चित्रा वाघ यांचा संजय राठोडसोबतचा फेक फोटो व्हायरल; वाचा सत्य

पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचा एक कथित फोटो सध्या व्हायरल होत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि संजय राठोड यांचा हातात हात घेतलेला एक कथित फोटो शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

FAKE NEWS: बिर्याणीतून नपुंसकतेच्या गोळ्या देण्याची खोटी पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

बिर्याणी विक्रेता आणि औषधगोळ्यांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, कोईम्बतूर शहरातमध्ये एका हॉटेलमध्ये हिंदू ग्राहकांच्या बिर्याणीत नपुंसक बनवणाऱ्या गोळ्या टाकण्याचा प्रकार उघडकीस आला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही फेक न्यूज आहे. काय आहे दावा? व्हायरल पोस्टमध्ये आर. डी. सिंग […]

Continue Reading

केरळमध्ये योगी आदित्यानाथ यांच्यासाठी हा मानवी झेंडा तयार करण्यात आला नव्हता; वाचा सत्य

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच तेथे सभा घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजपच्या झेंड्याच्या मानवी प्रतिकृतीचा फोटो व्हायरल होऊ लागला. दावा केला जात आहे की, योगी आदित्यनाथ यांचे केरळमध्ये असे स्वागत करण्यात आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

मधुमेहावरील इलाज म्हणून व्हायरल होत असलेला तो मेसेज फेक; वाचा सत्य

मधुमेह (Diabetes) असेल तर अद्रक, पुदीना आणि डाळिंबाची चटणी खाणे उपायकारक असते, असा मेसेज व्हायरल होत आहे. गुजरातच्या राजकोटमधील स्टर्लिंग हॉस्पिटलमधील डॉ. प्रीती दवे यांनी असा सल्ला दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रीती दवे नामक […]

Continue Reading

महाराष्ट्रात 1 मार्चपासून लॉकडाऊन? न्यूज चॅनेलचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल

राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढून लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी जनतेला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना काळातील इतर नियम पाळण्याचे आवाहन केले. अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडॉऊन लावावे लागेल, असे ते म्हणाले. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, 1 मार्चपासून राज्यात […]

Continue Reading

दक्षिण आफ्रिका सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लसीचे 10 लाख डोस परत करणार का? वाचा सत्य

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना विषाणू थैमान घालत असून, आता कुठे त्यावर लस उपलब्ध झाली आहे. भारताच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) लस जगभरात पाठविली जात आहे.  लसीची उपयुक्तता आणि प्रभावीपणा याविषयी अजुनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यात भर म्हणून बातमी आली की, दक्षिण आफ्रिकेने ‘सीरम’च्या अॅस्ट्राझेनेका लसीचे सुमारे दहा लाख डोस परत […]

Continue Reading

नीता अंबानी राम मंदिरासाठी 33 किलोचे 3 सुवर्ण मुकुट देणार आहेत का? वाचा सत्य

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक निराधार दावे केले जातात. यात भर म्हणजे म्हटले जात आहे की, नीता अंबानी आयोध्यातील राम मंदिरासाठी 33 किलो वजनाचे तीन सुवर्ण मुकुट देणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

अडाणी ग्रुपने ‘इंडियन ऑईल’ कंपनी विकत घेतली का? वाचा ‘त्या’ फोटोमागील सत्य

पेट्रोलचे भाव शंभरीनजीक गेले असताना इंधन दरवाढीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल-अडाणी गॅस कंपनीच्या गॅस्ट स्टेशनचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने ‘इंडियन ऑईल’ कंपनी आता अडाणी ग्रुपला विकली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य

मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका इमरतीमधून काही लोकांना अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे. काय आहे दावा? दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये बंदुकधारी पोलिसांची तुकडी काही लोकांना इमारतीमधून अटक […]

Continue Reading

पत्नीच्या मृत्यूनंतर हे प्राध्यापक आपल्या बाळाला सांभाळत शिकवतात का? वाचा सत्य

एका लहान बाळाला कडेवर घेऊन वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दावा केला जात आहे की, पत्नीच्या निधनानंतर हे प्राध्यापक बाळाला घेऊन वर्गात शिकवतात. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची सर्वत्र वाहवा होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या फोटोतील बाळ […]

Continue Reading

हा पुलवामा हल्ल्याचा व्हिडिओ नाही; 2007 साली इराकमधील हा बॉम्बस्फोट आहे – वाचा सत्य

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी आत्मघाती कारबॉम्बद्वारे जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून एक जुनी क्लिप पुन्हा शेअर होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2007 साली […]

Continue Reading

उत्तराखंडमध्ये मदतकार्य म्हणून 2013 सालातील जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

उत्तराखंडमध्ये गेल्या रविवारी (दि. 8) चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळून पूर आला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला तर इतरांचा शोध घेतला जात आहे. अशातच सोशल मीडियावर बचावकार्याचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पुरात वाहून गेलेल्या 13 गावांमध्ये असे बचावकार्यक कले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य केले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आंदोलनजीवी’ भाषणावरून गदारोळ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंदोलनकर्त्यांचा हक्क हिरावून घेण्याबाबत टीका केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा […]

Continue Reading

‘खालसा एड’ च्या स्वयंसेवकांनी उत्तराखंडमधील लोकांना मदत केली का? वाचा सत्य

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात धौलीगंगा या नदीला पुर आला आणि त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. यादरम्यान सोशल मीडियावर पुरात अडकलेल्यांना मदत करतानाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ‘खालसा एड’ संघटनेतील लोकांनी उत्तराखंडमध्ये असे मदत बचावकार्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियात बीफ विकणाऱ्या ‘Brahman Pies’ हॉटेलचा भारतीय ब्राह्मणांशी काही संबंध आहे का?

भारतात गाईला पवित्र म्हणणारे ब्राह्मण विदेशात गोमांसापासून तयार केलेल्या व्यंजनाचे हॉटेल चालवितात अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ‘Brahman Pies’ नामक एका हॉटेलचा फोटो शेअर करून भारतीय ब्राह्मणांचा दुटप्पीपणा उघडकीस आल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सोशल मीडियावरील दावे […]

Continue Reading

RBI 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का? वाचा सत्य

काही दिवसांपासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रिझर्व्ह बँकेतर्फे 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा मार्च ते एप्रिल दरम्यान चलनातून बंद करण्यात येणार आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉट्सअॅपवर हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली.  पडताळणीअंती कळाले की, रिझर्व्ह बँकेने हा दावा फेटाळून लावला  आहे. काय आहे दावा? सोशल मीडियावर […]

Continue Reading

VIDEO: मराठी माणसाने पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यावर मोदींनी त्याला चूप बसविले का?

इंधन दरवाढीचा ‘शतकी’ वेग पाहता इंटरनेटवर पेट्रोल-डिझेलच्या भावाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक क्लिप सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका मराठी माणसाने त्यांना पेट्रोलबाबत प्रश्न विचारल्यावर ते त्याला मराठीतूनच खाली बसायला सांगतात आणि उत्तर देणे टाळताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

जखमी पोलिसांचे कुटुंबीय आंदोलन करणार का? वाचा सत्य

दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. त्यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. या पार्श्वभूवीवर सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, जखमी झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय याविरोधात आंदोलन करणार आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  काय आहे दावा?  सोशल मीडियावर जखमी […]

Continue Reading

VIDEO: लोकल सुरू झाल्यावर मुंबईतील रेल्वे स्टेशनवर अशी गर्दी झाली का? वाचा सत्य

सुमारे दहा महिन्यांनंतर मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणजेच लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली. यानंतर सोशल मीडियावर रेल्वेस्टेशनवरील प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळपणा म्हणूनही हा व्हिडिओ फिरवला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ  आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून, चुकीच्या माहितीसह […]

Continue Reading

अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? वाचा ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर अण्णांवर सोशल मीडियावर टीका होत आहे. काहींनी तर अण्णा आणि जे. पी. नड्डा यांचा फोटो शेअर करीत दावा केला की, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

शेतकरी आंदोलकांना मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले का? वाचा सत्य

26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे, शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना केंद्र सरकारतर्फे पोलिसांप्रमाणे सुरक्षा दिली जात आहे. सोबत सामान्य कपड्यातील पण अंगात पोलिसांचे जॅकेट घातलेल्या एक व्यक्तीचा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य

पाठीवर जबर मारहाणीचे व्रण असणाऱ्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेला हा शेतकरी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, हे फोटो जुने असून त्यांचा शेतकरी आंदोलनाशी […]

Continue Reading