प्रिय म्हटले आहे होते; मुघल सम्राटाला नाही.

Written By: Sagar Rawate 

Result: False