राहुल गांधींनी पाकिस्तानला 5 हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा केली नाही; बनावट ग्रफिक व्हायरल

False राजकीय | Political

काँग्रस सत्तेत आल्यावर पाकिस्तानला 50 वर्षांसाठी बिनव्याजी 5 हजार कोटींचे कर्ज दिले जाईल अशी राहुल गांधींनी घोषणी केली या दाव्यासह एबीपी न्यूजच्या बातमीचे ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक फेक असून अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने जाहिर केलेली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमधील एबीपीन्यूजचा लोगो आणि बातमीचे ग्राफिक दिसते. बातमीमध्ये राहुल गांधी नावा सोबत दोन घोषणा लिहिलेल्या दिसतात. 1) पाकिस्तानला मदत करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते नक्कीच करू. 2) आमचे सरकार बनताच आम्ही पाकिस्तानला 50 वर्षांसाठी 5 हजार कोटींचे कर्ज बिनव्याजी देऊ. (भाषांतर)

युजर्स हे ग्राफिक शेअर करतना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेसचे सरकार आले तर पाकिस्तानला 5 हजार करोड रुपये बीन व्याजी 50 वर्षासाठी देणार – राहूल गांधी.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम एबीपी न्यूजच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे ग्राफिक आढळले नाही.

या उलट एबीपी न्यूजने 12 नोव्हेंबर 2018 रोजी ट्विट द्वारे स्पष्ट केले होते की, व्हायरल होत असलेली ग्राफीक फेक असून अशी बातमी एबीपी न्यूज कडून जाहीर करण्यात आली नाही.

पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ऑनलाइन प्रसारित केले जाणारे संलग्न माध्यम आमच्या चॅनेलच्या टेम्पलेटशी जोडलेले आहे. राहुल गांधींच्या विधानांचे वृत्त एबीपीने जाहिर केलेले नाही. हे वृत एबीपी न्यूज नेटवर्कशी संबंधित नाही.”

निष्कर्श

यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक फेक आहे. एबीपी न्यूजने 2018 मध्येच स्पष्ट केले की, काँग्रस सत्तेत आल्यावर राहुल गांधी पाकिस्तानला बिनव्याजी 50 वर्षांसाठी 5 हजार कोटींचे कर्ज देतील अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने जाहीर केलेली नाही. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक अनेक वर्षांपासून व्हायरल होते आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधींनी पाकिस्तानला 5 हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा केली नाही; बनावट ग्रफिक व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply