लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतांची हेराफेरी झाली का? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक मशीनमधून मतपत्रिका बाहेर काढताना दिसतात. 

दावा केला जात आहे की, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर मतांमध्ये हेराफेरी केली जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचारी व्हीव्हीपीएटी मशीनमधून स्लिप काढून त्या काळ्या लिफाफ्यात सीलबंद करत होते.

काय आहे दावा ?

या 1 मिनिट 46 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही लोक मशीनमधून मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात गोळा केल्यानंतर सील केल्या जातात. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “#धक्कादायक EVM सोबत काय चाललंय हे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

शेनाझ नामक युजरने 13 डिसेंबर 2022 रोजी हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला होता. 

सोबतच युजरने दावा केला होता की, भावनगरमधील भाजप कार्यकर्ते आपल्या पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी व्हीव्हीपीएटी स्लिपमध्ये हेराफेरी करत आहेत.

आर्काइव्ह

या ट्विटची दखल घेत भावनगर जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी स्पष्ट केले की,  “निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतांची मोजणी झाल्यानंतर, व्हीव्हीपीएटी मशीनमधून स्लिप काढल्या जातात आणि एका काळ्या लिफाफ्यात सीलबंद केले जातात. जेणेकरून पुढील निवडणुकांसाठी व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर करता येईल. ही संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येते आणि त्याची एक प्रत स्ट्राँग रूममध्ये तर दुसरी प्रत संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) कडे पाठवली जाते.”

आर्काइव्ह 

निवडणूक आयोगाच्या सूचना

व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनांचा एक भाग आहे. 

खालील सूचनांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपीएटी (VVPAT) मशीन ड्रॉप बॉक्समधून स्लिप काढल्या जातात. मतदान केंद्रानुसार जाड काळ्या कागदाच्या लिफाफ्यात ठेऊन रिटर्निंग ऑफिसरला आयोगाने दिलेल्या द्विभाषिक गुप्त सीलसह लाल मेणाचा वापर करून ते लिफाफे सील केले जातात. 

व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला तिच प्रक्रिया दिसून येते.

804569578_4thMay2022RemovalofVVPATslipsfromVVPATaftercountingofvotes-2

फॅक्ट क्रेसेंडोने केरळ राज्यातील निवडणूक आयोग अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओमध्ये व्हीव्हीपीएटी मशीनमधून स्लिप काढण्याची आणि संग्रहित करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. या ठिकाणी कुठेही संशयास्पद गतिविधी दिसत नाही. मतदान संपल्यानंतर या मशीन्स उच्च सुरक्षिततेच्या वातावरणात संग्रहित केल्या जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केल्याप्रमाणे अशी कोणतीही क्रिया करणे शक्य नाही.”

मात्र व्हायरल व्हिडिओ भावनगरचा आहे किंवा नाही, हे अस्पष्ट आहे. या संबंधित कोणतीही अधिकृत महिती अद्याप आम्हाला आढळली नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये मतांची हेराफेरी होत नव्हती. या ठिकाणी  निवडणूक आयोगाच्या सुचनानुसार कर्मचारी व्हीव्हीपीएटी मशीन मधून स्लिप काढून ते सीलबंद करत होते. भ्रामक दाव्यासह दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ लोकसभा निवडणूच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतांची हेराफेरी झाली का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply