
सोशल मीडियावर अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केले जातात. अश्याच एका फोटोमध्ये काही लोक रांगेत उभी आहेत आणि त्यांच्या समोर एक अधिकारी व विदेशी महिला दिसते. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघने (आरएसएस) ब्रिटीश क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी परेडचे आयोजन केले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एडिटेड आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीयसाठी आरएसएसने परेडचे आयोजन केले नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये लिहिले होते की, “जेव्हा पुर्ण देश इंग्रजांविरोधात लढत होता. तेव्हा काही गद्दार इंग्लडच्या राणीला सलामी देत होते.” (भाषांतर)
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, दोन फोटोला एडिट करून एकत्र करत खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटो प्रमाणे रांगेत उभे असलेल्या लोकांचा फोटो मावळ जागरणने आपल्या वेबसाईटवर 2008 मध्ये शेअर केला होता. परंतु, या फोटोमध्ये अधिकारी आणि क्वीन एलिझाबेथ द्वितीय दिसत नाही.
मूळ पोस्ट – मावळ जागरण | आकाईव्ह
व्हायरल पोस्टमधील अधिकारी आणि क्वीन एलिझाबेथ द्वितीयच्या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळले की, हा फोटो 1956 सालचा आहे. जेव्हा क्वीन एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांनी नायजेरियाचा शाही दौरा गेले होते, तेव्हा कडुना विमानतळावर क्वीन एलिझाबेथ यांनी एका रेजिमेंटची पाहणी केली होती. अधिक महिती आपण येथे वाचू शकता.
मूळ पोस्ट – टाउन एंड कंट्री | आर्काइव्ह
खालील तुलनात्म फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन वेगवेगळे फोटो एडिटकरून एकत्र केले गेले आहेत.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो एडिटेड आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी 1956 साली नायजेरियातील दौराचा फोटो आणि आरएसएसच्या परेडचा फोटो एकत्र करून खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:आरएसएसने ब्रिटीश क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी परेडचे आयोजन केले होती का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
