या माणसाला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. आपसातील भांडणाचा हा व्हिडियो आहे.

सुधारित नागरिकत्व विधेयकावरून देशभरात आंदोलने आणि प्रदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसेचे प्रकार घडत आहेत. अशाच तापलेल्या वातावरणात एका वयोवृद्ध व्यक्तीला काही लोक बेदम मारत असलेला व्हिडियो चिथवणीखोर दावा करून शेयर केला जात आहे. दावा आहे की, “भारत माता की जय” म्हटले म्हणून या व्यक्तीला मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा […]

Continue Reading

अपंग असल्याचे नाटक करणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडियो भारतातील नसून, पाकिस्तानमधील आहे.

अपंग असण्याचे नाटक करून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचा पर्दाफाश करणारा व्हिडियो सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती अपंग म्हणून रस्त्यावर घसरत घसरत चालताना दिसतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि चार मुलेदेखील आहेत. काही अंतर पार केल्यावर हा व्यक्ती आडोसा धरून बसून कपडे बदलतो आणि दोन्ही पायांवर चालत जातो. त्याचा हा बनाव सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. […]

Continue Reading

टाटा कंपनीच्या मीठाचा कारखाना म्हणून फेक व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

दिवाळीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांचा मोठा धोका असतो. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहुन खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. याच दरम्यान एक व्हिडियो सोशल मीडियावर लोकांना चिंतेत पाडत आहे. या व्हिडियोतून टाटा कंपनीचे मीठ किती गलिच्छरीत्या तयार केले जाते हे दाखविल्याचा दावा करण्यात येत आहेत. जमिनीवर ठेवलेले मीठ पॅकेटमध्ये भरताना यामध्ये दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. […]

Continue Reading

तिबेटमध्ये ढग जमिनीवर उतरले नव्हते. तो वाळूच्या वादळाचा व्हिडियो आहे. वाचा सत्य

निसर्ग अचाट आणि आचंबित करणाऱ्या गोष्टींना भरलेला आहे. निसर्गाचा करिष्मा कधी कसा पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. परंतु, आता मोबाईल फोन आल्यामुळे निसर्गाचे हे चमत्कार कॅमरेऱ्यात कैद करून जगभर पसरू लागले आहेत. असेच एक अनोखे दृश्य तिबेटमध्ये पाहायला मिळाल्याचे म्हटले जात आहे. तिबेटमध्ये जमिनीवर ढग उतरल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  काय […]

Continue Reading

विरारमधील साईनाथनगर पेट्रोलपंपाला भीषण आग लागली होती का? काय आहे या व्हिडियोचे सत्य

मुंबईतील एका पेट्रोल पंपाला भीषण आग लागल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. काहींना हा व्हिडियो विरार पूर्व भागातील साईनाथनगर पेट्रोल पंपाचा म्हटला आहे तर, काहींनी नालासोपारा भागातील सेंट्रल पार्क येथील पेट्रोल पंपाचे नाव घेतले आहे. हळहळ व्यक्त करताना एकाने लिहिले की, हा पेट्रोल पंप भरवस्तीत आहे. त्याला लागून अनेक दुकानं आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

राहुल गांधी केक कापत असलेला व्हिडियो मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नाही. वाचा सत्य

भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्त राहुल गांधी यांनी केक कापून डॉ. मनमोहन सिंग यांचा वाढदिवस साजरा केल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियो क्लिपमध्ये राहुल गांधी आणि डॉ. सिंग केक कापताना दिसतात. या व्हिडियोवरून काही लोक गांधी यांची प्रशंसा करत आहेत […]

Continue Reading

नागालँडमध्ये भारताचा झेंडा जाळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला का? वाचा सत्य

भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सोशल मीडियावर भारताचा झेंडा जाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना नागालँडमध्ये तिरंगा झेंड्याचा जाळून अपमान करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनीसुद्धा हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट करण्याची विनंती केली. मूळ पोस्ट येथे वाचा […]

Continue Reading

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशी घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे लोक काळजीपोटी हा व्हिडियो जास्तीतजास्त पसरवून या मार्गावरून जाणाऱ्यांना सूचित करीत आहेत. परंतु, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडियो माळशेज घाटातील नाहीच. ते कसं? त्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोचे हे फॅक्ट चेक वाचा. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर […]

Continue Reading

FAKE: डोंगरी येथील इमारत कोसळण्याचा व्हिडियो 6 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.

मंगळवारी मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना घडली. येथील तांडेल क्रॉस लेनमधील 25-बी, केसरभाई नावाची ही इमारत कोसळून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत. ही इमारत कोसळण्याचा लाईव्ह व्हिडियो म्हणून सध्या एक क्लिप झपाट्यात पसरविली जात आहे. 30 सेंकदाच्या या क्लिपमध्ये एक इमारत कोसळताना दिसते. ही […]

Continue Reading

ALERT: रस्ता वाहून गेल्याच्या व्हिडियोमुळे औरंगाबाद-जळगाव मार्ग बंद झाल्याची अफवा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई तर जलमय झाली आहे. जोरदार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली असून, दळवळणावरही परिणाम जाणवत आहे. धो धो पावसामुळे रस्ता वाहून गेल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. अनेकांनी दावा केला की, हा व्हिडियो औरंगाबाद ते जळगाव मार्गादरम्यानचा असून त्यामुळे हा […]

Continue Reading