पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना रिकाम्या बादलीतून जेवण वाढण्याचे नाटक करत होते का ? वाचा सत्य

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी गुरुद्वारामध्ये रांगेत बसलेल्या लोकांना जेवण देत आहेत.

दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना रिकाम्या बादलीतून जेवण वाढण्याचे नाटक करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, मूळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना खीर वाढत होते. भ्रामक दाव्यासह फोटो शेअर केला जात आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये नरेंद्र मोदी गुरुद्वारामध्ये रांगेत बसलेल्या लोकांना वाढताना दिसतात.

फोटोमध्ये लिहिलेले होते की, चौथ्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो पण ना बादलीत अन्न, ना लाडूत अन्न, ना कोणाच्या ताटात अन्न.” (भाषांतर)

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो नरेंद्र मोदींनी 13 मे रोजी बिहारची राजधानी पाटणामधील ‘पाटणा साहिब गुरुद्वारा’ला दिलेल्या भेटीचा आहे. या ठिकाणी त्यांनी सेवादार म्हणून लंगरची सेवा केली होती.

सीएनबीसी टीव्ही 18 च्या वेबसाईटवर पंतप्रधानांनी ‘श्री हरिमंदिर पटणा साहिब गुरुद्वारा’ला दिलेल्या भेटीचा फोटो शेअर करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींनी गुरुद्वाऱ्याला भेट दिल्यानंतर ट्विट शेअर केले. ट्विट मधील व्हिडिओमध्ये गुरुद्वारामध्ये 1: 56 मिनिटानंतर आपण नरेंद्र मोदींना बादलीतून खीर वाढताना पाहू शकतो.

तसेच नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या दौऱ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. खालील व्हिडिओमध्ये 5 मिनिटानंतर पंतप्रधान रांगेत बसलेल्या लोकांना खीर देताना दिसतात.

एएनआयनेदेखील या दौऱ्याचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे.

खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर लक्षात येते की, नरेंद्र मोदींच्या हातातील बादली रिकामी नसून प्रत्यक्षात त्यामध्ये खीर होती.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूद्वाराच्या लंगरमध्ये रिकामी बादली घेऊन जेवण वाढण्याचे नाटक करत नव्हते. ते प्रत्यक्षात लोकांना खीर वाढत होते. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना रिकाम्या बादलीतून जेवण वाढण्याचे नाटक करत होते का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply