मराठा समाजाने असंवैधानिकरित्या ओबीसीचे आरक्षण लुटले; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले का? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

एका क्लिपद्वारे दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाने असंवैधानिक पद्धतीने आरक्षण मिळवले असे म्हटले.

“मागच्या दाराने ओबीसीचे आरक्षण लुटणे हे आपल्याला माण्य आहे का ? आता हेच काम देशातील प्रत्येक राज्यात होईल,” असे ते क्लिपमध्ये बोलतात.

दावा केला जात आहे की, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षण विरोधात बोलत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाबद्दल बोलत नव्हते. ते काँग्रेस सरकारने कर्णाटकमध्ये ओबीसी कोट्यातून मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाबद्दल बोलत होते.

काय आहे दावा ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज संविधान आणि मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजाने संविधानिक मार्गाने कुणबी दाखले मिळवले आहेत तरी केवळ ओबीसी समाजाची बाजू घ्यायची म्हणून पंतप्रधान महोदय सांगतायेत की मागच्या दाराने ओबीसी लुटलं असा आरोप थेट मराठा समाजावर केला जातोय आणि तुम्ही त्यांच्या प्रचार करत फिरत आहात.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह | ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये महाराष्ट्र टाइम्स लोग दिसतो. हा धागा पकडून सर्च केल्यावर कळाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 मे रोजी बीडमध्ये केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. 

नरेंद्र मोदी 32:08 मिनिटापासून पुढे म्हणतात की, “काँग्रसे दलित, आदिवासी, दुर्बल समाजाचे आरक्षण हिसकावून धर्माच्या नावावर आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो की, कर्णाटकमध्ये काँग्रेसची सरकार असून त्या ठिकाणी ओबीसीला 27 टक्के आरक्षण आहे. काँग्रेसने एका रात्रीत एक फतवा काढत निर्णय घेतला की, कर्णाटकमधील सर्व मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण दिले. यांनी ओबीसीच्या आरक्षण लुटले. आरक्षणाचे मूळ लाभार्थ्यांना मिळणारा फायद्याचा मोठा भाग आता मुस्लिमानांना मिळणार.”

पुढे ते व्हायरल व्हिडिओमधील वक्तव्य जनतेला प्रश्न विचारतात की, “अशा प्रकारचा खेळ आपल्याला मान्य आहे का ? मागच्या दाराने ओबीसीचे आरक्षण लुटले जाईल, हे आपल्याला मान्य आहे का ? आता हेच काम ते (काँग्रेस) देशात आणि प्रत्येक राज्यात करू पाहत आहे.”

हे वक्तव्य आपण येथे पाहू शकतात. तसेच संपूर्ण भाषण येथे वाचू शकतात.

एएनआयने मूळ व्हिडिओमधील या वक्तव्यची क्लिप ट्विटरवर शेअर केला आहे.

https://twitter.com/ANI/status/1787830611157103030

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य चुकीच्या दाव्यासह पसरवल जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाच्या विरोधात बोतल नव्हते. मुळात ते काँग्रेस सरकारने कर्णाटकमध्ये ओबीसी कोट्यात मुस्लिमांना दिलेल्या आरक्षण बद्दल बोलत होते. मराठा समाजाशी जोडून खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मराठा समाजाने असंवैधानिकरित्या ओबीसीचे आरक्षण लुटले; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Altered


Leave a Reply