उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ मिरारोड दंगलप्रकरणातील अरोपींना ठाण्यात मारण्याचा म्हणून व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईतील मीरा रोड भागात आयोजित मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस काही युवकांना चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना अटक करून चांगलाच चोप दिला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील आहे. जुना आणि असंबधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल क्लिप शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की,“मिरा रोड वाल्याची खुप मजा आहे बघा Great गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, द लॅलनटॉपने 15 जून 2022 रोजी ही बातमी शेअर केली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मानी पैगंबर मुहम्मदवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर 10 जून 2022 रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी सहारनपूर पोलिसांनी 50 पेक्षा अधिक कथित आरोपींना अटक केले होते. तसेच सर्वप्रथम आमदार शलभ मणी त्रिपाठी यांनी जून 2022 रोजी हा व्हिडिओ ट्विटर द्वारे शेअर केला होता. ती पोस्ट आपण येथे पाहू शकता.

कथित आरोपींना लाठीने मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहारनपूर पोलिसांनी या घटनेची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.

सर्वप्रथम पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर एक व्हिडिओही जारी केला होता. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील तेच लोक मारहाण खाताना दिसत आहेत. त्यानंतर हा व्हिडीओ सहारनपूर पोलीस स्टेशनचा असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले.

पोलिसांवर टीका झाल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. 

यावरून मारहाणीचा व्हिडीओ सहारनपूर शहर पोलीस ठाण्याचा असल्याचे सिद्ध होते.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये पोलिसांनी अटक केलेले कथित आरोपी आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले लोक एकच आहे. मूळ फोटो ‘जागरण’ वृत्तातून घेण्यात आला आहे.

मीरा रोड दंगल प्रकरणात

लोकसत्ताच्या बातमीनुसार मीरा रोडमधील नया नगर परिसरात झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी बुधवारपर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 19 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ही दंगल पूर्वनियोजित नसल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. 

तसेच मीरा रोड भागातील राम मंदिरात झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या वेळी समाजमाध्यमांवर प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या अबू शेखला पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली.

मीरा रोड मधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने घरात घुसून समाजकंटकांना बाहेर काढले किंवा मीरा रोड स्टेशनला समाजकंटकांनी आग लावली, अशा प्रकारच्या दाव्यासह व्हायरल झालेले व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत भ्रामक आढळले आहेत. मुंबई पोलिसांनी अशा कोणत्याही व्हिडिओवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ मीरारोडचा नाही. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या सहारनपूर 2022 मध्ये झाल्येल्या हिंसाचारात अटक केलेल्या अरोपींचा आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ मिरारोड दंगलप्रकरणातील अरोपींना ठाण्यात मारण्याचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading