पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. हा व्हिडियो पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील सांगून सामाजिक सौहार्द भंग करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हा व्हिडियो नेमका कुठला आहे याची विचारणा केली. त्यानुसार पडताळणी केली असता, हा व्हिडियो 2017 साली बांग्लादेशातील ढाका […]

Continue Reading

मेरठमधील अंत्ययात्रेतील मुस्लिम खांदेकऱ्यांचा फोटो पुण्यातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कोरोनाकाळात माणुसकीचे दर्शन घडवित काही मुस्लिम तरुणांनी पुण्यातील डॉ. रमाकांत जोशी यांच्या पार्थिवाला खांदा दिला, अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. जोशी यांचा मुलगा अमेरिकेत तर पत्नी वृद्ध. कोरोनाने मृत्यू झाल्याने त्यांचे नातलग खांदेकरी होण्यास तयार नव्हते. तेव्हा तबलिगीचे काम करणारे हे तरुण पुढे सरसावले, असे सोशल मीडियावरील मेसेजमध्ये म्हटलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत […]

Continue Reading

प्रवीण तरडे यांना मारहाण झाली नाही; तो व्हिडियो 2018 मधील बातमीचा, वाचा सत्य

दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांनी संविधानाच्या पुस्तकावर गणपतीची स्थापना केल्यामुळे बराच वाद झाला. त्यानंतर तरडे यांनी जाहीर माफी मागतली व गणपतीच्या मूर्तीखालून संविधानाची प्रत काढली.  आता सोशल मीडिया एका मराठी वाहिन्याच्या बातमीचा व्हिडियो पसरविला जातोय की, प्रवीण तरडे यांना त्यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, हा दोन वर्षांपूर्वीच्या […]

Continue Reading

भुशी डॅमचा म्हणून राजस्थानातील व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

लोणावळा येथील भुशी डॅमचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी असतानाही भुशी डॅमवर एवढे पर्यटक जमलेच कसे, असा प्रश्न त्यामुळे काही जण उपस्थित करत आहेत. काहींनी हा औरंगाबाद येथील हर्सूल तलाव असल्याचा दावा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा लोणावळ्यातील भुशी डॅम किंवा औरंगाबादमधील हर्सूल तलाव आहे का, याची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा व्हिडियो चीनमधील महापूर म्हणून व्हायरल

कोरोना विषाणुचे उगमस्थान म्हणून चीनबाबत लोकांमध्ये रोष वाढलेला आहे. चीनमध्ये जून महिन्यापासून जोरदार पावसामुळे महापूराने थैमान घातलेले आहे. चीनमधील या पुराचे रौद्ररुप म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. निसर्गाने चीनला चांगलाच धडा शिकवला, असे नेटीझन्स म्हणत आहेत. मात्र, सत्य वेगळेच आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी केलेल्या विनंतीनुसार तथ्य पडताळणी केल्यावर समोर आले की, व्हायरल […]

Continue Reading

मेट्रोचा पुल कोसळल्याची ही छायाचित्रे मुंबई, पुण्यातील आहेत का? वाचा सत्य

पुण्यातील विमाननगर चौक, पिंपरीतील फिनोलेक्स चौक, मुंबईतील लोअर परळ,  गुजरातमधील अहमदाबाद येथे मेट्रोचा पुल कोसळल्याची म्हणून सध्या समाजमाध्यमात काही छायाचित्रे व्हायरल होत आहे. यापैकी कोणत्या शहरात अशी काही घटना घडली आहे का? ही छायाचित्रे नेमकी कुठली आहेत, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पुण्यातील विमाननगर चौकातील मेट्रोचा पुल कोसळल्याचे म्हणून […]

Continue Reading

‘सिरम’ने फेटाळला 73 दिवसात लस उपलब्ध करणार असल्याचा दावा; वाचा सत्य

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 73 दिवसात कोरोनाची लस उपलब्ध करणार असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सिरम इन्स्टिट्यूटची ही लस 73 दिवसात उपलब्ध होणार आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोनाची लस 73 दिवसात उपलब्ध होणार आहे का, याचा […]

Continue Reading

ही बनावट काजू तयार करण्याची मशीन नाही; वाचा या व्हिडियोमागील सत्य

बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ ही गंभीर समस्या आहे. सणोत्सवाच्या काळात तर हे गैरप्रकार अधिक वाढतात. बनावट काजू तयार करण्याची मशीन म्हणून एक व्हिडियो सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, व्हिडियोसोबत केला जाणारा दावा खोटा आहे. काय आहे व्हिडियोमध्ये? व्हायरल क्लिपमध्ये मशीनद्वारे काजूच्या आकाराचे पदार्थ बाहेर […]

Continue Reading

बुरखा घालून पाकिस्तानी झेंडा फडकावताना भाजप कार्यकर्त्याला पकडल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

बुरखा घातलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडल्याचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असून, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी त्याने बुरखा घालून पाकिस्तानी झेंड फडकावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय हे पोस्टमध्ये? 44 सेकंदाच्या व्हिडियो क्लिपमध्ये एका […]

Continue Reading

सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदललेले नाही; वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाचे “सत्यमेव जयते” हे ब्रीदवाक्य बदलण्यात आले, असा दावा केला जात आहे. त्याजागी “यतो धर्मस्ततो जयः” असे नवे ब्रीदवाक्य लिहिण्यात आल्याचे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केल्यावर कळाले की, हा दावा खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आधीपासून “यतो धर्मस्ततो जयः” हेच ब्रीदवाक्य राहिलेले आहे. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित […]

Continue Reading

कोरोना काळात या मूर्तींचे विलगीकरण करण्यात आलेले नाही; वाचा सत्य

कोरोना काळात काही मूर्तींचे विलगीकरण करण्यात आले, अशा दाव्यासह एक छायाचित्र व्हायरल होत आहे. देवानांही कोरोनाची बाधा झाल्याचे याद्वारे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा फोटो गेल्यावर्षीचा असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  हे छायाचित्र कोरोना काळातील किंवा कोरोनाशी संबंधित आहे का, याचा शोध घेतला. […]

Continue Reading

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा म्हणून फेक ट्रेलर व्हायरल; वाचा सत्य

‘सडक 2’ सिनेमाच्या ट्रेलरवर डिसलाईक्सचा वर्षाव केल्यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलआर्मीचा रोख आता शाहरुख खानच्या आगामी सिनेमाकडे वळला आहे. सोशल मीडियावर वावड्या उठल्या आहेत की, शाहरुखच्या ‘पठाण’ नावाच्या एका कथित सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर रिलीज झाला आहे. त्याला डिसलाईक करण्याचे आवाहन केले जात आहे. याद्वारे धार्मिक विद्वेषपूर्ण टिप्पणीदेखील केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केल्यावर […]

Continue Reading

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आल्याची फेक न्यूज व्हायरल; वाचा सत्य

राष्ट्रपती भवानील प्रसिद्ध मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आल्याचे मेसेज आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात म्हटले जात आहे की, मुघल गार्डनला आता माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे नाव देण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता ही फेक न्यूज असल्याचे कळाले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । […]

Continue Reading

जगन्नाथ मंदिरातील महामारीच्या काळात बाहेर काढण्यात आलेला हा शालीग्राम आहे का? वाचा सत्य

जगन्नाथ पुरी येथील शालीग्राम आहे. पृथ्वीवर महामारी आल्यास बाहेर दर्शनासाठी काढला जातो. 1920 साली काढला होता. आता 2020 चालु वर्षी काढला आहे. दर्शन दुर्मिळ आहे, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे आणि व्हिडिओ पसरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी पृथ्वीवर महामारी आल्यास जगन्नाथ पुरी येथील शालीग्राम […]

Continue Reading

बहरीनच्या राजाचा अंगरक्षक रोबोट आहे का? वाचा सत्य

बहरीनचा राजा रोबोट अंगरक्षकासह दुबईत पोहचल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा रोबोट गोळीबार करण्यापासून बॉम्ब निकामी करण्यापर्यंतची सर्व कामे अतिशय वेगवान पध्दतीने करतो, असे यासोबत असलेल्या माहितीत म्हटले आहे. हा व्हिडिओ खरोखरच बहारीनच्या राजाचा रोबोट अंगरक्षकाचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  […]

Continue Reading

सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याची घटना जुनी; वाचा सत्य

गुजरातमधील सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्यास खरोखरच काही समाजघटकांना रोखण्यात आले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाण्यास काही समाजघटकांना बंदी घातली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी […]

Continue Reading

भगतसिंग यांना चाबकाने फटके मारतानाचा हा फोटो नाही; वाचा त्या फोटोचे सत्य

शहीद भगतसिंग यांना इंग्रज अधिकारी चाबकाने फटके मारतानाचा फोटो म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. खांबाला बांधलेल्या एका शीख तरुणाला इंग्रज पोलिस मारताना यामध्ये दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता हा भगतसिंग यांचा फोटो नसल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप चॅटबॉट हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) वाचकाने पुढील फोटो पाठवला. हाच फोटो […]

Continue Reading

शाळेतील शिक्षिकेला भेटतानाचा हा व्हिडिओ सुंदर पिचाईंचा नाही; वाचा सत्य

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई त्यांची शाळेतील शिक्षिका मौली अब्राहम यांना 27 वर्षांनंतर त्याच्या घरी जाऊन भेटतात तेव्हा, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात सुंदर पिचाई यांचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुंदर पिचाई यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  गुगलचे मुख्य कार्यकारी […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली आहे, अशी माहिती असलेले एक वृत्तपत्राचे कात्रण समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरोखरच त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली आहे, […]

Continue Reading

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना नावाची योजना आणली आहे का? वाचा सत्य

शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली असून या योजनेनुसार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार असल्याची माहिती समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी खरोखरच अशी काही योजना आणली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे का, […]

Continue Reading

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र बनावट; वाचा सत्य

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. […]

Continue Reading

अमेरिकेतील रूग्णालयाचे छायाचित्र अयोध्येतील नियोजित बाबरी रूग्णालयाचा वास्तूकला आराखडा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी 5 एकर जमीन दिली आहे. या जागेवर केवळ मशीद बांधली जाणार नसून रुग्णालयही उभारण्यात येणार, असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. या नियोजित रूग्णालयाचा वास्तूकला आराखडा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र या नियोजित रूग्णालयाचे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक पोस्ट […]

Continue Reading

अमित शहा यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे का? वाचा सत्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आल्याचे सत्य आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी दैनिक […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये गटारात बुडालेल्या मुलाला वाचविण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबईला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. रस्त्यावर तर आहेच; परंतु, घरातही पाणी साचले आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणीखाली बुडालेल्या एका गटारातून मुलाला वाचवितानाचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील मोहम्मद अली रोडी येथे घडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कराची, पाकिस्तान येथील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

कोविडची लस घेणारी ही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी नाही; वाचा ती कोण आहे…

रशियाने कोरोना व्हायरसवर लस शोधून काढल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. सोबतच त्यांच्या स्वतःच्या मुलीलासुद्धा ही लस दिल्याची त्यांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर एका मुलीला लस देतानाचे फोटो व्हायरल होऊ लागले. हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा नसल्याचे […]

Continue Reading

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देश कोरोनोमुक्त झाल्याने मंदिरास भेट दिली का? वाचा सत्य

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर तेथील एका मंदिरात भेट दिल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने जेसिंडा ऑर्डन यांनी मंदिराला भेट दिली का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी मंदिराला […]

Continue Reading

फिरून केळी विकणाऱ्याची फळे जप्त केल्याचा ओडिशातील व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

फिरून केळी विकणाऱ्याची फळे पोलीस जप्त करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. फळे जप्त करणारे हे महाराष्ट्र पोलीस असल्याचा दावाही काही जण करत आहेत. फळे जप्त करणारे हे खरोखर महाराष्ट्र पोलीस आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी फिरून केळी विकणाऱ्याची फळे पोलीस जप्त […]

Continue Reading

तुकाराम मुंढेंचा जुना व्हिडिओ व्हायरल, मास्क वापरणे बंधनकारक; वाचा सत्य

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नाकातोंडावर मास्क लावण्याची अजिबात गरज नाही म्हणून सांगतायेत, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकांचे यावर काय मत आहे? असा प्रश्नही यावर अनेक जण उपस्थित करत आहेत. तुकाराम मुंढेंच्या या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  https://archive.org/details/tukaram-munde-old-video-before-lockdown फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

आयपीएस विनय तिवारी यांना डेप्युटेशनवर सीबीआयमध्ये पाठविल्याच्या बातम्या फेक; वाचा सत्य

सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी बिहारहून आलेल्या आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केले होते. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी केंद्राने मान्य केली. आता दावा केला जात आहे की, विनय तिवारी यांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तापस करणाऱ्या सीबीआय टीममध्ये डेप्युशनद्वारे सामील करून घेण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी […]

Continue Reading

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भूमिपूजनच्या दिवशी रामाच्या मूर्तीचा जलाभिषेक केला का? वाचा सत्य

आयोध्येमध्ये 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानंतर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीसुद्धा त्यादिवशी राम मूर्तीचा जलाभिषेक केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हे फोटो जुने असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी सर्वप्रथम सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून […]

Continue Reading

पेट्रोल पंपावर आग लागल्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडियो राजस्थानमधील आहे; महाराष्ट्रातील नाही

पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरताना आग लागल्याचा एक व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावांनी शेयर केला जात आहे. कोणी हा व्हिडियो औरंगाबादजवळील किनगाव येथील म्हणतेय तर कोणी भोकर, अहमदनगर, जळगाव, नेवासा येथील पेट्रोल पंपावर घडलेली घटना म्हणून दावा करीत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा व्हिडियो राजस्थानमधील असल्याचे समोर आले […]

Continue Reading

चीनमधील खड्डेमय रस्त्याचा व्हिडियो नगर-मनमाड रोड म्हणून व्हायरल; वाचा सत्य

खड्डेमय रस्ते तसे भारतासाठी नवे नाहीत. परंतु, अशाच एका रस्त्याचा व्हिडियो नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्याच्या मधोमध पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये वेगवान वाहने आदळत असल्याचा हा 30 सेकदांचा व्हिडियो नगर-मनमाड रोडवरील आहे, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो चीनमधील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे […]

Continue Reading

हरियाणात कामचुकार आमदाराला जनतेने चोप दिला का? पाहा ‘त्या’ व्हिडियो मागील सत्य

हरियाणामध्ये एका कामचुकार आमदाराला जनतेने मारहाण केली, अशा दाव्यासह एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार-पाच जण दोघांना बेदम मारहाण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडियो आमदाराला मारहाण केल्याचा नाही. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी सदरील व्हिडियोतली की-फ्रेम्स […]

Continue Reading

फुटबॉल मैदानाचे हे छायाचित्र मणिपूरमधील नाही तर रशियातील; वाचा सत्य

मणिपूरमधील अप्रतिम फुटबॉल मैदानाचे म्हणून सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरोखरच मणिपूर या राज्यातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी मणिपूरमधील फुटबॉलच्या मैदानाचे हे अप्रतिम छायाचित्र आहे का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज शोधले. त्यावेळी हे छायाचित्र 2016 पासून इंटरनेटवर […]

Continue Reading

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

माजी सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाली, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. राम मंदिरासंदर्भात निर्णय देणाऱ्या गोगोई यांना भूमीपूजनाच्या दिवशीच कोरोना झाला, असादेखील अनेकांनी प्रचार केला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । […]

Continue Reading

चेन्नईतील स्केटिंगचा जुना व्हिडिओ मुंबईतील मुलाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबईत चहा विकणारा जमाल मलिक अवघ्या सहा, सात वर्षाचा असून आज त्याने जे केले ते अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे होते. असा जबरदस्त आणि खतरनाक स्टंट तुम्ही कधीच पाहिला नसेल. त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, अशा माहितीसह समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतीलच जमाल मलिक नावाच्या मुलाचा आहे […]

Continue Reading

राजीव गांधी यांचा हा फोटो राम मंदिराच्या भूमीपूजन करतानाचा नाही. वाचा सत्य

आयोध्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, 9 नोव्हेंबर 1989 रोजी राजीव गांधी यांच्या हस्ते राम मंदिराची शिलान्यास व भूमीपूजन कार्यक्रमाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा फोटो राम मंदिराच्या […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या नव्या बोईंग 777 विमानाचे म्हणून असंबंधित फोटो व्हायरल; वाचा सत्य

पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना प्रवासासाठी दोन नवे अत्याधुनिक बोईंग 777 विमानाची खरेदी करण्यात येणार आहेत. या विमानाच्या आलिशान अंतर्गत सजावटीचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सदरील फोटो पंतप्रधानांसाठी प्रस्तावित असलेल्या विमानाचे नसल्याचे समोर आले.  काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट । संग्रहित तथ्य पडताळणी  पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले […]

Continue Reading

महाराष्ट्र सरकारने ई-पास रद्द केलेला नाही; वाचा सत्य

महाराष्ट्र शासनाने ई-पास रद्द केला असून, जिल्ह्यात प्रवेश करताना केवळ तुमचे तापमान तपासले जाईल, असा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता कळाले की, ई-पास रद्द करण्यात आलेला नाही. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी दैनिक लोकसत्ताने 4 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले की, गणेशोत्सवात कोकणात एसटीने […]

Continue Reading

कोरोनाच्या नावाखाली एका डॉक्टरने 125 रुग्णांची किडनीसाठी हत्या केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

दिल्लीत एका डॉक्टरने 125 जणांना बळजबरी कोविड-19 पॉझिटिव्ह दाखवून हत्या केली आणि त्यांची किडनी चोरली, अशी बातमी व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कळाले की, त्याने रुग्णांचे मृतदेह मगरीला खाऊ घातले, असाही व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फॅक्ट […]

Continue Reading

हत्तीने सोंडेत सिंहाच्या बछड्याला पकडल्याचा तो व्हायरल फोटो खोटा आहे. वाचा सत्य

एका हत्तीने सोंडेत सिंहाचा बछडा घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. जमीन तापलेली असल्यामुळे सिंहाच्या बछड्याला चालताना त्रास होत होता. हे पाहून हत्तीने त्याला सोंडेत धरले आणि  पाणवठ्याकडे नेले, असा दावा या फोटोविषयी केला जात आहे. या क्षणाचे टिपलेले हे छायाचित्र या शतकातील सर्वोत्कृष्ट फोटो मानला जातो, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची […]

Continue Reading

कणेरी मठ येथील सिद्धेश्वर वस्तूसंग्रहालयाचा व्हिडिओ कर्नाटकातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कर्नाटकमध्ये किंवा कोलकाता येथे एका कुंभार कारागिराने मूर्तीचे गाव बनविले आहे. या मूर्त्यात फक्त जीव टाकण्याचे बाकी राहिले आहे, असा व्हिडीओसुद्धा बघण्याचे भाग्य नशिबात असावे लागते. सलाम या कारागिराला, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ नेमका कोणत्या गावातील आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबूक पोस्ट / […]

Continue Reading

‘डॉक्टर आयेशा’ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त फसवे; वाचा सत्य

कोरोना व्हायरसची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची प्रकरणं दररोज आपण ऐकत आहोत. मात्र हा फोटो पाहा. हा शेवटचा फोटो आहे डॉक्टर आयशाचा. अत्यंत अॅक्टिव्ह अशी आयशा आताच डॉक्टर झाली होती. त्यामुळे अर्थातच ती खूप खुश होती. मात्र त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र ती कोरोनाला […]

Continue Reading

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हैदराबादमधील मंदिराचा; वाचा सत्य

अयोध्या येथे राम मंदिराचा भूमीपूजन समारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. तत्पूर्वी समाजमाध्यमात अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / संग्रहित तथ्य पडताळणी राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप […]

Continue Reading

ब्राझीलच्या विमानामध्ये हवेत इंधन भरण्याचा जुना व्हिडियो राफेलच्या नावे व्हायरल; वाचा सत्य

भारताच्या हवाई दलात नुकतेच 5 राफेल युद्धविमानांचे आगमन झाले. फ्रान्स येथून उड्डाण भरल्यानंतर भारताच्या अंबाल विमानतळावर या विमानांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, प्रवासामध्ये या विमानांत 30 हजार फुटांवर हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले होते. या प्रसंगाचा व्हिडियो म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही क्लिप राफेल विमानांची नसल्याचे समोर आले. काय […]

Continue Reading