राजस्थानमध्ये चकमकीत जखमी झालेल्या आरोपींचा व्हिडिओ खोट्या सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

पायाला प्लास्टर लावलेल्या 3 युवकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हिडिओमधील मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलीची छेड काढल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अद्दल घडवली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असून पोलिसांशी झालेल्या चकमकीदरम्यान हे […]

Continue Reading

पोलिसाने वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावर सद्ध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस कर्मचारी एका वृद्धाला बेदम मारहाण करताना दिसतो. दावा केला जात आहे की, हा घटना उत्तर प्रदेशची असून प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल घटना उत्तर […]

Continue Reading

चांदौली उत्तर प्रदेशमध्ये खरंच 300 ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या का ? वाचा सत्य

उत्तर प्रदेशच्या चांदौली शहरात एका दुकानातून 300 हून अधिक ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक स्थानिकांसमोर इव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. 2019 मध्ये उत्तर […]

Continue Reading

‘यूपीमध्ये भाजप सरकार आल्यास गुंडांचे राज्य येईल’ असे नरेंद्र मोदी म्हणाले नाहीच; वाचा सत्य

सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना म्हणतात की, “उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास दंगली, माफीया आणि गुंडांचे राज्य येईल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.  काय आहे दाव ? […]

Continue Reading

नदीत गेल्यामुळे दलित महिलेला मारहाण झाल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

नदीकाठी एका महिलेला तीन ते चार पुरुष मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही महिला दलित असून तिने नदीत आंघोळ केल्यामुळे भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला बेदमपणे मारहाण करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील मदरशांचे शैक्षणिक दिनदर्शिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उतर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.  आमच्या पडताळणीत […]

Continue Reading

मुस्लिम युवकांनी कानपुर पोलिसांवर दगडफेक केली नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

कानपूर शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कानपूर पोलिस गस्त घालत असताना दोन युवक इमारतीवरुन त्यांच्यावर दगडफेक करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे, या व्हिडिओमधील युवक मुस्लिम […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमध्ये PET परीक्षेसाठी विद्यार्थी रेल्वेला लटकून गेले का? जुना व्हिडिओ व्हायरल

नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. सुमारे 37 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेला बाहेरून लटकून जाणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील केंद्रावर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून परीक्षा देण्यासाठी जावे लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

नदीकिनारी मृतदेहाच्या विटंबनेचा हा फोटो योगी आदित्यानाथ यांच्या कार्यकाळातील नाही; वाचा सत्य 

मशिदींवरील भोग्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. आधी मशिदींवरील आणि  त्यानंतर इतर प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 11 हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले.  या कारवाईचे स्वागत करताना राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती करत ट्विट केले होते की, “उत्तर […]

Continue Reading

VIDEO: फटाक्यांवर बंदी असूनही योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडले का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमध्ये सरकारने दिवाळीदरम्यान 12 जिल्ह्यांमध्ये फटाकेबंदीचे आदेस काढले होते. तसेच फटाकेविक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांवर कडक कारवाईसुद्धा केली होती. अशाच एका कारवाईमध्ये पोलिस फटाकेविक्रेत्याला अटक करून घेऊन जात असताना त्याच्या सहा वर्षांच्या मुलीने रडत रडत याला विरोध केल्याचा व्हिडिओ बराच गाजला होता. अशा पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ शेयर करून […]

Continue Reading

वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो आयोध्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराचे गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सोशल मीडियावर आता एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो आयोध्येमधील राम मंदिराच्या बांधकामाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. हा फोटो वाराणशीमधील काशी विश्वानथ मंदिराचा आहे. काय आहे दावा?  सोशल मीडियावर एका मंदिराच्या बांधकामाचा […]

Continue Reading

Fact Check: कुंभमेळ्यातील व्हिडिओ CAA समर्थन रॅलीचा म्हणून व्हायरल. पाहा सत्य

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी  (एनआरसी) विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलने होत आहे. नागा साधू संत CAA-NRC कायद्याचे समर्थन करत असल्याचा म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । Archive तथ्य पडताळणी व्हिडियोतील की-फ्रेम्सला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च […]

Continue Reading

कानपूरमध्ये दगड मारणारा हा व्यक्ती मुजफ्फरनगर येथील मौलाना रजा नाहीत. वाचा सत्य

उत्तर प्रदेशमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) विरोध करणारे आंदोलक आणि पोलिसांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान असो किंवा पोलिसांचे दडपशाहीचे धोरण, दोन्हींविरोधात देशभर आवाज उठवला जात आहे. अशा तापलेल्या वातावरणात मौलाना सैयद रज़ा हुसैनी नामक व्यक्तीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, आंदोलनात दगड मारत असल्यामुळे पोलासांनी त्यांना […]

Continue Reading

उत्तरप्रदेश सरकारने ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावर खरंच 133 कोटी रुपये खर्च केले का? वाचा सत्य

दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या शहरात ‘दीपोत्सव 2019’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याअंतर्गत शनिवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी शरयू घाट ते राम पायडीपर्यंत अंदाजे साडेपाच लाख दिवे लावण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने दिवे लावण्याचा हा जागतिक विक्रम ठरला. लाखो दिव्यांनी उजळून निघालेल्या नदीतीरावर हजारो लोकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित […]

Continue Reading

नशेत धुंद असणाऱ्या तरुणाकडून जबरदस्तीने घेतली मुले पळवून नेल्याची कबुली. वाचा सत्य

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी संशयावरून काही लोकांना पकडून मारल्यामुळे त्यांचा बळी गेल्याचीसुद्धा घटना घडल्या आहेत. अनेकदा या हिंसक घटनांमध्ये निष्पाप लोकांचेच बळी गेले आहेत. सध्या असाच एक व्हिडियो फिरत आहे. यामध्ये खांबाला बांधलेला एक तरुण मुले पळवून किडनी विकत असल्याची कबुली देतो. या […]

Continue Reading

Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणात महिला खासदारांनी आवाज उठवला नाही का?

संसदेत 74 महिला खासदार आहेत, यातील एकही महिला खासदार उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या बाजुने उभी राहिली नाही, ही अतिशय लज्जास्पद बाब आहे, अशी माहिती Suraj Waghambare यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  उन्नाव बलात्कार प्रकरणात महिला खासदारांनी आवाज उठवला नाही का? याचा […]

Continue Reading

फोटोतील आजीबाईंनी काबाड कष्ट करून या मुलीला इन्स्पेक्टर केले का? वाचा या फोटोमागील सत्य

शेतकरी, मजूर, कामागार आणि अत्यंत गरीब परिस्थितील श्रमिक आईवडिलांनी जीवाचे रान करून आपल्या मुलांना शिकवून मोठे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या घरातील मुलं-मुली जेव्हा मोठ्या हुद्द्यावर पोहचतात तेव्हा नक्कीच त्यांचा अभिमान वाटतो. अशीच एक प्रेरणदायी घटना सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. पोलिसांच्या वर्दीतील तरुणीचा एका आजीबाईसोबतचा फोटो शेयर करून दावा […]

Continue Reading

हा फोटो बिजनौर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा नाही. वाचा सत्य काय आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील एका मदरशामध्ये पोलिसांनी छापा मारून अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या इमारतीमध्ये बंदुका कशा व कुठून आल्या हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. […]

Continue Reading