व्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्क म्हणजे सरकारने आपले मेसेज वाचले का? वाचा सत्य

कोविड-19 या महारोगाच्या जागतिक साथीने आधीच हैराण असताना त्यात फेक न्यूजच्या तडक्याने प्रशासनाचे काम अधिक कठीण झाले आहे.  अशा पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपसंदर्भात एक जूना मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जर मेसेजखाली तीन लाल टिक्स आल्या तर समजावे की, शासनाने तुमचा मेसेज वाचला आहे आणि तुमच्यावर लवकरच कारवाई होईल, असा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

WhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

सोशल मीडियावर काही अफवा असतात ज्या ठराविक काळाच्या अंतराने पुन्हा परत येतात. अशीच एक अफवा म्हणजे सरकारने सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे आणि काय नाही याबाबत नवे नियम लागू केल्याचा मेसेज.  या फेक मेसेजमध्ये म्हटले जाते की, सरकारने नवीन संप्रेषण नियम लागू केले असून, त्याअंतर्गत सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील, सगळे मोबाईल मंत्रालयाशी जोडले जातील, […]

Continue Reading

FAKE VIDEO: हिटलर रडतानाचा तो व्हिडिओ बनावट आहे; वाचा सत्य

जर्मनीचा हुकूमशहा हिटलर भाषण देताना रडला होता, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ एडिट केलेला असून, हिटलर यामध्ये रडला नव्हता. काय आहे दावा? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये हिटलर भाषण देत […]

Continue Reading

गाड्यांवर स्लॅब कोसळल्याचा ‘तो’ व्हिडिओ मुंबईचा नसून, सौदीचा आहे; वाचा सत्य

तौक्ते चक्रीवादळाचा पश्चिम किनारपट्टीवरील अनेक राज्यांना फटका बसला. महाराष्ट्रातही किनाऱ्यालगतच्या भागाचे जोरदार वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. मुंबईत तर अनेक वृक्ष उन्मळून पडली. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर स्लॅबचा मोठा भाग कोसळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलबाहेरील हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

FAKE NEWS: ‘मंदिर चाहिए’ म्हणणाऱ्या या व्यक्तीचे निधन झालेले नाही

एका व्हिडिओमध्ये “हमें हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए” असे विधान करणाऱ्या व्यक्तीचे ऑक्सिजन न भेटल्यामुळे लखनऊमध्ये निधन झाले, अशा पोस्ट व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. सदरील व्यक्तीचे निधन झालेले नाही. काय आहे दावा? एका व्यक्तीचा फोटो शेअर […]

Continue Reading

इस्रायलने मृत भारतीय नर्स सौम्या यांचे नाव लढाऊ विमानाला दिले का? वाचा सत्य

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षामध्ये एका भारतीय नर्सचा मृत्यू झाला. मूळच्या केरळमधील या नर्सचे नाव सौम्या होते.  सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, तिला अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी इस्रायलने त्यांच्या लढाऊ विमानांना सौम्या यांचे नाव दिले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा […]

Continue Reading

उसळणाऱ्या लाटांचा हा व्हिडिओ स्पेनमधील आहे; कोकणातील नाही, वाचा सत्य

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागालासुद्धा तडाखा बसत आहे. समुद्राच्या रौद्ररुपाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो कोकणतील कुणकेश्वर किनाऱ्यावरील उसळणाऱ्या लाटांचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रतील नसून स्पेनमधील आहे.  […]

Continue Reading

ऑक्सिजन कमी झाल्यावर मनानेच होमिओपॅथी औषध Aspidosperma Q 20 घेऊ नका; वाचा सत्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा भीषण तुटवडा जाणवत आहे. अशा आपात्कालिन परिस्थितीमध्ये अशास्त्रीय आणि तद्दन खोट्या घरगुती उपयांचे मेसेज फिरत आहेत.  अशाच एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर Aspidosperma Q 20 नावाचे होमिओपॅथी औषध घेतल्यावर लगेच पातळी सुरळीत होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

कतारमधील स्टेडियमचा फोटो संघाने उभारलेले कोविड सेंटर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका भव्य वास्तूचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) उभारलेल्या 6000 बेड क्षमतेच्या कोविड सेंटरचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो भारतातील नसून कतार देशातील स्टेडियमचा आहे.  काय […]

Continue Reading

रोहित सरदाना यांचा हा शेवटचा व्हिडिओ नाही; जाणुन घ्या व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कोविडमुळे झालेल्या भयावह परिस्थितीवर कळकळीने बोलणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ रोहित सरदाना यांचा शेवटचा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलींना दत्तक देण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

कोविडमुळे आईवडिलांना गमावलेल्या दोन चिमुरड्या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणार एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन करून या मुलींना दत्तक घ्यावे, असे मेसेजमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज फेक आढळला. खुद्द महिला व बाल […]

Continue Reading

मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का? वाचा सत्य

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कठोर शब्दांत टीका केल्याचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. संघाला अतिमहत्त्व देणे आणि मोदी व शहा यांच्याकडे देश सोपविणे सर्वात मोठी चूक असल्याचे या कथित ट्विटमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ट्विट आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन […]

Continue Reading

मुंबईतील लॉकडाऊनबाबत नवीन वेळापत्रक लागू झाल्याचा ‘तो’ मेसेज फेक; वाचा सत्य

मुंबई महानगरपालिकेने 1 मेपासून लॉकडाऊनसंबंधी नवे वेळापत्रक लागू केल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये विविध अत्यावश्यक सुविधा सुरू राहण्याचा कालावधी कसा असेल याची माहिती दिलेली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे वेळापत्रक खोटे आहे. मुंबई महानगरपालिकेने […]

Continue Reading