जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंना अकार्यक्षम म्हटले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक आरोप-प्रत्यारोपाचे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड “86 वर्षांच्या वडिलांना म्हणाव लागत आहे की, माझ्या 50 वर्षांच्या तरुण मुलाल तुम्ही सांभाळून घ्या. ही मागच्या पिढीचे अपयश आहे.” असे म्हणतात. दावा केला जात आहे की, जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना उद्देशून बोलत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात जितेंद्र आव्हाड शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड आबीएन लोकमतशी बोलताना म्हणतात की, “इतिहास कोणी स्वता:च्या हाताने पुढे नेत नाही. तो नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते. खरं करून राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्यान पिढ्या विचारांनी नेला जातो. या ठिकाणी माला दुर्दैवाने दिसत आहे की, वयाच्या 86 वर्षांच्या वडिलांना म्हणाव लागत आहे की, ‘माझ्या 50 वर्षांच्या तरुण मुलाल तुम्ही सांभाळून घ्या.’ ही मागच्या पिढीचे अपयश आहे.”

युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अखेर आव्हाडांनाच सुप्रियाताईंना सुनवावे लागले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्या कळाले की, व्हायरल क्लिपमधील वक्तव्य 11 वर्षांपूर्वी केले होते.

जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या संपूर्ण चर्चेचा व्हिडिओ 19 फेब्रुवारी 2013 रोजी अपलोड केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे भवितव्य काय?”

या चर्चेमध्ये पत्रकार निखील वागळे, तत्कालिन शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला होता. जितेंद्र आव्हाड 9:03 मिनिटापासून म्हणतात की, इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालताना, इतिहास कोणी स्वता:च्या हाताने पुढे नेत नाही. तो नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते. खास करून राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्यान पिढ्या विचारांनी नेला जातो. 

पुढे ते सांगतात की, मला दुर्दैवाने इतकच दिसतय की, “इंजेक्शन देण्यासाठी दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंना तलवार काढावी लागते हे मागच्या पिढीचे अपयश आहे. एका वयामध्ये तरूणांनी आपल्या आपल्या मत्या-पित्यांचा वारसा पुढे नेत असताना आपले संस्कार, ताकत आम्ही आमच्या छातीवर धिरोदत्त पणे याच दर्शन करून द्यायच असत. अस जेव्हा घडत नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना याचका सारखं बोलवं लागतं की, माझ्या मुलांना संभाळा. 86 वर्षांच्या वडिलांना 50 वर्षांच्या तरूणाला तुम्ही सांभाळून घ्या, असे सांगावे लागत असेल तर हे मला महाराष्ट्रच्या दृष्टीने दुर्दैव आहे.”

हे वक्तव्य आपण येथे पाहू शकता.

या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली नाही.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून बाळासाहेबांचा उल्लेख हटविण्यात आला.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. हा व्हिडिओ 2013 सालचा असून यामध्ये जितेंद्र आव्हाड शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होते. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंना अकार्यक्षम म्हटले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Altered


Leave a Reply