उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील मदरशांचे शैक्षणिक दिनदर्शिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उतर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.  आमच्या पडताळणीत […]

Continue Reading

COVID-19: कोविडचा XBB सबव्हेरिएंट पाचपट जास्त घातक आहे का? वाचा सत्य

सुमारे एक वर्षाच्या विश्रामानंतर कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचा बीएफ-7 सब-व्हेरिएंट तर सिंगापुरमध्ये XBB सब-व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही कोरोना लाटेचा संभाव्य धोका ओळखता खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर या नव्या व्हेरिएंटविषयी एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा करण्यात येत आहे की, XBB सब-व्हेरिएंट आधीच्या […]

Continue Reading

महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’मधील गर्दीच्या नावाने ‘मराठा मोर्चा’चा जुना व्हिडिओ व्हायरल

महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी ‘हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  या मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळाला यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची ‘नॅनो’ मोर्चा अशी हेटाळणी केली.  फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर […]

Continue Reading

एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले का? पाहा या व्हिडिओचे सत्य

पंतप्रधान मोदींनी नुकतेच नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  या व्हायरल क्लिपमध्ये नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मागे ढकलताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर […]

Continue Reading

थायलंडमधील हायवेचा फोटो समृद्धी महामार्गाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये त्याचे उद्घाटन केले. तत्पूर्वी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी या लोकार्पण सोहळ्याचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये भाजप नेत्यांसह महामार्गाचा एक विहंगम फोटोसुद्धा वापरण्यात आला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून तो फोटो खरंच समृद्धी […]

Continue Reading

आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने लावलेल्या एका कथित पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलेले आहे की, भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथा सोडून आता गुजरात नमाज पठण करणार. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणी हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल होत […]

Continue Reading

व्हायरल होत असलेला गर्दीचा फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा नाही; वाचा सत्य

राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा 4 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये दाखल झाली. तेथील जलवार जिल्ह्यातील चावली येथे मोठ्या प्रमाणात लोक यात्रेत सामील झाले. यानंतर सोशल मीडियावर गर्दीचे काही फोटो व्हायरल होऊ लागले. दावा केला जात आहे की, व्हायरल होत असलेले फोटो भारत जोडो यात्रेला जमलेल्या विराट गर्दीचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

भाजप नेते परेश रावल यांचा माफी मागतानाचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षे जुना; वाचा सत्य

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी 29 नोव्हेंबर रोजी वलसाड जिल्ह्यात एका रॅलीमध्ये भाषण करताना बंगाल विषयक वादग्रस्त विधान केले होते.  “गॅस सिलेंडरचे काय करणार? बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. परेश रावल यांनी शब्दांचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत माफीसुद्धा […]

Continue Reading

स्वतःच्याच देशाविरोधात वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीला इस्रायलच्या लष्कराने गोळी मारून अपंग केले का?

इस्रायल हा देश कडव्या राष्ट्रप्रेमासाठी प्रसिद्ध आहे. याचे उदाहरण म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका जखमी महिलेचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, इस्रायलमधील एका अभिनेत्रीने इस्रायलविरोधी वक्तव्य केल्यामुळे तेथील लष्कराने तिला गोळी मारून कायमचे अपंग केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  आमच्या […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. सलग 27 वर्षे गुजरातमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराच्या आघाडीवर होते. त्यांनी सुरतमध्ये काढलेल्या भव्य रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत त्यांच्यासमोर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात घोषणा दिल्याचे ऐकू येते. दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

चीनमधील बुलेट ट्रेनचा फोटो गुजरातचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीमध्ये ‘गुजरात मॉडेल’ आणि ‘गुजरात विकास’ या दोन गोष्टींची बरीच चर्चा झाली. याचाच भाग म्हणून अनेक डझन बुलेट ट्रेन्स उभ्या असल्याचा एक डोळे दिपवून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये दाखल झालेल्या बुलेट ट्रेन्सचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

सौदी अरेबियाच्या फुटबॉल खेळाडुंना 10 कोटींची ‘रोल्स रॉईस’ मिळाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वांना चकित करत सौदी अरेबिया संघाने बलाढ्या अशा अर्जेंटिना संघाला 2-1 ने पराभूत केले. त्यामुळे लियोनल मेस्सीच्या संघावर मात करण्याची कामगिरी करणाऱ्या या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  अशातच सगळीकडे चर्चा पसरली की, सौदी अरेबियाच्या विजयामुळे आनंदून गेलेले राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी संघातील प्रत्येक खेळाडुला दहा कोटी रुपयांची आलिशान ‘रोल्स […]

Continue Reading

चार वर्षांपूर्वीचा जुना फोटो शाहरुख खान औरंगाबादमध्ये दाखल झाला म्हणून व्हायरल

अभिनेता शाहरुख खान चार वर्षांच्या खंडानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पुढील वर्षी शाहरुखचे पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पैकी ‘जवान’ सिनेमाचे औरंगाबादजवळील बिडकीन येथे चित्रिकरण सुरू आहे.  सोशल मीडियावर बिडकीन येथे शाहरुख खानच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही उत्साही चाहत्यांनी तर शाहरुख तेथे पोहचला असा फोटोसुद्धा शेअर केला […]

Continue Reading

फिफा विश्वचषकात प्रेक्षकांनी मैदानावर आग लावली का? जुना व्हिडिओ व्हायरल

वादाच्या भोवऱ्यात सापडेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेविषयी विविध दावे केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये मैदानावरील आगीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पाडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे कळले आहे. हा व्हिडिओ […]

Continue Reading