‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणांचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही; वाचा सत्य

काही युवक पाकिस्तान व खलिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील ही घटना आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती हा दावा खोटा आढळला. सुमारे पाच वर्षांपूर्वीचा हा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह पसरविला जात आहे. […]

Continue Reading

फ्रान्सने ISI प्रमुखाच्या बहिणीसह 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला का? वाचा सत्य

फ्रान्समध्ये गेल्या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांच्या वादग्रस्त चित्रावरून एका शिक्षकाचा शिरेच्छेद करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर फ्रान्समध्ये कट्टरवाद आणि मुस्लिम स्थलांतरितांचा मुद्दा तापला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशतवाद आणि कट्टरतावाद्यांविरोधात लढा देणार असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, फ्रान्सने नुकतेच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या प्रमुखांच्या […]

Continue Reading

FACT CHECK – चार्जिंगला लावून मोबाईलवर बोलल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला का?

शरीरापासून डोकं वेगळं झालेल्या मुलाचा रक्तबंबाळ फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य सिद्ध झाला. पाकिस्तानात काकांनी पुतण्याची केलेल्या हत्येचा हा फोटो आहे. काय आहे दावा? बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात धडापासून शीर वेगळे झालेल्या मुलाचा फोटो शेयर करून म्हटले की, “चार्जिंगला मोबाईल […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये गटारात बुडालेल्या मुलाला वाचविण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबईला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. रस्त्यावर तर आहेच; परंतु, घरातही पाणी साचले आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणीखाली बुडालेल्या एका गटारातून मुलाला वाचवितानाचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील मोहम्मद अली रोडी येथे घडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कराची, पाकिस्तान येथील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

पाकिस्तानातील गर्दीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्यावर गेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगवर अधिक भर देण्यात येत आहे. अशा परिस्थित बाजारपेठीतील गर्दीचा एक व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, तो व्हिडियो मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले. काय आहे व्हिडियोमध्ये? बाजारपेठेत खरेदीसाठी […]

Continue Reading

इम्रान खान यांची मिमिक्री करणारा हा कलाकार पाकिस्तानी नाही. तो भारतीय आहे. वाचा सत्य

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाच्या मजेशीर मिमिक्रीचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. भारतातील कॉमेडियन जसे भारतीय नेत्यांची मिमिक्री करून व्यंग करतात, तसे आता पाकिस्तानातही होऊ लागले असा दावा करीत म्हटले की, व्हिडियोत दिसणारा कलाकार पाकिस्तानातील असून, इम्रान खान यांची कशी बेईज्जती केली ते पाहा.  महेश व्हावळ, हेमंत पांचपोर, माधव भिडे, सुधीर मोघे […]

Continue Reading

पाकिस्तानातील लुटमारीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून केला जातोय व्हायरल. पाहा सत्य

दिवसाढवळ्या एका जोडप्याची लूट करतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या व्हिडियोमध्ये दुचाकीवर आलेली चार मुले कारमधील एका जणाला धमकावून त्याच्याकडील ऐवज घेऊन पळताना दिसतात. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईतील घाटकोपर […]

Continue Reading