जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतलाय का? वाचा सत्य

False सामाजिक

जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने खरोखरच जन्म घेतला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

जर्मनीत तीन डोळ्याचे बाळ जन्मास आले आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी युटूयूबवर 13 जुलै 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. हा व्हिडिओ नीट पाहिला असता या व्हिडिओतील बाळाचे डोळे एकाच वेळेस हालत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

संग्रहित

आपण खाली देण्यात आलेल्या तुलनात्मक छायाचित्रात हे स्पष्ट पाहू शकता.

111.png

यातून व्हिडिओ एडिटिंगद्वारे तिसरा डोळा कपाळावर दर्शविल्याचे स्पष्ट होते. जुनकीय किंवा अन्य कारणांमुळे लहान मुलांमध्ये काही दोष निर्माण होतात. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थने craniofacial duplication याबाबत केलेले संशोधन आपण येथे वाचू शकता. 

निष्कर्ष

जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतल्याचे असत्य आहे. हा व्हिडिओ एडिट केलेला आहे.

Avatar

Title:जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतलाय का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False