
मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. रिना भट्टा यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली असेल तर त्याचे मराठी माध्यमांनी नक्कीच वृत्त दिले असेल म्हणून आम्ही मुंबईतील ताज हॉटेलमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली का? याचे मराठी माध्यमांनी कोणते वृत्त दिले आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त मराठी माध्यमांनी दिल्याचे आम्हाला दिसून आले नाही.
त्यानंतर आम्ही pollution free Diwali at Taj Mumbai असा इंग्रजी शब्दप्रयोग करत शोध घेतला असता अपेक्षित परिणाम मिळाला. यात द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. याच ताज बंगालमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
टाईम्स समूहाच्या नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिल्याचे आपण खाली पाहू शकता.
या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, हे मुंबईतील ताज पॅलेस हॉटेल नसून पश्चिम बंगालमधील ताज बंगाल हॉटेलमध्ये ही प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. त्याचा हा व्हिडिओ आहे.
निष्कर्ष
मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्याचा हा व्हिडिओ नसून तो ताज बंगालमधील आहे.

Title:Fact Check: मुंबईतील ताज हॉटेलमधील प्रदुषणमुक्त दिवाळीचा हा VIDEO आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
