Fact-Check: ट्रम्प यांनी मोदींना ट्विटरवरून अनफॉलो केले का? वाचा सत्य

सध्या अमेरिका आणि भारत या दोन्ही राष्ट्रांचे परस्परसंबंध ताणलेले असताना सोशल मीडियावर वावड्या उठत आहेत की, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाऊट हाऊसने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर (आता एक्स) अनफॉलो केले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो करण्याची बातमी चार […]

Continue Reading

पाणी साचलेल्या विमानतळाचा फोटो अहमदाबादचा नाही; चेन्नईतील जुना फोटो व्हायरल

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पूराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. अमहदाबाद विमानतळालासुद्धा जोरदार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले होते.  दरम्यान, विमानतळावर पाणी साचल्याचा एक फोटो शेअर करून दावा करण्यात येत आहे की तो फोटो अहमदाबाद विमानतळाचा हे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी रडून खंत व्यक्त केली नाही; जुना व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. अनेक वर्षांपासून रखडलेला हा निर्णय पूर्णत्वास गेल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा रडू कोसळताणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, औरंगाबादचे नाव अधिकृतरीत्या छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर “हे फार वाईट घडलं” असे […]

Continue Reading

नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठक? जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दोन्ही काँग्रेस आणि भाजपमध्ये एक गुप्त बैठक झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो तीन वर्षांपूर्वी लोकसभेच्या […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी पगडी बांधण्यास नकार दिला नव्हता; ते सेल्फी देण्यास नाही म्हणाले होते

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १० जानेवारी रोजी अमृतसर येथे पोहचली तेव्हाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी कोणती तरी गोष्ट करण्यास मनाई करताना दिसतात. या सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरात गेल्यावर मानाची पगडी घासण्यास नकार दिला. असेही म्हटले जात आहे की, राहुल गांधी कॅमेरा समोर […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला नाही; जुना व्हिडिओ व्हायरल 

तब्बल एका वर्षांच्या विश्रामानंतर कोरोना विषाणुचे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये कोविडच्या नव्या सबव्हेरिएंटने हाहाकार माजवलेला आहे. भारत सरकारदेखील त्यामुळे सतर्क झाले असून, पुन्हा एकदा कोविड नियमावली जारी करण्याचा विचार केला जात आहे.  अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नरेंद्र मोदी लॉकडॉऊनची घोषणा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

भाजप नेते परेश रावल यांचा माफी मागतानाचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षे जुना; वाचा सत्य

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी 29 नोव्हेंबर रोजी वलसाड जिल्ह्यात एका रॅलीमध्ये भाषण करताना बंगाल विषयक वादग्रस्त विधान केले होते.  “गॅस सिलेंडरचे काय करणार? बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. परेश रावल यांनी शब्दांचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत माफीसुद्धा […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी हिंदु पद्धतीने पंतप्रधान निवासात प्रवेश केल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य 

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नीसह पंतप्रधान निवासस्थानात हिंदू पद्धतीने पूजा करून गृहप्रवेश केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक व त्यांची पत्नी अक्षता यांच्यासोबत भगवे कपडे परिधान धार्मिक लोक दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा […]

Continue Reading

जामियातील ‘त्या’ विद्यार्थ्याला खरंच गोळी लागली आहे. ती लाल बॉटल पाण्याची होती. वाचा सत्य

एका अल्पवयीन मुलाने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सीएए-एनआरसीच्या विरोधातील आंदोलनकर्त्यांवर 30 जानेवारी रोजी गोळी चालविली होती. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. मीडिया आणि पोलिसांच्या समक्ष झालेल्या या घटनेचे व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने पसरले. अशाच काही फोटोंमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातपाशी लाल रंगाची एक बॉटल दिसते. या फोटोंवरून दावा केला जात आहे की, या […]

Continue Reading

FACT-CHECK: ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती का? जाणून घ्या सत्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. ममता बॅनर्जीदेखील आईच्या धर्मानुसारच आचरण करत असल्याचे म्हटले जातेय. त्याचा पुरावा म्हणून एक जुना फोटोदेखील शेयर केला आहे, ज्यामध्ये ममता बॅनर्जी ज्योती बासू यांना “सलाम” करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.  काय आहे पोस्टमध्ये? “ममता बॅनर्जी […]

Continue Reading

सोनिया गांधी यांच्या फोटोसमोर उद्धव ठाकरे नतमस्तक झाल्याचा फोटो खोटा. वाचा सत्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर बरेच गाजत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असून, सोनिया गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यापार्श्वभूमीवर हा फोटो फिरत आहे. यावरून अनेक लोक त्यांच्यावर टीका करीत […]

Continue Reading

Fact Check : राहुल गांधी म्हणाले का, बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते

धारावी येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी “बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते, पूर्ण व्यवस्था नष्ट केली आहे” असे म्हटल्याचा दावा Prasad Deshpande यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका व्हिडिओसह केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी  धारावीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी नेमके काय […]

Continue Reading

Fact Check : तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या आहेत का?

अमेरिकेच्या डेमोक्रेटीक पक्षाच्या संभाव्य उमेदवार तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या असल्याची माहिती Hrishikesh Akatnal यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  तुलसी गबार्ड या नेमक्या कोण आहेत आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विकीपीडियावर असलेल्या माहितीत […]

Continue Reading

Fact Check : मनसेच्या टक्केवारीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वाढ होणार आहे का?

आनंदाची बातमी.. एक्झिट पोल पाहता मनसेच्या ३० ते ३५ जागा निवडून येण्याची शक्यता.. अशी माहिती MNS For Maharashtra या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे. या माहितीसोबतच एक ग्राफिकही पोस्ट करण्यात आले आहे. या ग्राफिक्समध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे नाव दिसून येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive तथ्य […]

Continue Reading

अहमदनगरच्या मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी केली होती का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी करण्यास आली होती असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट लोकमत न्यूज 18 या फेसबुक पेजवरुन व्हायरल झालेल्या या पोस्टला 681 शेअर, 2 हजार 300 लाईक्स, 423 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर फेसबुकच्या इतर […]

Continue Reading

22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे केवळ राज ठाकरेंवरच मुख्यमंत्री बोलले का? सत्य पडताळणी

सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे राज ठाकरेंवर भाष्य या विषयावर पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट अमित राज ठाकरे या फेसबुक पेजवर 274 वेळा शेअर झाली आहे. एक हजार 100 लाईक्स् आणि 79 कमेंटस् मिळाल्या आहेत. या विषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केलेली सत्य पडताळणी. […]

Continue Reading

सत्य पडताळणी: वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता?

वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता, MIM म्हणतंय आता लोकसभा लढवायची अशा शीर्षकाचे वृत्त www.frontpage.ind.in या संकेतस्थळाने दिले आहे. औरंगाबादसह राज्यातील दोन ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत MIM आग्रही आहे. औरंगाबादेतून बी. जे. कोळसे पाटील यांच्या नावाला MIM ने विरोध केला आहे, असे वृत्त या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. […]

Continue Reading

फेसबुकवर भाजपा प्रसन्न : सत्य पडताळणी

जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने राजकीय जाहिरातींचा डेटा जाहीर केला आहे. यात जाहिरातींवर खर्च करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक रक्कम भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्थानिक पक्षानंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा क्रमांक लागतो, असे वृत्त दैनिक […]

Continue Reading

भाजपच्या बड्या लोकप्रतिनिधीच्या कामक्रीडेचे फोटो व्हायरल : सत्य पडताळणी

कथन सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की भाजपचा एक लोकप्रतिनिधी एका महिलेसोबत कामक्रीडा करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी .. Facebook | अर्काइव्ह ही बातमी काही वृत्तपत्र आणि वेबसाईटवर दिसून आले आहे. वृत्तपत्रांमधील बातमी येथे वाचू शकता.प्रहार–अर्काइव्ह | महाबातमी–अर्काइव्ह | जनशक्ती–अर्काइव्ह […]

Continue Reading

सत्य पडताळणी : अमृता फडणवीस म्हणाल्या की, “शिवसेना – भाजपमधील भांडण नवरा बायकोचे’’

नुकतीच शिवसेना – भाजप यांची येणाऱ्या निवडणुकांसाठी युती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत केलेले एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘’ शिवसेना –भाजप यांच्या मधील भांडण हे नवरा बायकोचे भांडण आहे.’’ त्यांच्या या वक्तव्यावर सध्या फेसबुकवर २२५ लाईक असून १४४ शेअर आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी Facebook […]

Continue Reading

लोकसभेसाठी आठवलेंनी मागितली केवळ एक जागा; सत्य की असत्य

लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा केली. या जागावाटपात रिपाईला स्थान देण्यात आलेली नाही. सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर […]

Continue Reading

काय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा भाऊ चहा विक्रेता आहे?

परिचय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच विविध मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. पण सध्या योगी आदित्यनाथ यांच्या भावाबद्दलचा एक फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती चहा बनवत असून, त्या फोटोखाली “ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ आहेत.” असे लिहून येत आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर होणारी चर्चा खालील प्रमाणे […]

Continue Reading