मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही; असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिककार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिककार्ड बनावट आहे. एबीपी माझाने अशी कोणतीही बातमी शेअर केली नाही.

काय आहे दावा ? 

अमित शाह यांचा फोटो आणि एबीपी माझा वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “मराठा आरक्षण मुळे महाराष्टात भाजपा काहीच परिणाम होणार नाहीत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.”

युजर्स हा ग्राफिककार्ड शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, परिणामाला घाम येणार असा सुपडासाफ केला, मराठा ना कमी लेखन हिच मोठी चुक होती.

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल ग्राफिक पाहिल्यावर कळते की, त्यामधील मजकूर प्रमाणित मराठी भाषेत नाही. त्यामध्ये शुद्धलेखणाच्या चुका आहेत. आरक्षण मुळे हा शब्द आरक्षणामुळे असायला हवा. महाराष्टात भाजपा हा शब्द महाराष्ट्रात भाजप असा असायला हवा होता. तसेच नाहीत च्या जागी नाही हा शब्द यायला हवा होता. 

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळले नाही.

या उलट एबीपी माझाच्या वेबसाईटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने एबीपी माझाचे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल ग्राफिकमधील बनावट असून यामधील फॉन्ट एबीपी माझाचा नाही. तसेच अशी कोणतीही बातमी एबीपी माझाने दिलेली नाही.”

वरील ग्राफिक आणि व्हायरल ग्राफिक यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ ग्राफिकार्डला एडिट करून अमित शाहांच्या नावाने पसरवल जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक एडिटेड असून एबीपी माझाने अशी कोणतेही बातमी जाहीर केली नाही. बानावट वक्तव्य अमित शाहांच्या नावाने व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही; असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Altered


Leave a Reply