हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगणारा धर्मगुरू केरळमधील नसून बांगलादेशातील आहे; वाचा सत्य 

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ केरळचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळले की, व्हायरल क्लिपसोबत केला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ केरळच नाही, तर भारतातीलसुद्धा नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती हिंदूंना मुस्लिम धर्म स्विकारायला सांगत आहे.

युजर्स ही क्लिप शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नका देऊ मित्रांनो NDA म्हणजे मोदीला मतदान..!! पहा केरळ मध्ये कशा धमकवण्या सुरु आहेत..!! हिंदू जर जागा झाला नाही तर नक्कीच ही वेळ हिंदूंवर येणार आहे. वेळीच सावध व्हा. सतर्क रहा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशमधील आहे.

व्हायरल क्लिपमध्ये वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव डॉ. सय्यद इर्शाद बुखारी आहे. डॉ. सय्यद यांनी 30 एप्रिल 2021 रोजी आपल्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “डॉ सय्यद इर्शाद बुखारी यांनी बांगलादेशमधून विले नरसिंह सरस्वतींना आव्हान दिले.”

वरील व्हिडिओमध्ये 1:35 मिनिटापासून डॉ. बुखारी उत्तर प्रदेशातील यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर पैगंबरांची निंदा केल्याचा आरोप करत त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आव्हान देतात. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ केरळचा नसून बांगलादेशातील आहे. निवडणुकीच्या काळात खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगणारा धर्मगुरू केरळमधील नसून बांगलादेशातील आहे; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply