Fact : असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील सभेनंतर नृत्य करुन दाखवलं का?

एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची शुक्रवारी एक सभा पार पडली. ओवैसी हे त्यांच्या आक्रमक भाषणामुळे नेहमीच चर्चेत राहतात. परंतु, औरंगाबाद (Aurangabad) येथे पार पडलेल्या सभेवेळी ओवैसी यांनी डान्स करुन नव्या चर्चांला उधाण आलं आहे. दरम्यान, ओवैसी यांचा अनोखा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यचकीत केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, […]

Continue Reading

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी झाडे तोडण्यात आली का?

पुण्यात मोदींच्या प्रचारसभेसाठी झाडे तोडण्यात आली. सभा काही तासांची, पण वर्षानुवर्षे उभी असलेल्या झाडांचा काही वेळात फडश्या पाडण्यात आला, अशी माहिती Being Hindu या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी पुण्यात नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेसाठी झाडे तोडण्यात आली का? याबाबत वृत्तपत्रात बातम्या […]

Continue Reading

‘त्या’ जुन्या वादग्रस्त व्हिडियोतील माजी आमदाराला भाजपने उमेदवारी दिली का? वाचा सत्य

एका माजी आमदाराने पोलिसांना अत्यंत अर्वाच्य भाषेतून शिवी दिल्याचा व्हिडियो समोर आला आहे. दावा केला जात आहे की, या आमदाराला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 25 वर्षे आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांनी भरसभेत पोलिसांना शिवी दिल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. […]

Continue Reading

अंतराळवीरांवर पवित्र पाणी शिंपडण्याचा व्हिडियो रशियातील आहे. अमेरिकेच्या नासामधील नाही. वाचा सत्य

पहिल्या राफेल विमानाला सेवेत दाखल करण्यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाच्या चकाखाली लिंबू ठेवले आणि टीकेची एकच झोड उठली. अंधाश्रद्धा की परंपरा असा यावरून वाद सुरू झाला. जगभरात केले जाणाऱ्या धार्मिक रितीरिवाजांचे दाखले देण्यात येऊ लागले. (उदा. जहाजाला प्रथम पाण्यात उतरविताना शॅम्पेनची बॉटल फोडणे). एवढेच नाही तर नासासुद्धा अंतराळवीरांना अवकाशात झेपवण्यापूर्वी ख्रिस्ती धर्मानुसार […]

Continue Reading

Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

गुजरातमधील भाजप नेते अजय राजपूत यांनी शाळेत शिरुन एका महिला शिक्षिकेसोबत काय करत आहेत, हे आपण स्वत: पाहा आणि जगालाही दाखवा, असे म्हणत Shubham Waghchaure Patil यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  भाजप नेते अजय राजपूत यांचा हा व्हिडिओ असल्याचे अनेक जण […]

Continue Reading

ऑक्सफर्ड विद्यापीठाने मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप सुरू केली आहे का? वाचा सत्य

शिक्षणाची पंढरी म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ऑक्सफर्डला पाचवे स्थान मिळाले आहे. अशा या ऐतिहासिक विद्यापीठाने माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ्ज डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. आठशे वर्षांचा देदिप्यमान इतिहास असणाऱ्या या विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्य विद्वत्तेला ओळखून हा निर्णय घेतला […]

Continue Reading

Fact Check : या व्हिडिओसोबत पसरविण्यात येणारी माहिती किती सत्य?

जय महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वी PMC बँक बंद झाली. परंतु या बँकेमध्ये असणारे फक्त पंजाबी खाते धारकांना बँक मागच्या दरवाजाने आत घेऊन त्याचे पैसे परत देत आहे आणि आपली मराठी व इतर लोकांना/जनतेला फक्त 10000 हजार रु देत आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये मुलुंडच्या भाजप चा आमदार सरदार तारासिंग व त्यांच्या मुलगा आहे, अशी माहिती संदिप […]

Continue Reading

सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी विद्यमान सरकारला कंटाळून राजीनामा दिला होता का?

गेल्या दोन महिन्यांत चार सनदी अधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारची धोरणे आणि हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामे दिले आहेत. दादर-नगर हवेली येथील कन्नन गोपीनाथन यांनी सरकारच्या काश्मीर धोरणाला विरोध करीत वयाच्या 33 व्या वर्षी राजीनामा दिला. सुभाष चंद्र गर्ग यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली केल्यामुळे निवृत्तीच्या दोन वर्षे आधीच राजीनामा दिला. कर्नाटकातील एस. शशिकांत सेंठिल यांनी लोकशाहीची गळचेपी होत […]

Continue Reading

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढारी-एबीपी माझाचे जुने सर्वेक्षण केले जातेय शेयर. वाचा सत्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. दिवाळीच्या आत राज्यातील निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होऊन, रणकंदन सुरू होईल. आपल्या पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलेला आहे. वृत्तवाहिन्यासुद्धा गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहेत.  अशाच एक जनमत चाचणीमध्ये विद्यमान भाजप-शिवसेनेच्या सरकारवर राज्यातील 61 […]

Continue Reading

Fact Check : जागृती नगर येथे NSG ने मॉक ड्रील घेतली होती

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई असल्याचा इशारा गुप्तचरांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई हायअलर्टवर आहे. रविवारी NSG चे कमांडो मुंबईत दाखल झाले. मुंबईतील अतिसंवेदनशील भागाची आणि महत्त्वाच्या संस्थांची पाहणी NSG ने केली. नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असं आवाहनही मुंबई पोलिसांनी केलं आहे, अशी माहिती देणारी पोस्ट Mumbai Live – Marathi या पेजवर आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण दिले आहे का?

आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने नुकताच क्रांतीकारी निर्णय जाहीर केला आहे. आंध्र प्रदेशमधील भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारने खासगी कंपन्यांमध्ये 75 टक्के नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने एक विधेयकदेखील आणले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही असाच कायदा आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णायाबाबत […]

Continue Reading

Fact Check : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2014 पासून 2019 पर्यंत 20 कोटी जण गरीब झाले?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात 2004 ते 2014 या कालावधीत 27 कोटी जण गरिबीतून बाहेर पडले. 2014 ते 2019 या कालावधीत 20 कोटी जण गरीब झाले, अशी एक पोस्ट Alhad Patil यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी संयुक्त राष्ट्रसंघाने खरंच असा काय अहवाल दिलाय का? याचा […]

Continue Reading

Fact Check : तरबेजच्या वडिलांचीही मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती का?

झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी यांचाही मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झाला होता, अशी माहिती असलेले एका वृत्तपत्राचे कात्रण Satish Vengurlekar यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तरबेजच्या वडिलांचे खरंच मॉब लिचिंग झाले होते का? याची तथ्य पडताळणी केली होती.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी […]

Continue Reading

साप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य

पावसाळ्यात सापांचा उघड्यावरील वावर वाढतो. या काळात ग्रामीण भागात सर्पदर्शन होणे सामान्य बाब असते. सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाणही ग्रामीण भागात अधिक आहे. तसेच वन्यप्राण्यांचाही धोका असतो. असा प्रसंग ओढावला तर शासनाकडे मदत मिळत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, साप, विंचु, वाघ आणि अस्वत ई. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा […]

Continue Reading

Fact check : ही व्यक्ती बलात्काराचा आरोप झालेला RSS नेता आहे का?

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धमकी देत बलात्कार करणाऱ्या RSS च्या दोन वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याची पोस्ट Quazi Ameenuddin यांनी शेअर केली आहे. ही मुळ पोस्ट Politics in India या पेजवरील आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती आणि छायाचित्र सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  भाजपच्या महिला […]

Continue Reading

Fact Check : अमित शाह म्हणाले का, नेहरू देशाच्या दुर्दशेसाठी जबाबदार

नेहरू इस देशकी दुर्दशाके जिम्मेदार-अमित शाह हमें नेहरूके सपनोंका भारत बनाना है-नरेंद्र मोदी ठीक है,आपसमें तय करलो की करना क्या है! अशी एक पोस्ट रफीक शेख यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अमित शाह यांनी असे वक्तव्य केले आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  नेहरू इस देशकी दुर्दशाके जिम्मेदार, […]

Continue Reading

अमिताभ यांनी 40 वर्षांपासून काम करणाऱ्या नोकराला नाही तर, त्यांच्या सेक्रेटरीला खांदा दिला

हिंदी सिनेमाचे महानायक म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या माणुसकीची सध्या खूप प्रशंसा केली जात आहे. त्यांच्याकडे 40 वर्षे काम केलेल्या नोकराच्या पार्थिवाला अमिताभ आणि अभिषेक यांनी खांदा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. सोबत खांदा दिल्याचा फोटोदेखील दिलेला आहे. इतकी वर्षे इमानेइतबारे काम करणाऱ्या नोकराप्रति अमिताभ यांची अशी कृतज्ञता नेटीझन्सला प्रचंड भावली. परंतु, […]

Continue Reading

Fact Check : ISRO मध्ये आरक्षण नाही या म्हणण्यात किती तथ्य?

भारत जगात तीन बाबतीत पुढं आहे आर्मी..क्रिकेट आणि इस्रो. विषेश म्हणजे तिन्हीत आरक्षण नाही अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‎Pramod Parab‎ यांनी ही पोस्ट एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा ऍड होइल त्याने १०० ऍड करावे  या ग्रुपवर शेअर केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  लष्कर, क्रिकेट आणि […]

Continue Reading

Fact Check : आझम खान यांनी मुस्लीम कुराणानुसार चालणार असं म्हटलंय का?

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मुस्लीम कुराणानुसार चालणार असे वक्तव्य केल्याची एक पोस्ट Ajay Dongre यांनी १ करोड राजसाहेब समर्थकांचा फेसबुक ग्रुप- १ॲड झाल्यास त्याने १०समर्थक ॲड करा या ग्रुपवर शेअर केली आहे. ही मूळ पोस्ट Alok Mani Tripathi यांची आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कुराणाबद्दल काही वक्तव्य […]

Continue Reading

Fact Check : राहुल गांधी यांचे राहुल गांधी हे नाव खोटे आहे का?

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे खरे नाव “राउल विन्सी” आहे. राहुल गांधी हे फेक नाव आहे, असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Dhamankar Naka Mitra Mandal ने ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी राहुल गांधी यांच्या […]

Continue Reading

Fact Check : pubg खेळल्यामुळे बेळगावमधील युवक मानसिकदृष्टया अस्वस्थ झालाय का?

जास्त PUBG खेळल्याचा Effect.!  म्हणून सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणावर पब जी खेळल्याने मानसिक परिणाम झाला असून तो रस्त्यावर पबजी खेळत आहे, असा अप्रत्यक्ष दावा या पोस्टद्वारे करण्यात आला आहे. He Bagh Bhau – हे बघ भाऊ या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ 82 हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. एक हजार […]

Continue Reading

Fact Check : पंतप्रधान मोदींच्या छायाचित्राद्वारे करण्यात येत असलेला दावा किती सत्य?

शाळेत न गेल्यामुळे सावधान-विषराम मधला फरक मा. पंतप्रधानाला समजला नाही. म्हणून मुलांना संघाच्या शाखेत नाही तर शाळेत पाठवा पुढे चालून पं प्र झाला तर जगात आपल्या देशाची फोतरी होणार नाही, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य पडताळणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो नेमका […]

Continue Reading

भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्यांच्या दोन बनावट पदव्या आहेत का?

लोकसभा 2019 निवडणूकीनंतर नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाली. त्यानंतर एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये भारताचे नवीन शिक्षणमंत्री यांच्याकडे दोन बनावट पदव्या आहेत असे म्हणण्यात आले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. सत्य पडताळणी फेसबुक । अर्काइव्ह सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्याचे श्रीलंकेतील बनावट विद्यापीठातील दोन बनानट […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : पाकिस्तानात तोडफोड झालेल्या वास्तूचे नाव काय?

पाकिस्तानातील एका ऐतिहासिक गुरु नानक महालाचा काही भाग समाजकंटकांनी पाडल्याचा आल्याचा दावा समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तोडफोड झालेल्या वास्तूचे नाव गुरु नानक महाल आहे या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी पाकिस्तानात अशी काय घटना घडली आहे का? पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे का? याची पडताळणी आम्ही डॉन या […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : शीला दीक्षित म्हणाल्या का, मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते?

मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते आहेत, असे वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी केल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी शीला दीक्षित यांनी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते आहेत, असे वक्तव्य केले […]

Continue Reading

FACT CHECK: लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला का?

लंडनमधील न्यायालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन नाकारल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रांनी दिली. 26 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळत वेस्टमिंस्टर कोर्टाने नीरव मोदीला 24 मेपर्यंत कोठडी दिली, असे बातमीत म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. मूळ बातमी येथे वाचा – दिव्य मराठी । अर्काइव्ह सोशल मीडियावरदेखील ही […]

Continue Reading

FACT CHECK – फडणवीस सरकार निकम्मं आहे : उद्धव ठाकरे

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमध्ये फडणवीस सरकार निकम्मं आहे, असे म्हटले आहे. राज्याला वेगळा गृहमंत्री हवा आहे असे लिहिले आहे. सोबतच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नावही लिहिलेले आहे. फेसबुक । अर्काईव्ह पोस्टमध्ये फडणवीस सरकार निकम्मं आहे, महाराष्ट्रात बिहारपेक्षा वाईट परिस्थिती, राज्याला स्वतंत्र्य गृहमंत्री हवा आहे :  उद्धव ठाकरे असे लिहिलेले आहे. सोबतच एबीपी माझा […]

Continue Reading

भारतीय तुरुंगातून मसूद अझहरला भाजपने सोडले का ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंच्या बाबतीत मसूद अझहरला भाजपने भारतीय तुरुंगातून सोडवले असा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने यासंदर्भात केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये तीन फोटो दाखविण्यात आले असून, पहिल्या फोटोमध्ये भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मसूद अझहर याला घेवून जातानाचा […]

Continue Reading

राहुल गांधी लोकांचे मनोरंजन करतात का? : सत्य पडताळणी

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. फेसबुक । अर्काईव्ह हा व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता. फेसबुक । अर्काईव्ह कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पोस्टमध्ये व्हिडिओमध्ये काही स्थानिक कलाकारांसोबत हातामध्ये छोटी डफ घेवून, डफच्या तालावर ठेका धरुन नृत्य करत […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : दिग्विजय सिंह म्हणाले, नक्षलवाद्यांनी काँग्रेसला साथ द्यावी

भाजपला हरविण्यासाठी नक्षलवाद्यांनी काँग्रेसला साथ द्यावी, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केल्याचे वृत्त एक वृत्तपत्राचे कात्रण सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी दिग्विजय सिंह यांनी कधी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते का? याची पडताळणी करताना आम्हाला सर्वप्रथम दैनिक जागरणने दिलेले एक वृत्त […]

Continue Reading

रवी पार्थसारथी लंडनमध्ये 91 हजार कोटी घेवून पळून गेला का?

सध्या सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रवी पार्थसारथी हे 91 हजार कोटी रुपये घेवून लंडनला पळून गेला असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने या पोस्टसंदर्भात केलेली सत्य पडताळणी फेसबुक । अर्काईव्ह पोस्टमध्ये रवी पार्थसारथी यांचा फोटो देण्यात आलेला असून, त्या फोटोसोबत नरेंद्र मोदीजी का एक और वफादार रवि पार्थसारथी […]

Continue Reading

पार्थ पवार यांनी मित्राच्या कारची तोडफोड केल्याची ही बातमी कधीची?

सोशल मीडियावर पार्थ पवार यांच्या बाबतीत एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने मित्राची कार फोडली असा दावा करण्यात आला आहे. फेसबुकवर विनायक आंबेडकर या नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट व्हायरल झाली आहे. फेसबुक । अर्काईव्ह फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने मित्राची कार फोडली अशी बातमी दिली आहे. त्या बातमीची तारीख मुंबई, 30 […]

Continue Reading

सत्य पडताळणी : उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, हिंदू धर्म सगळ्यात हिंसक बनू लागला आहे?

काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर उर्मिला मातोंडकर यांनी हिंदू धर्म सगळ्यात हिंसक बनू लागला आहे, असे वक्तव्य केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी उर्मिला मातोंडकर यांनी खरेच असे वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेतला असता इंडिया टूडेच्या ट्विटर अकाउंटवर आम्हाला खालील व्हिडिओ […]

Continue Reading

सत्य पडताळणी : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास घटनेत बदल, पंकजा मुंडेंचे वक्तव्य?

बाबासाहेब भीमराव अम्बेडकर ने संविधान लिखा. अगर बीजेपी दोबारा सत्ता में आई तो हम संविधान बदल देंगे असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वक्तव्याची तथ्य पडताळणी केली आहे. World of Dr.babasaheb ambedkar या पेजवर या पोस्ट 3 हजार 900 शेअर आहेत. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी पंकजा मुंडे […]

Continue Reading

मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य न करता मराठा समाजाची फसवणूक महाराष्ट्रातील भाजप – महायुतीने केली आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने या पोस्टची सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला फेसबुकवर जागर शिवधर्माचा 518 लाईक्स, 321 शेअर आणि 60 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर […]

Continue Reading

सत्य पडताळणी : साक्षी महाराज, उमा भारती, मोदींनी केली होती का ही वक्तव्ये

“2019 से पहले राममंदिर नही बना तो राजनीति छोड दूँगा, 2018 से पहले गंगा नहीं साफ हुई तो हम जल समाधि ले लेंगें, 100 दिनों मे अगर काला धन नहीं आया तो मैं फांसी पर चढ जाऊंगा, काला धन आया तो यूं ही सब ते खाते में 15-20 लाख आ जाएगा” अशी साक्षी महाराज, उमा […]

Continue Reading

मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या का ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत असे म्हणण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट नाना महाराष्ट्राचा लढवय्या शेतकरी नेता या पेजवरुन व्हायरल झाले आहे. या पोस्टला 157 शेअर्स, 2 हजार 800 लाईक्स आणि 284 कमेंटस् मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह   सत्य […]

Continue Reading

काँग्रेसचा जाहीरनामा केवळ मुस्लिमांसाठीच आहे का? जाणून घ्या सत्य

काँग्रसने मंगळवारी (2 एप्रिल) लोकसभा 2019 निवडणुकीचा जाहीरनामा घोषित केला. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, काँग्रेसने मुस्लिम समाजाला लाभदायक अशा अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुस्लिम तरुणांना सरकारी कंत्राटांमध्ये विशेष संधी, विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि इमामांना मासिक मानधन अशा घोषणांचा समावेश आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा – […]

Continue Reading

सत्य पडताळणी : भाजप खासदार संजय धोत्रेचे शेतकऱ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य?

संजय धोत्रे यांचे शेतकऱ्यांविषयीचे अवमानकारक वक्तव्य शेतकऱ्यांना शेती झेपत नसेल तर त्यांनी जीव द्यावा, अशी पोस्ट Dilip Mohod यांच्या पेजवरुन सध्या व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी खासदार संजय धोत्रे यांनी असे वक्तव्य केलं आहे का, याची माहिती घेण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला thenewsminute.com या […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः अक्षय कुमारने शहिदांसाठी दीड दिवसांत 7 कोटी रुपये जमविले का?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना देशभरातून भरभरून आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये अनेक सेलिब्रेटींनीदेखील स्वतः पुढे होऊन लोकांना देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. याबाबतीत सिनेअभिनेता अक्षय कुमार नेहमीच आघाडीवर असतो. पुलवामा हल्ल्यानंतरही त्याने शहिदांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अक्षयच्या दानशूरपणाची प्रचिती देणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर […]

Continue Reading

सत्य पडताळणी : कॅन्सर, ह्दयविकारासारख्या 10 आजारापासून रम पिल्याने बचाव?

रम पिण्याचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रम फक्त दारु नसून औषध आहे. रम पिल्याने माणसाला केवळ नशा होत नसून आरोग्यासही फायदा होतो, असा दावा insortmarathi.com या संकेतस्थळाने केला आहे. आक्राईव्ह लिंक सोशल मीडियावरही याबाबत विविध माहिती पसरविण्यात येत आहे. https://www.facebook.com/hindutvainfomedia/posts/1510640629069337 आक्राईव्ह लिंक – फेसबुक अपनी खबरे डॉट कॉम या हिंदी संकेतस्थळावरही अशाच स्वरुपाचा […]

Continue Reading

भाजपच्या बड्या लोकप्रतिनिधीच्या कामक्रीडेचे फोटो व्हायरल : सत्य पडताळणी

कथन सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की भाजपचा एक लोकप्रतिनिधी एका महिलेसोबत कामक्रीडा करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी .. Facebook | अर्काइव्ह ही बातमी काही वृत्तपत्र आणि वेबसाईटवर दिसून आले आहे. वृत्तपत्रांमधील बातमी येथे वाचू शकता.प्रहार–अर्काइव्ह | महाबातमी–अर्काइव्ह | जनशक्ती–अर्काइव्ह […]

Continue Reading

शिवरायांच्या जिरेटोपाची खरंच वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे का?

भन्नाट रे या संकेतस्थळावर “छत्रपती शिवरायांच्या 15 फुटांच्या जिरेटोपाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!” अशी बातमी आहे. या बातमीची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे. ही बातमी येथे सविस्तर वाचा भन्नाट रे | अर्काइव्ह स्टार मराठी नावाच्या फेसबुक पेजवरून 18 फेब्रुवारीला ही बातमी शेयर करण्यात आलेली आहे. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 30 वेळा शेयर आणि 644 जणांनी लाईक […]

Continue Reading

हे पाच पदार्थ भारतीय खातात आवडीने पण विदेशात आहे बंदी; सत्य की असत्य

भारत हा खवय्यांचा देश आहे, असे म्हटले जाते. काही प्रमाणात हे सत्यही आहे. वैविध्यता हे भारताचं वैशिष्टय आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतही हे लागू होते. भारतात काही खाद्यपदार्थ मात्र कमालीचे लोकप्रिय असून ते सर्रासपणे भारतीय आवडीने खात असतात. अशाच काही पदार्थावर परदेशात बंदी असल्याचा दावा स्टारमराठी. डॉट इन या संकेतस्थळाने केला आहे. यातील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

मेंदूला एखादी सवय लागण्यास लागतात 21 दिवस, सत्य की असत्य

एखादी सवय लावण्याच्या बाबतीत आपला मेंदू 21 दिवस घेतो, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेला आहे. एखादी सवय मोडायची असेल तरी हाच नियम लागू पडतो. हा नियम माहिती नसल्याने अनेकांचे खूप नुकसान होत असते. koshtee.com या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा koshtee.com | आक्राईव्ह लिंक फेसबुकवरील आमचं काही चुकलं […]

Continue Reading

साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात पानाचा रस टाकल्यास वाचतो जीव; सत्य की असत्य

भारतात छोटया मोठया मिळून सापाच्या जवळपास 550 प्रजाती आहेत. यातील केवळ 10 प्रजाती अतिविषारी आहेत. या विषाने कोणाचाही जीव जाऊ शकतो. अन्य प्रजाती इतक्या विषारी नसतात. अनेकांचा जीव हा साप चावल्याच्या भीतीने जात असतो. साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात   काही पानांचा रस टाकल्यास जीव वाचतो असे इनसॉरट मराठी या संकेतस्थळाने म्हटले आहे. याबाबतचे सविस्तर […]

Continue Reading

शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून पंतप्रधानांच्या हस्ते हसत हसत रेल्वेचे उद्घाटन; सत्य की असत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात जलद ट्रेन समजल्या जाणार्‍या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हसत हसत हे उद्घाटन केले आणि अधिका-यांशी हसत हसत गप्पा मारल्या, असे वृत्त दैनिक नवाकाळने दिले आहे. दैनिक नवाकाळचे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. दैनिक नवाकाळ / आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी या […]

Continue Reading

काय देशभक्ती गीते वाजविल्याने झाली दंगल?

सुरक्षित आणि शांत वातावरणात मानवाला रहायला आवडते. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण कधी कधी एखाद्या छोट्या कारणाचे मोठे स्वरूप होते आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते. कथन भारतात  २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दोन राष्ट्रीय सण साजरे केले जातात. अशा सणांच्या निमित्ताने देशभक्तीपर गीते लावण्यात येतात. त्यामुळे वातावरण सर्व देशभक्तीपर होवून जाते. मध्य प्रदेशांत […]

Continue Reading

तथ्य पडताळणी: राहुल गांधींची सभा सुरू असताना बाजूलाच वाटली जात होती बिअर

भोपाळमधील जंबूरी मैदानावर 8 फेब्रवारी रोजी काँग्रेसने आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर जिल्हा काँग्रेस कमिटीने एक तंबू उभारला होता. याठिकाणी येणाऱ्या बसमधील लोकांना थांबवून बिअर वाटली जात होती. या बसेस कार्यक्रमासाठीच येत होत्या. अशी बातमी प्रसारमाध्यमांकडून चालविण्यात येत […]

Continue Reading