संजय निरुपम यांनी स्वपक्षीय एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले का ? वाचा सत्य

कॉमेडियन कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर आता शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ […]

Continue Reading

अनिल परब यांचा नितेश राणेंवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत उद्धव ठाकरेंना ‘नेपाळी वॉचमन’ म्हणाले, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. मुळात अनिल परब भाजप नेते […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगाबजला नाही; ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले

उद्धव ठाकरेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, देशासाठी जो शहिद झाला, तो औरंगजेब जरी असला तरी तो आमचा भाऊ आहे, अस बोलो तर काय चुकल माझ ? या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेबची स्तुती करताना त्याला शहीद म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी केंद्राने वफ्क बोर्डवर बंधने आणू नयेत; असे वक्तव्य केले नाही; वाचा सत्य

वक्फ दुरुस्ती विधेयकाला अलीकडेच संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) कडून मंजुरी मिळाली आहे. याच पार्श्वभुमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि नावासह लिहिले आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नये.”  दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. […]

Continue Reading

संजय राऊत यांचा भाजपवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल

उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाविरोधात वक्तव्य करत त्यांच्या कारभारची पोलखोल केली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात संजय राऊत भाजप सरकारवर टीका करत होते. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत म्हणतात की, “निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणे […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी ‘बाबर देशासाठी शहीद झाला,’ असे वक्तव्य केले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल

माजी मुख्यमंत्री व शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. या ग्राफिक कार्डसोबत दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी बाबर हा देशासाठी शहीद झाला, असे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस उमेदवारांना पाडण्याचे आदेश दिले नाही; फेक ग्राफिक व्हायरल

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदार संघातील शिवसेना गटाच्या विरोधात उभे असलेले उमेदवार धर्मराज काडदी यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने कथितरित्या नाराजी व्यक्ती केली. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना पाडाण्याचे आदेश दिले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक केले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे जाहिरातीचे कौतुक करताना दिसतात. दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड […]

Continue Reading

‘मी बीफ खातो’ असे उद्धव ठाकरे स्वत:ला उद्देशून म्हटले नव्हते; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठकरे म्हणतात की, “मी गोमांस आणि बीफ खातो तर काय बिघडलं?” हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी ते बीफ खात असल्याचे मान्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल

आपल्या रोखठोक वक्यव्याने नेहमी चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटले, या दाव्यासह लोकमतचे लोगो असलेले ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले ग्राफिक कार्ड बानावट आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी उर्दू भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य

गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा वेबसाईटचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी मराठी प्रमाणे उर्दू भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी मुस्लिम संघटनांना विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वेबसाईटचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी मुस्लिम संघटनांना विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देण्याचे आश्वासन दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक कार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून एबीपी माझाद्वारे शेअर करण्यात आलेले […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी न केलेले वक्तव्य लोकमतचे लोगो वापरू फेक ग्राफिक कार्ड व्हायरल; वाचा सत्य

केंद्र सरकारने वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केल्यावर इंडिया आघाडीकडून या विधेयकाचा विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि नावासह लिहिले आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नये.” दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे […]

Continue Reading

“मला हिंदूच्या मतांची गरज नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले नाही; खोटे विधान व्हायरल

सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘लय भारी’ फेसबुक पेजच्या लोगोसह लिहिले आहे की, “हिंदूच्या मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही. मुस्लिम मतांवर विधानसभा पण जिंकून दाखवतो.” दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

बनावट फोटो व्हायरल: उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना झुकून नमस्कार केला का? 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रस प्रमुखांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर नतमस्तक झाले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

पक्ष प्रवेश करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे हिरवा धागा बांधतानाचा फोटो एडिटेड 

शिवसेना विभक्त होण्यापूर्वीपासून पक्षप्रवेश करताना शिवबंधन (केशरी रंगाचा धागा) बांधण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे एका मुस्लिम व्यक्तीला हिरवा धागा बांधताना दिसतात. दावा केला जात आहे की, उबाठा गटात मुस्लिम समुदायाने जास्तीत जास्त प्रवेश घ्यावा यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवबंधनाची चालत आलेली परंपरा मोडून पक्षप्रवेश करणाऱ्याला हिरवा […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर टीका करतानाचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ; सध्याचा म्हणून व्हायरल

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे सदस्य पक्ष काँग्रेसला घरचा आहेर देत राहुल गांधीवर टीका केली, या दाव्यासह त्यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2019 सालचा आहे. तेव्हा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या विरोधात होते. काय आहे दावा […]

Continue Reading

लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य

उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट लोकसभा निवडणूक संपल्यावर एकत्र येणार आणि भाजपमध्ये सामील होणार, या दाव्यासह साम टीव्हीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये केलेले वक्तव्य वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश […]

Continue Reading

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करण्यापासून रोखले का ? वाचा सत्य

काँग्रेस आणि ठाकरे गटात अनेक मतभेद असल्याच्या कथित बातम्या आपण माध्यमात पाहतो. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करत असताना थांबवले आणि त्यांना व्यासपीठावरून उतरून जाण्यास सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

FACT CHECK: ‘मोदींना मत म्हणजे तुमच्या भवितव्याला मत’ असे उद्धव ठाकरे कधी म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जुने व्हिडिओ संदर्भाशिवाय शेअर करून दिशाभूल केली जात आहे. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकेर नरेंद्र मोदींना मत देण्याचे जोरदार आवाहन करताना दिसतात. यावरून विरोधात असुनही उद्धव ठाकेरेंनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याचे समर्थन केले असा अर्थ काढला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे म्हटले का ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे सत्र सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते “सत्तधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा,” असे सांगत आहेत. विरोधी पक्षात असूनदेखील उद्धव ठाकरे सत्तधारी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला लुटारू पक्ष म्हटले नाही; चुकीच्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रस पक्षाने गेले 75 वर्ष देशाला लुटले, असे उद्धव ठाकरे बोलतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असे संजय राऊत म्हटले का ? वाचा सत्य

एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाचा घरचा आहेर देत “उद्धव ठाकरे हे काहीही बोलतील त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे.” असे म्हटले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक बनावट असून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. काय […]

Continue Reading

‘उद्धव ठाकरे पळून गेले’: एबीपी माझाच्या नावाने बनावट ग्राफिक कार्ड व्हायरल, वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आपला निर्णय देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी करण्याचे राज्यपालांचे निर्देश बेकायदेशीर होता; परंतु ठाकरेंनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करता येणार नाही.  या पर्श्वभूमीवर एबीपी माझाचा लोगो वापरून दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरे स्वत: पळून गेल्याने त्यांचे […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून “उठसूठ मी हिंदू का बोंबलता” असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविषयी एक दावा व्हायरल होत आहे. टीव्ही-9 मराठी वाहिनीचे ग्राफिक्स वापरून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच सवाल केला.  व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले की “उठसूठ मी हिंदू, मी हिंदू, बोंबलत का […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘मला लढाऊ माणसं नको, विकाऊ माणसं हवी’ असे म्हटले का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून विधानामध्ये फेरफार केलेली आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: उद्धव ठाकरे यांनी कोणत्या औरंगजेबला आपला भाऊ म्हटले? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘औरंगजेब’ला त्यांचा भाऊ म्हणून संबोधतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपच्या माध्यमातून युजर्स त्यांच्यावर मुघल सम्राटाचे कौतुक केले म्हणून टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणअंती कळाले की, अर्धवट क्लिप व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेबविषयी […]

Continue Reading

शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचा कोर्टाने निर्णय दिलेला नाही; जुनी बातमी व्हायरल

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद झाल्यानंतर आयोग आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एका बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत की, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या समर्थनात निर्णय देत जाहीर केले की शिवसेना केवळ उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे […]

Continue Reading

Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल

एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.  काय आहे दावा? मूळ पोस्ट […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले होते; मुघल सम्राट औरंगाबजला नाही

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते “औरंगजेब देशासाठी शहीद” झाला असे म्हणतात. या क्लिपसोबत दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेबची स्तुती करताना त्याला शहीद म्हटले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणी कळाले की, हा […]

Continue Reading

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळादरम्यान एका उद्धघाटन समारंभा प्रसंगी दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये “तुंबळ मारामारी” झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सुमारे तीन […]

Continue Reading

नदीकिनारी मृतदेहाच्या विटंबनेचा हा फोटो योगी आदित्यानाथ यांच्या कार्यकाळातील नाही; वाचा सत्य 

मशिदींवरील भोग्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. आधी मशिदींवरील आणि  त्यानंतर इतर प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 11 हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले.  या कारवाईचे स्वागत करताना राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती करत ट्विट केले होते की, “उत्तर […]

Continue Reading

अब्दुल सत्तार यांचा ‘अर्वाच्य शिवीगाळ’ करतानाचा 5 वर्षे जुना व्हिडियो व्हायरल; वाचा सत्य

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार एका जणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सत्तार कथितरीत्या एका व्यक्तीला धमकावत असताना हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचे ऐकू येते. सध्या सुरू असलेल्या ‘अझान विरुद्ध हनुमान चालिसा’ वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करून […]

Continue Reading

‘हिंदूचे फालतू सण बंद करा’ असे उद्धव ठाकरे म्हणाले का? अर्धवट व्हिडिओद्वारे फेक न्यूज व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मीडियाशी बोलतानाची 30 सेकंदाची क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिंदू सण आणि फटाक्यांविषयी बोलत आहेत. हा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हिंदु सणांविरोधात अपशब्द काढत ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ त्यांची यंदाच्या बजेटवरील प्रतिक्रिया म्हणून व्हायरल

महिन्याच्या सुरुवातीला सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत म्हटले जात आहे, की उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केले त्यांना बजेटमधले काही कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या बजेटवर प्रतिक्रिया देताना खरंच असे वक्तव्य केले का, याबाबत विचारणा करत फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू आहे का? वाचा ईदविषयक ‘त्या’ धड्यामागचे सत्य

महाआघाडीच्या सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. मराठीच्या पुस्तकातील ईदविषयक धड्याखालील प्रश्नांवर आक्षेप घेत दावा केला जात आहे की, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यानंतर हा असा धडा मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की […]

Continue Reading

महाराष्ट्रात 1 मार्चपासून लॉकडाऊन? न्यूज चॅनेलचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल

राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढून लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी जनतेला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना काळातील इतर नियम पाळण्याचे आवाहन केले. अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडॉऊन लावावे लागेल, असे ते म्हणाले. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, 1 मार्चपासून राज्यात […]

Continue Reading

सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून मुकेश अंबानी यांनी पार्टीचे आयोजन केले का? वाचा सत्य

कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत तर रात्री संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या पार्टीचा एक व्हिडिओ शेयर होत आहे. दावा केला जात आहे की, यापार्टीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलिवूड सेलिब्रेटी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

‘फालतू सण बंद करा’; उद्धव ठाकरेंचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, वाचा सत्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सध्या एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. 30-सेकंदाची क्लिप शेयर करून दावा केला जात आहे की, हिंदु सणांविरोधात बोलताना ठाकरे यांनी ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले […]

Continue Reading

अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवर लाचार म्हटले का? वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले होते. यानंतर सोशल मीडियावर दावा करण्यात येऊ लागला की, अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा नाकारत त्यांना ‘लाचार’ म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. काय आहे दावा? केजरीवाल यांच्या कथित […]

Continue Reading

FACT CHECK: ‘शिवथाळी’साठी आधारकार्ड सक्तीचे आहे का? वाचा सत्य

राज्यातील गरीब व गरजू लोकांना केवळ 10 रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या ‘शिवभोजन’ योजनेला येत्या प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे गोरगरिबांना दहा रुपायांमध्ये पोटभर जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. ‘शिवभोजना’ची चव चाखण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा […]

Continue Reading

महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांनी एकत्रित ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला का? काय आहे सत्य या फोटोचे?

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवत आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकत्र हा चित्रपट पाहिला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची […]

Continue Reading

Fact Check : शिवसेना भवनावर सोनिया गांधीचा फोटो झळकला का?

महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडीचे गठन झाल्यानंतर शिवसेना भवनावर सोनिया गांधी यांचे पोस्टर लावण्यात आल्याचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. शपथविधीच्या तोंडावर शिवसेना भवनचे नवीन रूप आणि रोषणाई, अशा कॅप्शनसह हा फोटो शेयर केला जात आहे. अशी माहिती देत मराठा आरक्षण आणि श्रृती गांवकर यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

सोनिया गांधी यांच्या फोटोसमोर उद्धव ठाकरे नतमस्तक झाल्याचा फोटो खोटा. वाचा सत्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर बरेच गाजत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असून, सोनिया गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यापार्श्वभूमीवर हा फोटो फिरत आहे. यावरून अनेक लोक त्यांच्यावर टीका करीत […]

Continue Reading

Fact : धर्मनिरपेक्ष शिवसेनेचा नवा लोगो म्हणून पसरविण्यात येणारे हे छायाचित्र बनावट

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीच्या रुपाने एकत्र आले आहेत. त्याचवेळी शिवसेनेने आपल्या लोगोत बदल केला असून भविष्यातील मोहिमेसाठी नवीन लोगो घेतला आहे. नवीन धर्मनिरपेक्ष शिवसेना अशा माहितीसह एक छायाचित्र समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ आणि अमित राजुरकर पाटील यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पत्र लिहिले का? जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजचे सत्य

विधानसभेच्या निकालानंतर चारही प्रमुख पक्षांना राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. भाजप-शिवसेना युतीचे बिनसल्यानंतर सत्तास्थापनेअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, बहुमताची आकडेमोड जुळवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला. त्यानंतर ‘महाशिवआघाडी’चे सरकार येणार का अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली. सेनेच्या या भूमिकेचा विरोध करणारे एक पत्र सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहे. दावा केले जात […]

Continue Reading

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरेंची सभा पाहतानाचा हा व्हिडिओ खरा आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांनी युती तुटण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे पाहत असतानाचा एक व्हिडिओ Save Maharashtra From BJP या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांची सभा पाहतानाच्या या व्हिडिओत एका कोपऱ्यात एएनआय या वृत्तसंस्थेचे नावही दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / […]

Continue Reading