राहुल गांधी यांनी 8 जुलै रोजी मणिपुरला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधीसमोर त्यांच्या विरोधात ‘गो बॅक'च्या घोषणा देत आहेत. 

दावा केला जात आहे की, राहुल गांधी मणिपुरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्यांच्या विरोधात 'राहुल गांधी गो बॅक'च्या घोषणा दिल्या.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असून राहुल गांधीच्या विरोधात ‘गो बॅक'च्या घोषणा आसाममध्ये देण्यात आल्या होत्या.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी सुरक्षा रक्षकांसोबत दिसतात. दुसऱ्या क्लिपमध्ये काही लोक हातात ‘राहुल गांधी गो बॅक’चे पोस्टर दाखवत त्यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केले जातात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मणिपूरच्या जनतेने राहुल गांधीची केली हकालपट्टी!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा आहे.

एएनआयने हाच व्हिडिओ 21 जानेवारी 2024 रोजी ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आसाम: 'राहुल गांधी परत जा' आणि 'अन्ययात्रा'चे पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी नागावच्या अंबागन भागात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने केली.”

https://twitter.com/ANI/status/1749089407024717956

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ राहुल गांधींनी आसाममध्ये काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा आहे.

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसाठी आसाममध्ये होते, त्यावेळी संध्याकाळी उशिरा स्थानिक लोकांनी नागावच्या अंबागन भागात काँग्रेस नेते रकीबुल हुसेन आणि राहुल गांधींविरोधात निदर्शने केली होती.

लोकांनी ‘राहुल गांधी गो बॅक’ आणि ‘अन्याय यात्रा’च्या घोषणा दिल्या होत्या. याप्रसंगी सुरक्षा रक्षकांनी राहुल गांधी आणि त्याच्या सोबत असलेल्या काँग्रस नेत्यांना वाहनात बसवले. अधिक महिती येथे आणि येथे वाचू शकता.

राहुल गांधी मणिपूर दैरा

राहुल गांधी 8 जुलै रोजी मणिपूरला भेट दिली होती. भाजपशासित राज्यातील जिरीबाम, चुराचंदपूर आणि इम्फाळ या जिल्ह्यातील तीन मदत शिबिरांना भेट दिली आणि हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या दोन्ही लढाऊ जातीय गटांतील लोकांशी संवाद साधला. अधिक महिती आपण येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ मणिपूरचा नाही. व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वी आसाममध्ये न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधीच्या विरोधात ‘गो बॅक'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधीच्या विरोधात ‘गो बॅक'चा नारा देणाऱ्या लोकांचा व्हिडिओ मणिपुरचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading