व्हेनेझुएलाच्या भूकंपाशी जोडून जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या पोस्टमधून तेथील परिस्थिती दाखवल्याचा दावा केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बहुमजली इमारत काही क्षणांत कोसळताना दिसते. आसपास उपस्थित लोक घाबरून पळताना देखील दिसतात. सोशल मीडियावरील अनेक युजर्स हा व्हिडिओ व्हेनेझुएलातील अलीकडील भूकंपाचा असल्याचा दावा करत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांकावर (9049053770) पाठवून त्याची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली. 

तपासात मात्र हा दावा चुकीचा असल्याचे आढळून आले.

काय आहे दावा?

इमारत कोसळतानाचा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स कॅप्शनमध्ये लिहित आहेत की, “व्हेनेझुएला भूकंप, जवळपास एक ते दीड कोटी लोक बाधित. लाखो लोक मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज.”

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही त्यातील काही महत्त्वाच्या फ्रेम्स वापरून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून हा व्हिडिओ नवीन नसून अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळले. 

फियाझ अली नावाच्या यूट्यूब चॅनलवर 7 फेब्रुवारी 2023 रोजी हाच व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओसोबत ही घटना तुर्कीतील भूकंपाशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

याच घटनेचा आणखी एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये तीच इमारत वेगळ्या कोनातून कोसळताना दिसते. 

दोन्ही व्हिडिओंची तुलना केल्यानंतर त्यामधील वीजेचे खांब, रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेले झाड आणि आसपासचा परिसर एकच असल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘द गार्डियन’च्या यूट्यूब चॅनलवरही हा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्यात दिलेल्या माहितीनुसार, 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या धक्क्यांदरम्यान तुर्कीतील शानलिउर्फा प्रांतातील हलीलिये जिल्ह्यात ही इमारत कोसळली होती.

सीबीएस न्यूयॉर्क, न्यूयॉर्क पोस्ट, द मिरर आणि स्काय न्यूज यांसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी देखील त्याच घटनेचे व्हिडिओ आणि वृत्त प्रसिद्ध केले होते.

मूळ पोस्ट – द गार्डियन

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हेनेझुएलातील भूकंपाशी जोडून शेअर केला जात असलेला व्हिडिओ प्रत्यक्षात व्हेनेझुएलातील नाही. हा व्हिडिओ 2023 मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात कोसळलेल्या इमारतीचा आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाच्या भूकंपाचा म्हणून हा व्हिडिओ शेअर करणे दिशाभूल करणारे आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: व्हेनेझुएलाच्या भूकंपाशी जोडून जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *