रात्रीच्या वेळी महिलांना घरी सोडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘मोफत राईड योजना’ सूरू केली नाही; वाचा सत्य

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी घरी सोडण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली आहे, या दाव्यासह एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, या पोस्टरमधील माहिती भ्रमक आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणताही योजना सुरू केली नाही. काय आहे दावा […]

Continue Reading

अमेरिकेत 21 तोफांची सलामी दिले जाणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते आहेत का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींच्या स्वागताला 21 तोफांची सलामी देऊन देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच जागतिक नेत्याला 21 तोफांची सलामी देण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

‘गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही’; दिग्विजय सिंह यांचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते गाईला माता मानण्याविषयी आक्षेप घेत म्हणतात की, “गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्थवट आहे. दिग्विजय सिंह सावरकरांच्या पुस्तकात काय लिहिले ते सांगते होते. काय […]

Continue Reading

कर्नाटकमध्ये भाजप नेताच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीl काँग्रेसने 135 भागांवर विजय मिळवला तर भाजपला 66 जागावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी 10 मे 2023 रोजी कर्नाटकमधील विजापूर जिल्हातील मसाबिनल गावात लोकांनी एक कार अडवून ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की,“कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या वाहनामध्ये ईव्हीएम सापडल्याने संतप्त मतदारांकडून यंत्रणांची तोडफोड करण्यात आली.”  फॅक्ट […]

Continue Reading

पाणी गळतीमुळे छत्री धरलेल्या रेल्वेचालकचा व्हायरल फोटो वंदे भारत ट्रेनचा नाही; वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर रेल्वेत छत्री धरून बसलेल्या रेल्वेचालकाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधानांनी उद्धाटन केलेल्या वंदे भारत ट्रेनचे छत गळू लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सात वर्षांपूर्वीचा झारखंडमधील […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली असे मेसेज व्हायरल होत आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागवू शकतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी दिवाळीला हातात फटाके फोडले का? चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

IAS टॉपर आणि सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी हातात फटाके फोडतानाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिवाऴीत हातातच रॉकेट पेटवत असताना त्यांना पोळले. या व्हिडिओला खरे मानून जबाबदार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याने हातात फाटाके फोडले म्हणून यूजर्स टीना डाबी यांच्यावर टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

केजरीवाल यांच्या रॅलीत मोदींचा मुखवटा घालून प्रचार करणाऱ्या समर्थकाचा व्हिडिओ गुजरातचा नाही; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सोशल मीडियावर भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगत आहे.  याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये अरविंद केजारीवाल यांच्या रॅलीत त्यांचे समर्थक नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून प्रचार करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

सांगलीमध्ये कथित ‘बच्चा चोर’ साधूंवरील हल्ल्याचा म्हणून मध्य प्रदेशमधील व्हिडिओ व्हायरल

सांगली जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली. यानंतर 14 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर साधूंना मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.  अशाच एका व्हिडिओमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्या काही जणांना काठ्यांनी मारले जात आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सांगली […]

Continue Reading

बुलेटप्रुफ कारची चाचणी करणारे ते मर्सिडज बेंझ कंपनीचे सीईओ नाहीत; वाचा काय आहे सत्य

कारवर एके-47 बंदुकीने गोळीबार करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मर्सिडज बेंझ कंपनीच्या सीईओने स्वतः बुलेटप्रुफ कारमध्ये बसून गाडीची चाचणी केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, बुलेटप्रुफ कारची चाचणी घेणारे मर्सिडिज बेंझचे सीईओ नव्हते.  काय आहे […]

Continue Reading

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या डॉक्टरचा व्हिडिओ मुंबईचा नाही; वाचा सत्य

एका हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेली महिला डॉक्टर जमिनीवर कोसळल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना नुकतीच मुंबईतील विनायक हॉस्पिटलमध्ये घडली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता यांचाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

निव्वळ फेकाफेकीः गुगल हॅक केले म्हणून बिहारच्या तरुणाला 3.66 कोटींची जॉब ऑफर?

बिहारच्या एका मुलाने ‘गुगलचे इंजिन’च हॅक केले आणि ही गोष्ट जेव्हा गुगल कंपनीला कळाली तेव्हा त्यांनी या हॅकर मुलाला 3.66 कोटी रुपये पगाराची नोकरी दिली, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतुराज चौधरी नावाच्या मुलाने ही कीमया केली, असा दावा केला जात आहे. मराठी वर्तमानपत्रांनीसुद्धा याची बातमी प्रसिद्ध केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या […]

Continue Reading

‘या’ फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी IAS आरती डोगरा यांच्या पाया पडले नव्हते; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी कमी उंची असलेल्या एका महिलेला झुकून प्रणाम केला. या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या फोटोसोबत आता दावा केला जात आहे की, पंतप्रधानांनी ज्या महिलेच्या पाया पडले त्या आयएएस अधिकारी आरती डोगरा होत्या. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]

Continue Reading

तिरुपती बालाजी मंदिराच्या ट्रस्टीच्या घरातून मिळालेल्या सोन्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

तिरुपती बालाजी देवस्थानाच्या एका विश्वस्ताच्या घरातून 128 किलो सोनं आणि 150 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली, अशा दाव्यासह टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरील विश्वस्ताच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली असता एवढी मोठी अवैध संपत्ती सापडली, असे व्हायरल मेसेज म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावे जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले असून, मोठ्या संख्येने शेतकरी ‘चलो दिल्ली’चा नारा देत आंदोलनासाठी राजधानीत येत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू न देण्यासठी प्रशासनाने पोलिस व इतर सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या.  दरम्यान, तणाव वाढल्यामुळे पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. सोशल […]

Continue Reading

फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय? वाचा त्यामागचे सत्य

फ्रान्समध्ये सध्या धार्मिक तेढ व संतापाचे वातावरण आहे. अशातच सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, तेथील सरकारने सम्राट अशोक यांच्या सन्मानार्थ फ्रान्समध्ये अशोक स्तंभाची उभारणी केली आहे. या कथित स्मारकाची काही छायाचित्रेसुद्धा व्हायरल होत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि त्यासोबत करण्यात येणारा दावा आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठविला आणि त्यांची पडताळणी करण्याची […]

Continue Reading

मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा अनेक जण समाजमाध्यमात करत आहेत. हा दावा खरा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी मास्क आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या दाव्याविषयी शोध […]

Continue Reading

मेक्सिकोतील या नेत्याने संसदेतच कपडे का काढले होते? वाचा सत्य

कोरोनामुळे जगभरातील देशांमध्ये आर्थिक संकट कोसळले आहे. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. जनतेच्या अशा बिकट परिस्थितीची सरकारला कथितरीत्या आठवण करून दिल्याबद्दल मेक्सिकोच्या एका नेत्याची सध्या सगळीकडे वाहवा होत आहे. मेक्सिकोचे राजकीय नेते अँटोनियो कोनेयो यांनी सरकारचा भ्रष्टाचार आणि तसेच जनतेकडे दुर्लक्ष करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेतेच कपडे काढून निषेध व्यक्त केला, असा दावा केला जात आहे.  […]

Continue Reading

हेमंत करकरे यांच्या पत्नीचे 2014 सालीच निधन झाले; ती बातमी आताची म्हणून नव्याने व्हायरल

मुंबईमध्ये झालेल्या 26/11 दहशदवादी हल्ल्यामध्ये प्राणांची आहुती देणारे हेमंत करकरे यांची पत्नी कविता यांचे गेल्या रविवारी (4 ऑक्टोबर) निधन झाल्याचे मेसेज सध्या फिरत आहेत. संपूर्ण मीडिया राजकारण आणि खेळांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना या बातमीला महत्त्व द्यावेसे वाटले नाही, अशीदेखील टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हायरल मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पडताळणीसाठी पाठवला. […]

Continue Reading

हरियाणात अलिकडे झालेल्या आंदोलनाच्या नावे तीन वर्षांपूर्वीचे फोटो व्हायरल; वाचा सत्य

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांविरोधात हरियाणातील शेतकऱ्यांनी कुरूक्षेत्रजवळ पिपली येथे 10 सप्टेंबर 2020 रोजी आंदोलन केले. या आंदोलनाची विविध छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत.  यातील एका छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता कळाले, ते तीन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनाचे आहे. काय आहे दावा? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  पोस्टमधील दोन्ही छायाचित्रांनी गुगल […]

Continue Reading

सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याची घटना जुनी; वाचा सत्य

गुजरातमधील सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्यास खरोखरच काही समाजघटकांना रोखण्यात आले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाण्यास काही समाजघटकांना बंदी घातली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या नव्या बोईंग 777 विमानाचे म्हणून असंबंधित फोटो व्हायरल; वाचा सत्य

पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना प्रवासासाठी दोन नवे अत्याधुनिक बोईंग 777 विमानाची खरेदी करण्यात येणार आहेत. या विमानाच्या आलिशान अंतर्गत सजावटीचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सदरील फोटो पंतप्रधानांसाठी प्रस्तावित असलेल्या विमानाचे नसल्याचे समोर आले.  काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट । संग्रहित तथ्य पडताळणी  पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले […]

Continue Reading

लष्काराने गलवान खोऱ्यात 72 तासांत बांधलेल्या पुलाचे हे फोटो नाहीत. वाचा सत्य

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजीत संघर्ष झाला. त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले तर, चीनचेसुद्धा सैनिक मारले गेले. अशा परिस्थितही भारतीय लष्कराने न डगमगता केवळ 72 तासांत गलवान खोऱ्यातील नदीवर 60 मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले. ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक युजर्सने गलवान नदीवरील या लष्करी पुलाचे म्हणून […]

Continue Reading

भगतसिंग यांच्या बहिणीच्या निधनाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

शहीद भगतसिंग यांच्या भगिनी प्रकाश कौर यांचे आज (2 जून) निधन झाले, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशातील एकाही राजकीय नेत्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही अशी तक्रार नेटकरी करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी सहा वर्षे जुनी असल्याचे आढळली.  फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग यांच्या भगिनी […]

Continue Reading

उत्पादनावरील बारकोड 890 पासून सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट ‘मेड इन इंडिया’ असते का? वाचा सत्य

पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारताचा’ मंत्र दिल्यानंतर सोशल मीडियावर स्वदेशी उत्पादनेच खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. कोणते उत्पादन स्वदेशी म्हणजेच ‘मेड इन इंडिया’ हे ओळखण्याची युक्ती एका व्हायरल मेसेजमध्ये सांगितली जात आहे.  उत्पादनावरील बारकोड क्रमांक जर 890 ने सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट स्वदेशी असते, असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी […]

Continue Reading

गुगल मॅपवरुन LOC काढून टाकण्यात आली आहे का? वाचा सत्य

भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (LOC) न दाखविलेला गुगलवरील नकाशा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या नकाशासोबत दावा करण्यात येत आहे की, गुगल मॅपने नियंत्रण रेषा (LOC) पुसली. गुगलने खरोखरच त्यांच्या नकाशावरुन नियंत्रण रेषा पुसली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक | फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी भारताच्या नकाशातून गुगलने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा खरोखरच […]

Continue Reading

रतन टाटा यांनी मराठमोळ्या मुलाच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी खरेदी केली का? वाचा सत्य

नवउद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या रतन टाटा यांनी नुकतेच एका मराठमोळ्या तरुणाच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली. अर्जुन देशपांडे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या जेनेरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली. परंतु, यानंतर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, रतन टाटा यांनी जेनरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली.  फॅक्ट […]

Continue Reading

CoronaVirus: हात धुण्यासाठी तुरटीचा वापर सॅनिटायझरपेक्षा प्रभावशाली आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. हात धुण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स किंवा साबणाचा पर्याय WHO ने सुचविला आहे. परंतु, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हात धुण्यासाठी सॅनिटायझरपेक्षा तुरटी जास्त प्रभावशाली आहे. तुरटीच्या मुळे कोणताही विषाणू अंगावर राहत नसल्याचे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडो या […]

Continue Reading

डीन कुन्ट्झ या लेखकाने 40 वर्षांपूर्वीच कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती का? वाचा सत्य

प्रतिभावान लेखक काळाची पाऊले ओळखून लिखाण करीत असतात. कथा-कादंबऱ्यांमध्ये इतिहास आणि वर्तमानाच्या घडामोडींवरून भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधत असतात. मग सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत जर एका लेखकाने 40 वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते असे सांगितले तर? सोशल मीडियावर असाच दावा केला जात आहे. व्हायरल पोस्टनुसार, डीन कुन्ट्झ या लेखकाने 1981 साली प्रकाशित केलेल्या […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस विकतात का? वाचा सत्य

ब्राम्हण हे ऑस्ट्रेलियात गायी आणि बैलाचे मांस विकतात व खातात, असा दावा करत हेमंत बागल यांनी एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायी आणि बैलाचे मांस विकतात का, या माहितीची तथ्य प़डताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर […]

Continue Reading

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मशिदीस भेट दिल्याचा जुना व्हिडिओ खोटा दाव्यासह व्हायरल

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मशिदीला भेट दिली आणि सध्या संकटात असलेल्या देशासाठी दुआ मागण्याची मुस्लिमांना विनंती केली. आम्हाला तुमची मदत हवी आहे, असे ते म्हणाल्याच्या माहिती सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच मशिदीला भेट दिल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading

राहुल गांधी यांचे अर्धवट वक्तव्य समाजमाध्यमात व्हायरल, वाचा सत्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील युवक केवळ हिंदूस्थानलाच नाही तर देशालाही बदलू शकतात, असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची बुध्दीमत्ता पाहा, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी खरोखर असे वक्तव्य केले होते का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading

Fact : विदर्भातील म्हणून चीनमधील वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

धानोरा येथील शेतकरी संतोष खामनकर यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यांना वाघाने ठार केल्याचा म्हणून एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. पिकविमा साक्षरता चळवळ आणि राजु ढोले यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नक्की धानोरा येथील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / […]

Continue Reading

राजकारणात येण्यापेक्षा माझ्या मुलांनी भीक मागितलेली आवडेल, असे सोनिया गांधी कधी म्हणाल्या होत्या?

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांचे एक रंजक वक्तव्य सोशल मीडियावर पसरत आहे. एका जुन्या बातमीच्या कात्रणामध्ये सोनिया गांधी यांनी त्यांच्या मुलांनी राजकारणात येण्यापेक्षा भीक मागितली तरी आवडेल असे म्हटल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, सोनिया गांधी यांनी 1999 साली असे वक्तव्य केले होते. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर […]

Continue Reading

Fact : आसाम, बंगालमधील म्हणून देशाच्या इतर भागातील जुन्या घटनांचे फोटो व्हायरल

समाजमाध्यमात सध्या ईशान्य भारतातील म्हणून काही छायाचित्रे पसरत आहेत. ईशान्य भारतातील स्थिती भयावह असून तेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात येत असल्याचा दावा या छायाचित्रांद्वारे करण्यात येतो. ही छायाचित्रे खरोखरच ईशान्य भारतात सुरु असणाऱ्या हिंसाचाराची आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. जयसिंग मोहन यांनीही अशीच काही छायाचित्रे पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची […]

Continue Reading

Fact : देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे हे दृश्य नेमके कधीचे?

महाराष्ट्रातून देवभूमी अशी ओळख असणाऱ्या उत्तराखंड या राज्यातील केदारनाथ मंदिरात दरवर्षी लाखो भाविक जात असतात. समाजमाध्यमात सध्या केदारनाथ येथे मोठी बर्फवृष्टी होत असून तेथील मंदिर बर्फाखाली असल्याची माहिती देणारा एक व्हिडिओ पसरत आहे. कोल्हापूर श्री महालक्ष्मी टूडे दर्शन, जयेश काळे, अनुशा बारापात्रे आणि मंगल मेंहदळे आदींनीही असाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामुळे काही जण चिंतीत […]

Continue Reading

Fact : नागपूर पोलिसांच्या उपक्रमाचा चुकीचा क्रमांक व्हायरल

हैदराबादमधील युवतीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्यानंतर देशभर या घटनेची चर्चा होत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर पोलिसांनी याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी मोफत परिवहन योजना सुरु केली आहे. जर एखादी महिला एकटी असेल आणि तिला रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसेल तर ती […]

Continue Reading

Fact Check : चीनमध्ये बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या बाळाला अवघ्या काही मिनिटात बाहेर काढण्यात आलं का?

चीन किती प्रगती आहे. ३०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला काही मिनिटात बाहेर काढले. आपण बसतो २४ तास मोठे खोदकाम करत असा दावा शांभवी कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी चीनमध्ये बोअरवेलमध्ये […]

Continue Reading

यमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बाब आहे. दिल्लीतील यमुना नदीचे प्रदूषण देखील नेहमीच चर्चेत असते. दिल्लीतील यमुना नदीच्या सध्याच्या प्रदूषणाचे म्हणून काही फोटो समाजमाध्यमात फिरत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स नदीतील फेसामध्ये पूजा करीत असलेल्या महिलांचे फोटो शेयर करीत आहेत. सोबत लिहिले की, ‘दिल्लीचे गँस चेंबर बनलेय आणि नदीची हालत तर दिसतेयच….नदी या फेसाळलेल्या विषारी […]

Continue Reading

Fact Check: मुंबईतील ताज हॉटेलमधील प्रदुषणमुक्त दिवाळीचा हा VIDEO आहे का?

मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. रिना भट्टा यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली असेल तर त्याचे मराठी माध्यमांनी नक्कीच वृत्त […]

Continue Reading