जखमी शीख टेम्पो चालकाचे जुने फोटो दिल्ली दंगलीचे फोटो म्हणून व्हायरल. वाचा सत्य

पाठीवर मारहाणीचे वळ उमटलेल्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जातोय की, सीएए विरोधातील आंदोलकाला दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे हे फोटो आहेत. ही पोस्ट आतापर्यंत सुमारे 9 हजार वेळा शेयर करण्यात आली असून, गेल्या 24 तासांत सहा लाखांपेक्षा जास्त युजर्सपर्यंत ती पोहोचली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केल्यावर कळाले की, […]

Continue Reading

CAA विरोधी आंदोलनात तिरंगा जाळण्यात आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानमधील आहे. वाचा सत्य

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या दोन्ही कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी सोशल मीडियावर अनेक चुकीचे फोटो आणि व्हिडियो पसरविले जात आहेत. तिरंगा जाळत असल्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सीएए आंदोलनामध्ये भारताचा झेंडा जाळण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे […]

Continue Reading

जामियातील ‘त्या’ विद्यार्थ्याला खरंच गोळी लागली आहे. ती लाल बॉटल पाण्याची होती. वाचा सत्य

एका अल्पवयीन मुलाने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सीएए-एनआरसीच्या विरोधातील आंदोलनकर्त्यांवर 30 जानेवारी रोजी गोळी चालविली होती. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. मीडिया आणि पोलिसांच्या समक्ष झालेल्या या घटनेचे व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने पसरले. अशाच काही फोटोंमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातपाशी लाल रंगाची एक बॉटल दिसते. या फोटोंवरून दावा केला जात आहे की, या […]

Continue Reading

FACT CHECK: नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी CAA विरोधात आंदोलन केले का? वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या (NRC) विरोधातील आंदोलनांचे दिल्लीतील शाहीन बाग केंद्र बनले आहे. सर्व वयोगटातील लोक येथे दिवसरात्र बसून नव्या कायद्याचा विरोध करीत आहेत.  शहीन बाग येथील या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीसुद्धा सहभाग घेतल्याचा दावा एका फोटोद्वारे केल जात आहे. मग खरंच जशोदाबेन सीएए […]

Continue Reading

टीकाकारांना ठार मारण्याची “धमकी” देणारा हा कार्यकर्ता भाजपचा नाही. शेयर करण्यापूर्वी वाचा सत्य

नागरिकत्व सुधारित कायद्याला (CAA) विरोध करणाऱ्यांना धमकी देणारा एक व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोतील व्यक्ती भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देताना दिसतो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, धमकी देणारा हा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी करून सत्य समोर आणले. […]

Continue Reading

JNU विद्यार्थिनी आइशी घोषच्या उजव्या हाताला लागल्याचा फोटो खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वसतिगृहात गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्यात JNUSU ची अध्यक्ष आइशी घोषला मारहाण करण्यात आली होती. यामध्ये तिच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला. डोक्यातून रक्त येत असल्याचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर सध्या तिच्या डाव्या हाताला मार लागला की, उजव्या हाताला यावरून शंका उपस्थित केली जात आहे. काही […]

Continue Reading

CAA Protest: शर्टवरून बँडेज बांधलेल्या या आंदोलनर्त्यांच्या फोटो मागचे सत्य काय?

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) सुरू असलेल्या आंदोलनांनी देश ढवळून निघालेला आहे. आंदोलकांनी अनेक नव्या आणि लक्षवेधक पद्धतीने आपला विरोध व्यक्त केला आहे. अशाच एक प्रदर्शनातील फोटो सोशल मीडियावर शेयर करण्यात येत आहेत. यामध्ये आंदोलनकर्ते एका डोळ्याला पट्टी आणि हाताला बँडेज बांधलेले दिसतात. सोशल मीडियामधील अनेक युजर्सने आंदोलनकर्त्यांनी एका हिजाबवरून डोळ्याला पट्टी आणि शर्टवर बँडेज बांधल्याकडे […]

Continue Reading

FACT CHECK: अभाविपने CAA/NRC विरोधात प्रदर्शन केले का? विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात एकीकडे प्रदर्शने सुरू आहेत तर, दुसरीकडे समर्थनार्थदेखील मोर्चे निघत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक लक्ष वेधून घेणारा फोटो शेयर करण्यता येत आहे. यामध्ये भाजपाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP)  कार्यकर्ते या नव्या कायद्याविरोधात प्रदर्शन करताना दिसतात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेले कथित बॅनरदेखील ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी झळवल्याचे […]

Continue Reading

कानपूरमध्ये दगड मारणारा हा व्यक्ती मुजफ्फरनगर येथील मौलाना रजा नाहीत. वाचा सत्य

उत्तर प्रदेशमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) विरोध करणारे आंदोलक आणि पोलिसांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान असो किंवा पोलिसांचे दडपशाहीचे धोरण, दोन्हींविरोधात देशभर आवाज उठवला जात आहे. अशा तापलेल्या वातावरणात मौलाना सैयद रज़ा हुसैनी नामक व्यक्तीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, आंदोलनात दगड मारत असल्यामुळे पोलासांनी त्यांना […]

Continue Reading

नरेंद्र मोदींनी भाषणात हिटलरचे Hate Me, but Don’t Hate Germany वाक्य उचलले का? पाहा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली येथे भाषणात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधकांना उद्देशून म्हटले की, हवे तर माझे पुतळे जाळा; परंतु बस किंवा इतर सार्वजनिक संपत्तीला हानी पोहचवू नका. काही इंग्लिश मीडियावेबसाईट्सने मोदींच्या या भाषणाची बातमी देताना Hate Me, But Don’t Hate India असे शीर्षक दिले. यावरून अनेक युजर्सने या वाक्याचा हिटलरच्या एका भाषणाशी संबंध […]

Continue Reading

राजस्थानच्या आमदाराचा फोटो दिल्लीतील खोटा पोलिस म्हणून व्हायरल. वाचा सत्य

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या प्रदर्शनांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद व बळाचा वापर होत आहे. त्यामुळे दोन्हींकडून एकमेकांवर हिंसा करण्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमिवर दावा केला जात आहे की, दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पोलिसांचे कपडे घालून फिरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. काय पोस्टमध्ये? पोस्टमधील व्हिडियोमध्ये आंदोलनस्थळी एका […]

Continue Reading

भारत-बांग्लादेश सीमा म्हणून स्पेन-मोरोक्को सीमेवरील दिव्यांचा फोटो व्हायरल

सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर बांग्लादेशातून आलेल्या बेकायदा स्थलांतरितांची मुद्दा पुन्हा एकदा गरम झाला आहे. बांग्लादेशातून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी सरकारने गेल्या तीन वर्षांत भारत-बांग्लादेश सीमा पूर्णतः सीलबंद केल्याचा दावा करण्यात येत आहे. सोबत सीमेवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी दिव्यांची रोषणाई असणारा फोटो दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? भारत-बांग्लादेशच्या सीमेवर लावलेल्या […]

Continue Reading

ही मुलगी हिंदू नाव लावणारी मुस्लिम बांग्लादेशी नाही. तिचे खरंच नाव स्वाती आहे. वाचा सत्य

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (CAA) सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. अशाच एका आंदोलनात सहभागी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, “स्वाती” नामक ही मुलगी मूळात सबिहा खान नामक बांग्लादेशी मुस्लिम आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय आहे दावा? हातात CAA विरोधातील पोस्टर घेतलेली “स्वाती” […]

Continue Reading

‘त्या’ व्हायरल फोटोतील साध्या वेशातील पोलिस कर्मचारी अभाविप कार्यकर्ता नाही; वाचा सत्य

देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दिल्लीतही जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यावर त्याविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोलिसांचे जॅकेट घातलेल्या साध्या वेशातील एका तरुणाचे छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. ही व्यक्ती भरत शर्मा असून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. […]

Continue Reading