स्थलांतरित मजूरांचा हैदराबादमधील व्हिडिओ गुजरातमधील म्हणून व्हायरल, वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत या शहरात हजारो मजूर रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. हे मजूर कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात, असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरंच गुजरातमधील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुक / अक्राईव्ह

तथ्य पडताळणी 

हा व्हिडिओ गुजरातमधीलच आहे का? याचा शोध घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी या व्हिडिओतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर हैदराबाद पोलीस असे लिहिले असल्याचे दिसून आले. आपण खाली ही बाब स्पष्ट पाहू शकता.

hyd police.png

त्यानंतर युटूयूबवर हैदराबादमध्ये स्थलांतरित मजुरांनी आंदोलन केल्याचा व्हिडिओ शोधला. त्यावेळी हैदराबाद येथील टोळीचौकी भागात 3 मे 2020 रोजी स्थलांतरित मुजरांनी आंदोलन केल्याचे वृत्त सियासत या स्थानिक वृत्तवाहिनीने दिल्याचे दिसून आले.

अक्राईव्ह

निजाम न्यूज इंडिया या स्थानिक वृत्तवाहिनीने याबाबत 3 मे 2020 रोजी अधिक सविस्तर वृत्त दिले असून खालील व्हिडिओत एक मिनिट 23 सेकंद ते शेवटपर्यत ही द्दश्ये दिसून येतात. गावी परतण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

तेलंगणा टूडे या स्थानिक वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी असिफ यार खान यांनी सुध्दा हा व्हिडिओ 3 मे 2020 रोजी हा व्हिडिओ ट्विट करत परतीच्या प्रवासासाठी स्थलांतरित मजूरांनी हैदराबादमध्ये हे आंदोलन केल्याचे म्हटले आहे.

Archive

निष्कर्ष

स्थलांतरित मजुरांच्या आंदोलनाचा हा व्हिडिओ गुजरातमधील नसून हैदराबाद येथील आहे. तो गुजरातमधील असल्याचा दावा असत्य आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:स्थलांतरित मजूरांचा हैदराबादमधील व्हिडिओ गुजरातमधील म्हणून व्हायरल, वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False