
प्रसिध्द गायक मोहम्मद रफी साहेब यांची मुलगी मुस्तुफा परवेज यांनी किती सुंदर भजन गायले हे एकदा पहाच…अशी एक पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
सुप्रसिध्द गायक मोहम्मद रफी यांच्याविषयीही माहिती आम्ही सर्वप्रथम पाहिली. त्यावेळी त्यांना अशी मुलगी असल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. आम्ही या गायिकेचे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी या सुप्रसिध्द गायिका गीतांजली राय असल्याचे दिसून आले.
गीतांजली राय यांची जडणघडण मुंबईत झाली असून त्यांचा जन्म अमृतसर येथे झाला आहे. द आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या गुरुपोर्णिमेच्या कार्यक्रमात त्यांनी गायन केलेल्या भजनाचा व्हिडिओ त्या मोहम्मद रफी यांच्या कन्या असल्याचे सांगत व्हायरल करण्यात येत आहे. हा व्हिडिओ 5 ऑगस्ट 2013 रोजी युटूयूबवर अपलोड करण्यात आलेला आहे.
गीतांजली राय यांचे ट्विटर अकाउंट आपण खाली पाहू शकता.
त्यानंतर आम्ही मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद रफी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गीतांजली राय या आपल्या भगिनी आणि कुटूंबातील नसल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर याबाबत चुकीची माहिती पसरत असल्याचे स्पष्ट केले. मोहम्मद रफी यांना तीन मुली असून त्यांचे नाव नसरीन रफी, परवीन रफी आणि यास्मिन रफी असल्याचे दिसून आले.
त्यांच्या नातीचे नाव शबाना आहे. ती यास्मिन रफी आणि खालिद यांची मुलगी आहे.
निष्कर्ष
या व्हिडिओतील महिला ही सुप्रसिध्द गायक मोहम्मद रफी यांची मुलगी नाही. त्या गायिका गीतांजली राय आहेत. मोहम्मद रफी यांना मुस्तुफा परवेज नावाची मुलगी असल्याचेही दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : ही गायिका मोहम्मद रफी यांची मुलगी नाही
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
