Fact Check : जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग कन्याकुमारीत आहे का?

False सामाजिक

जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग 111 फूट, नागरकोइल, कन्याकुमारी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. मन कोसम मनमे या पेजवर असाच व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग खरोखरच नागरकोइल, कन्याकुमारी या ठिकाणी आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

कन्याकुमारी येथे जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग 111 फूट शिवलिंग आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील छायाचित्र घेऊन ते रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेत world tallest shiva lingam असा इंग्रजी शब्दप्रयोग केला. त्यावेळी द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील 11 जानेवारी 2019 रोजीचे  खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार जगातील सगळ्यात उंच शिवलिंग हे केरळमधील असल्याचे दिसून आले. 

image2.png

द इंडियन एक्स्प्रेसचे सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर आम्हाला यु टुयूबवर पॉलिमर न्यूज वाहिनीचा 10 नोव्हेंबर 2019 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. या वाहिनीने दिलेल्या वृत्तातही हे केरळमधील शिवलिंग असल्याचे म्हटलेले आहे. 

Archive

निष्कर्ष

नागरकोइल, कन्याकुमारी येथील म्हणून पसरविण्यात येणारे हे शिवलिंग 111.2 फूट उंचीचे असून ते केरळमधील आहे. या व्हिडिओसोबत पसरविण्यात येत असलेली माहिती फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग कन्याकुमारीत आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False