अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

अयोध्येत सपाटीकरण करताना काही दिवसांपूर्वी काही अवशेष सापडले. त्यानंतर अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे म्हणून समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र अयोध्येत सापडलेल्या शिवलिंगाचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी अयोध्येत खरोखरच शिवलिंग सापडले का? याचा शोध घेतला. त्यावेळी बीबीसी मराठीने 24 मे 2020 रोजी […]

Continue Reading

नरेंद्र मोदी हे जागतिक आरोग्य संघटनेचे नवे अध्यक्ष नाहीत; वाचा सत्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षस्थानी पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान आरुढ झाले असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद खरोखरच भारतीय पंतप्रधानांना मिळाले आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे का? हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळास भेट […]

Continue Reading

राज्यपाल कोश्यारी यांनी लॉकडाऊन दरम्यान मॉडेलला मदत केल्याची बातमी फेक. वाचा सत्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करीत एका मॉडेलला लष्कराच्या हेलीकॉप्टर आणि वाहनातून डेहराडूनला पोहचविल्याची बातमी मध्यंतरी पसरली होती. काही मीडिया वेबसाईट्सने ही बातमी चालवली होती. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले.  काय आहे पोस्टमध्ये? न्यूज उत्तराखंड या वेबसाईटवरील एका बातमीचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये शेयर करण्यात आला आहे. कोश्यारी यांनी […]

Continue Reading

उत्तराखंडमधील वणव्याचे म्हणून जुने आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये वणवा पेटलेला आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे वनसंपदा आणि प्राणीमात्रांची हानी झाली आहे. या वणव्याचे फोटो म्हणून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, यातील अनेक फोटो जुने आणि बाहेर देशातील असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच मजुर बनवून भेटीचा बनाव केला का? वाचा सत्य

कोरोनामुळे रोजगार बुडालेले लाखो मजूर आपापल्या राज्यात परतत आहेत. अशाच काही स्थलांरित मजुरांची राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये भेट घेतली होती. फुटपाथवर बसून त्यांनी मजुरांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतल्या. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राहुल यांनी मजुर म्हणून ज्यांची भेट घेतली ते काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्यांना मजुरांच्या वेशात बसवून गांधी […]

Continue Reading

संघाच्या कार्यकर्त्यांचा हा व्हिडियो औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयातील नाही. वाचा सत्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या डॉक्टरांना मानवंदना दिल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडियो औरंगाबादच्य हेडगेवार रुग्णालयातील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती हा व्हिडियो सुरतमधील असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]

Continue Reading

हर्षवर्धन पाटील यांचे बनावट छायाचित्र व्हायरल; वाचा सत्य

माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझं चुकलं मी भाजपात गेलो, असा फलक हातात घेतलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे हे छायाचित्र खरे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.   फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य पडताळणी माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझं चुकलं मी भाजपात गेलो, […]

Continue Reading

अम्फान वादळाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

अम्फान चक्रीवादळाचा देशाच्या पुर्व किनारपट्टीला मोठा फटका बसला. या वादळामुळे 106 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या वादळामुळे मान्सूनच्या प्रगती वेग मंदावला असून महाराष्ट्रात तो उशिरा दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात अम्फान वादळ हे किती भयाण होते, म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ अम्फान वादळाचा आहे […]

Continue Reading

जपानी डॉक्टरच्या नावे कोरोनाबाबत असत्य माहिती सांगणारा व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

जपानमध्ये असणाऱ्या एका भारतीय डॉक्टरने कोरोनाची लक्षणे आणि उपायांबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा एक कथित व्हिडियो व्हायरल होत आहे. व्हिडियोतील व्यक्ती कोरोनाची बाधा झाली की नाही हे तपासण्याचे तीन लक्षणे सांगते. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी पाच उपायदेखील सुचवते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती या व्हिडियोतील अनेक दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. […]

Continue Reading

पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात ‘चौकीदार चोर है’ घोषणा नाहीत; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले असताना तेथे नागरिकांनी चौकीदार चौर है अशा घोषणा दिल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात खरोखरच अशी काही घटना घडली का? हा व्हिडिओ खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य […]

Continue Reading

भाजप नेते एकनाथ खडसे यांचे बनावट छायाचित्र व्हायरल; वाचा सत्य

भाजप नेते एकनाथ खडसे यांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या छायाचित्रात खडसे यांनी ‘फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ’चा फलक हातात घेतलेला आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांचे हे छायाचित्र खरे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य पडताळणी भाजप नेते एकनाथ खडसे यांचे हे छायाचित्र […]

Continue Reading

कोरोनावर चुकीचे उपाय सांगणारे हे कस्तुरबा हॉस्पीटलचे डीन नाहीत; पाहा सत्य काय आहे

कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असताना कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीचे उपाय सांगणारे व्हिडियो आणि मेसेजचे प्रमाण वाढत आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये मीठाच्या पाण्याने गुळणा केल्याने कोरोनापासून रक्षण होते असा उपाय सुचविण्यात आलेला आहे. व्हिडियोतील व्यक्ती कस्तुरबा हॉस्पिटलचे डीन असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

पाकिस्तानातील गर्दीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्यावर गेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगवर अधिक भर देण्यात येत आहे. अशा परिस्थित बाजारपेठीतील गर्दीचा एक व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, तो व्हिडियो मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले. काय आहे व्हिडियोमध्ये? बाजारपेठेत खरेदीसाठी […]

Continue Reading

दलित महिलेने अन्न शिजवल्यामुळे मजुरांनी खाण्यास नकार दिला का? वाचा सत्य

दलित महिलेने जेवण बनवले म्हणून क्वारंटाईन सेंटरमधील काही लोकांनी या जेवणास विरोध केला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य पडताळणी व्हिडिओचे निरीक्षण केल्यावर एका ठिकाणी सहार (मधवापूर) असे लिहिल्याचे दिसते.  त्यानुसार शोध घेतला असता […]

Continue Reading

दीर्घकाळ मास्क वापरल्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का? वाचा सत्य

मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे जर ते आपण अधिक काळ वापरल्यास रक्ताचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो. तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागतो. परिणामी मृत्यू होण्याची शक्यता बळावते, असा एक संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पीटलमधील डॉ. जयवंत लेले यांच्या नावाने हा संदेश पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी असे मोहन भागवत म्हणाले नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावे एक कात्रण व्हायरल होत आहे. ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील आस्था कमी झाली’, असे मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचा यामध्ये दावा केला जात आहे. या कात्रणाच्या सत्य पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय आहे कात्रणात?  ‘कोरोना ने तोडी मेरी धर्म में आस्था – मोहन भागवत’ […]

Continue Reading

रत्नाकर मतकरी यांना कोरोना कसा झाला हे सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचे 17 मे रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत निधन झाले. मतकरी यांनी कोरोना कसा झाला याविषयी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेवती भागवत यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटले की, घरी आलेल्या वस्तूंच्या पिशव्या न धुतल्यामुळे त्यांना कोरोना झाला असावा. मतकरी कुटुंबियांशी बोलल्यानंतर रेवती यांना रत्नाकर मतकरी यांना  कोविड-19 चा […]

Continue Reading

मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अतिदीड शहाण्यांना हाच एक पर्याय, असे म्हणत अनेक जण ही पोस्ट शेअर करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ मुंबईतीलच आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य पडताळणी  मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा हा व्हिडिओ आहे का? […]

Continue Reading

हरणांचा हा कळप टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? वाचा सत्य

टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावर दिलेला हरणांचा कळप म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असं द्दश्य प्रत्येकाला दिसत आहे. आठ-दहा हरणं कधीही कुठेही दिसतात. पण एवढी हरणं एकाचवेळी दिसणं म्हणजे निव्वळ भाग्य असलं पाहिजे भाग्य…असं म्हणत हा व्हिडिओ अनेक जण शेअर करत आहेत. हा व्हिडिओ टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  […]

Continue Reading

अबू आझमी यांच्यासमोर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले नाही. पाहा सत्य…

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासमोर समर्थकांनी “पाकिस्तान जिंदबाद” असे नारे लावले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होऊ लागला आहे. अबू आझमी यांनी मुंबईतील वडाळा स्थानकावर श्रमिक रेल्वेतील प्रवाशांना भेट दिली असता त्यांनी मदत केलेल्या समर्थकांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणा दिल्या, असे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध […]

Continue Reading

हैदराबादमधील बिबट्याचा व्हिडिओ पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्याचा अधिवास आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही बिबट्या आढळल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच सध्या समाजमाध्यमात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ग्रेड सेपरेटरमध्ये (समतल विलगक) बिबट्या आढळल्याचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील आहे का? […]

Continue Reading

डीएमके नेत्याने महिला डॉक्टरला मारहाण केली का? काय आहे या व्हिडियोमागचे सत्य?

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर ह्ल्ले होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. एका महिलेला लाथांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, तमिळनाडूमधील डीएमके पक्षाच्या एका नेत्याने ड्युटीवर असणाऱ्या एका महिला डॉक्टरला बेदम मारले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून याविषयी पडताळणी करण्याची […]

Continue Reading

बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा त्या व्हिडियोचे सत्य

2020 हे संकटाचे वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कोरोनाच्या हाहाकारासोबतच नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर, छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती झाली.  आता सोशल मीडियावर रोड खचून वाहनांचे नुकसान झाल्याचा एक व्हिडियो पसरत आहे. या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगली.  फॅक्ट […]

Continue Reading

दिल्लीतील लुटमारीच्या घटना महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

देशभरात सध्या स्थलांतरित मजूरांचा प्रश्न चर्चेत आहे. या स्थलांतरित मजुरांकडे आता काम नसल्याने लुटमारीच्या घटना आणि गुन्हे वाढण्याची चिंताही आता काही जण व्यक्त करत आहेत. अशाच काही युवकांकडून एकटी व्यक्ती बघून निर्मनुष्य ठिकाणी लुटमार केली जात असल्याचे दोन व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. ही घटना मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चजवळ, महाराष्ट्रात घडल्याचे काही […]

Continue Reading

दिल्लीतील स्थलांतरित मजूरांचा व्हिडिओ विविध ठिकाणांचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

देशभरातील लॉकडाऊननंतर स्थलांतरित मजूरांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो मुंबई, ठाणे, पनवेल, सुरतमधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / अक्राईव्ह तथ्य पडताळणी स्थलांतरित मजूरांचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी […]

Continue Reading

शाहरुख खान टिपू सुलतानवर चित्रपट काढत नाहीए; ते पोस्टर फेक आहे. वाचा सत्य

सोशल मीडियावर अफवा उडाली आहे की, टिपू सुलतानच्या जीवनावर आधारित चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. सोबत या कथित चित्रपटाचे पोस्टरदेखील शेयर होत आहे. यावरून शाहरुखवर धार्मिक शेरेबाजी केली जात आहे. या पोस्टवरून हिंदु-मुस्लिम वादाला तोंड फुटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट खोटी आढळली असून, त्यावरून विनाकारण वातावरण तापले आहे. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

उत्पादनावरील बारकोड 890 पासून सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट ‘मेड इन इंडिया’ असते का? वाचा सत्य

पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारताचा’ मंत्र दिल्यानंतर सोशल मीडियावर स्वदेशी उत्पादनेच खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. कोणते उत्पादन स्वदेशी म्हणजेच ‘मेड इन इंडिया’ हे ओळखण्याची युक्ती एका व्हायरल मेसेजमध्ये सांगितली जात आहे.  उत्पादनावरील बारकोड क्रमांक जर 890 ने सुरू होत असेल तर ते प्रोडक्ट स्वदेशी असते, असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी […]

Continue Reading

स्थलांतरित मजूरांचा हैदराबादमधील व्हिडिओ गुजरातमधील म्हणून व्हायरल, वाचा सत्य

गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत या शहरात हजारो मजूर रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. हे मजूर कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात, असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरंच गुजरातमधील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / अक्राईव्ह तथ्य पडताळणी  हा व्हिडिओ गुजरातमधीलच आहे का? याचा […]

Continue Reading

किनाऱ्यावर वाहून आलेल्या माशांचा हा व्हिडियो भारतातील नाही. पाहा तो कुठला आहे

लॉकडाऊनमुळे मानवी वर्दळ कमी झाल्याने वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसत आहे. मासेमारीदेखील बंद असल्याने समुद्रातील मासे किनाऱ्यावर येत असल्याचा दावा करत अनेक व्हिडियो समोर आले. किनाऱ्यावर माशांचा खच साचल्याचा असाच एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्यावर पापलेटचा पाऊस पडला, अशा दाव्यासह हा व्हिडियो शेयर होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

वाईन शॉपसमोरील महिलांची रांग पुण्यातील नाही; जाणून घ्या तो व्हिडियो कुठला आहे

लॉकडाऊनदरम्यान मद्य विक्रीला परवानगी मिळताच दारुच्या दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा लागल्या. यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही उभे राहत असल्याचे दिसून आले. वाईनशॉप समोर रांगेत उभे असलेल्या महिलांचा असाच एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडियो पुण्यातील असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो बंगळुरू येथील असल्याचे सिद्ध […]

Continue Reading

पोलिसांनी लॉकडाऊन उघडल्यावर गुन्हे वाढतील असा इशारा दिलेला नाही. वाचा सत्य

मुंबई पोलिसांच्या नावाने सध्या समाजमाध्यमात सध्या एक संदेश व्हायरल होत आहे. या संदेशात लॉकडाऊन संपल्यावर गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त  करण्यात आली आहे. महागड्या किंवा सोन्याच्या वस्तू जवळ बाळगू नयेत, लहान मुले, वयोवृध्द व्यक्तींची काळजी घ्या, आवश्यकतेपेक्षा अधिक रोकड बाळगू नका, अशा अनेक बाबी या संदेशात आहे.  मुंबई पोलिसांनी खरोखरच असा काही संदेश जारी केला […]

Continue Reading

गुगल मॅपवरुन LOC काढून टाकण्यात आली आहे का? वाचा सत्य

भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (LOC) न दाखविलेला गुगलवरील नकाशा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या नकाशासोबत दावा करण्यात येत आहे की, गुगल मॅपने नियंत्रण रेषा (LOC) पुसली. गुगलने खरोखरच त्यांच्या नकाशावरुन नियंत्रण रेषा पुसली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक | फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी भारताच्या नकाशातून गुगलने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा खरोखरच […]

Continue Reading

औरंगाबादमध्ये 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला नाही. पोलीस अधीक्षकांचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्यावर गेला असून, दिवसेंदिवस नवीन रुग्णांची भर पडत आहे. रेड झोन बनलेल्या औरंगाबाद शहरात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. अशातच पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, औरंगाबाद शहरात 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता […]

Continue Reading

रतन टाटा यांनी मराठमोळ्या मुलाच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी खरेदी केली का? वाचा सत्य

नवउद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या रतन टाटा यांनी नुकतेच एका मराठमोळ्या तरुणाच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली. अर्जुन देशपांडे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या जेनेरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली. परंतु, यानंतर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, रतन टाटा यांनी जेनरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली.  फॅक्ट […]

Continue Reading

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणाऱ्या या छायाचित्राचे सत्य काय?

समाजमाध्यमांमध्ये सध्या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणारे एका मुलीने हातात पोस्टर पकडलेले एक छायाचित्र व्हायरल आहे. मुसलमानांमध्ये आजपर्यंत शिया आणि सुन्नी भाई-भाई होऊ शकले नाहीत तर काही मुर्ख हिंदू लोक हिंदू-मुस्लीम भाई-भाई म्हणत आहेत, असे या पोस्टरवर म्हटलेले आहे. या मुलीने खरोखरच हातात असे पोस्टर घेतले आहे का? ही मुलगी नेमकी कोण आहे? याची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

अन्न नासडीचा हा फोटो 7 वर्षांपूर्वीचा गुजरातमधील आहे; मुंबईतील परप्रांतीय मजुरांचा याच्याशी काही संबंध नाही.

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या-त्यांच्या राज्यांत पाठवण्यात येत आहे. देशभरात अशा श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. अशाच एका श्रमिक रेल्वेतून काही मजुरांनी शिळ्या अन्नाची पाकिटे फेकून दिल्याचा व्हिडियो अलिकडे व्हायरल झाला.  त्यानंतर आता जमिनीवर पोळ्या फेकून दिल्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात असून, मुंबईतील परप्रांतीय मजुरांनी अशा प्रकारे अन्नाची नासडी केली […]

Continue Reading

आई आणि मुलांच्या आत्महत्येचा तो व्हायरल व्हिडियो सोलापुरमधील नाही. वाचा सत्य

आईसह तिच्या दोन्हा लहान मुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा करण्यात येत आहे की, मन सुन्न करणारी ही घटना सोलापूर शहरातील घडली आहे. लॉकडाऊनदरम्यान घरातील रेशन संपल्यामुळे या आईने मुलांसह आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता दावा खोटा असल्याचे आढळले. काय […]

Continue Reading

पश्चिम बंगालमध्ये परप्रांतियांनी अन्नाची पाकिटे फेकल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबईहून परप्रांतीय, उत्तर भारतीयांसाठी खास रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. पण मुजोर भय्ये लोकांनी त्यांची लायकी दाखवून दिली. शाकाहारी जेवण, पाण्याच्या बाटल्या प्लॅटफॉर्मवर फेकुन दिले, अशा माहितीसह समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील अथवा महाराष्ट्रातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी मुंबईहून परप्रांतीय अथवा उत्तर भारतीयांसाठी सोडण्यात […]

Continue Reading

रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश असत्य; वाचा सत्य

उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी रतन टाटा यांचा एक छोटासा संदेश म्ह्णून सध्या समाजमाध्यमात एक संदेश व्हायरल होत आहे. हा संदेश खरोखरच उद्योगपती रतन टाटा यांचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी खरोखरच असा काही संदेश दिला आहे […]

Continue Reading

मालेगावमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करण्यात आल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याने महाराष्ट्रातील मालेगाव हे शहर डार्क रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मालेगावमध्ये आतापर्यंत 15  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असून 47 संशयितांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मालेगावमधील आजची सत्य परिस्थिती’ म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोत एका मशिदीतून नागरिक बाहेर पडत असताना दिसत […]

Continue Reading

आमिर खानने पिठाच्या पाकिटातून गरिबांना पैसे वाटले नाहीत. त्या व्हायरल मेसेज सत्य समोर आले.

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या नावे एक मेसेज व्हायरल होत आहे की, त्याने पिठाच्या पाकिटांतून मुंबईतील गरीबांना 15-15 हजार रुपयांची मदत केली. कोणताही गाजावाजा न करता गरजवंतांपर्यंत मदत पोहचविल्याबद्दल आमिर खानचे कौतुक होत आहे. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी या मेसेजच्या सत्यतेविषयी विचारणा केली होती. आज अखेर त्याचे सत्य समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ […]

Continue Reading

अयोध्येतील साधूचा मृत्यू भुकेमुळे झालेला नाही; वाचा सत्य

अयोध्येतील एका साधूचे छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत असून या साधूचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या साधूवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचे पार्थिव नदीत फेकल्याचा दावाही काही जण करत आहेत. अयोध्येत खरोखरच अशी काही घटना घडली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  या घटनेबाबतचे […]

Continue Reading

नेपाळमधील गारपीटीचा व्हिडियो छत्तीसगडमधील म्हणून व्हयरल. वाचा सत्य

छत्तीसगडमध्ये नुकतीच जोरदार गारपीट झाली. मोठ्या-मोठ्या गारांमुळे लोकांची घरे, वाहने, पिकांचे नुकसान झाले. त्याचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. यासोबतच गारपीटीचा एक व्हिडियोदेखील प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गोल्फ बॉलच्या आकाराच्या गारा शेतात साचलेल्या पाण्यात पडताना दिसतात. तसेच पत्रावर आदळणाऱ्या गारांच्या आवाजावरून तर असे वाटते की, जणू काही कोणी तरी आकाशातून गोळीबार करीत आहे. हा व्हिडियो […]

Continue Reading

ऋषी कपूर यांची निधनापूर्वीच्या रात्री काढलेली ही क्लिप नाही; वाचा सत्य

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी मुंबई येथे निधन झाले. निधनाच्या आदल्या रात्री रिलायन्स हॉस्पिटलमध्ये बनविण्यात आलेली शेवटची क्लिप म्हणून एक व्हिडियो पसरत आहे. ऋषी कपूर यांची ही खरोखरच शेवटची क्लिप आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली. फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा हा व्हिडियो नेमका […]

Continue Reading