अभिजीत दीपके यांना MTV रोडीज शोमधून शिवीगाळ करत बाहेर काढण्यात आले होते?

False राजकीय | Political

NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर MTV रोडीज शोमधील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

या व्हिडिओमध्ये रोडीजचे जज रघुराम एका स्पर्धका शिवीगाळ करतात आणि ऑडिशनमधून बाहेर जाण्यास सांगतात. सोशल मीडिया युजर्स दावा करत आहेत की, हा स्पर्धक म्हणजेच अभिजीत दीपके आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईनवर (9049053770) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली. 

तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. तो स्पर्धक अभिजीत दीपके नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये रोडीजचे जज रघुराम एका स्पर्धकाला रागाने शिवीगाळ करताना दिसतात. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके यांचा फोटोही दाखवण्यात आला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स असा दावा करत आहेत की, रोडीजच्या ऑडिशनमधून अभिजीत दीपके यांना हाकलून देण्यात आले होते आणि त्यांची पात्रता या व्हिडिओतून दिसून येते.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

फॅक्ट-चेक

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आढळले की, व्हायरल व्हिडिओतील स्पर्धक अभिजीत दीपके नाहीत. 

‘द क्रेझी वेव्ह’ या फेसबुक पेजवर 3 फेब्रुवारी 2018 रोजी या व्हिडिओची मोठी आवृत्ती शेअर करण्यात आली होती. त्या व्हिडिओतील ग्राफिक्समध्ये संबंधित स्पर्धकाचे नाव ‘सुमीत’ असे दिसते..

पुढील शोधात हा स्पर्धक MTV रोडीज सीझन 8 मधील सुमीत सूर्यवंशी असल्याचे स्पष्ट झाले. 

रोडीज सीझन 8 मध्ये ऑडिशन दिलेले त्रिपुरारी चौधरी यांनीदेखील सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सांगितले की, व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती अभिजीत दीपके नसून सुमीत सूर्यवंशी आहे.

आर्काइव्ह

याशिवाय, ‘सुमीत सूर्यवंशी’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर 11 जानेवारी 2012 रोजी “सुमीत सूर्यवंशीचा रोडीज 8-9 मधील अनुभव” या नावाने एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. 

खंडन 

रघुराम यांनी 13 जून रोजी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, व्हायरल होत असलेल्या ऑडिशन क्लिपमधील व्यक्ती अभिजीत दीपके नाही. हा व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

आर्काइव्ह

निष्कर्ष

पडताळणीतून स्पष्ट होते की, ‘MTV रोडीज’च्या व्हायरल व्हिडिओमध्ये रघुराम ज्या स्पर्धकाला फटकारताना दिसतात तो अभिजीत दीपके नसून सुमीत सूर्यवंशी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अभिजीत दीपके यांच्याशी जोडणारा दावा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: अभिजीत दीपके यांना MTV रोडीज शोमधून शिवीगाळ करत बाहेर काढण्यात आले होते?

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *