
खेकडे शोधताना आदित्य ठाकरे अशी एक पोस्ट Dipak Shelar
यांनी मनसेमय कोकण ? MNS Konkan या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
आदित्य ठाकरे यांचा हा फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही हा फोटो रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यावेळी आम्हाला याचा अपेक्षित परिणाम मिळाला नाही. त्यानंतर आम्ही हा फोटो आदित्य ठाकरे यांच्या फेसबुक अकाऊंटवर शोधला. त्याठिकाणी त्यांनी वर्सोवा किनाऱ्यावर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे हे फोटो असल्याचे दिसून आले.
फेसबुक / Archive
आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो आम्ही शोधला. तो विर्सोवा किनाऱ्यावर त्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचा असल्याचे या माहितीहून दिसून आले. 7 जुलै रोजी ही मोहिम राबविण्यात आल्याचे दिसून आले.
दैनिक सकाळने ही या स्वच्छता मोहिमेबाबतचे वृत्त आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. सोबतच आदित्य ठाकरेंचे या मोहिमेतील सहभागाचे छायाचित्रही प्रसिध्द केले आहे.
दैनिक सामनाने या स्वच्छता मोहिमेची काही छायाचित्र प्रसिध्द केली आहेत ती आपण इथे क्लिक करुन पाहू शकता. दरम्यान यानंतर फेसबुकवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि स्वाभिमानचे नितेश राणे यांचे फोटो व्हायरल झाल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठी आणि दिव्य मराठीने दिले आहे.
आदित्य ठाकरे यांचा व्हायरल करण्यात येत असलेला खरा आणि खोटा फोटो आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे हे फोटो आहेत. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर खेकडे पकडल्याचे फोटो आणि दावे खोटे आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : आदित्य ठाकरे यांचा हा फोटो नेमका कसला?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
