Fact : विदर्भातील म्हणून चीनमधील वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

False Partly False

धानोरा येथील शेतकरी संतोष खामनकर यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यांना वाघाने ठार केल्याचा म्हणून एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. पिकविमा साक्षरता चळवळ आणि राजु ढोले यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नक्की धानोरा येथील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Vidharba Tiger claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी

धानोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला का, याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी एसएन न्यूजलाईन या संकेतस्थळावर वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याचे वृत्त आम्हाला दिसून आले. या वृतासोबत ठार झालेल्या व्यक्तीचे छायाचित्र सुध्दा दिसून आले. 

screenshot-www.snnewsline.com-2020.01.08-18_15_12 (1).png

एसएन न्यूजलाईनवरील सविस्तर वृत्त / Archive

ईटीव्ही भारतच्या (संग्रहण) संकेतस्थळावरही आम्हाला हे वृत्त, छायाचित्र आणि व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओतील व्यक्ती आणि व्हायरल व्हिडिओत दिसणारी व्यक्ती वेगळी असल्याचे आपण खाली पाहू शकता.

2020-01-08.png

त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की व्हायरल होणारा व्हिडिओ मग नेमका कुठला आहे. त्यामुळे आम्ही या व्हिडिओतील एक दृश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला युटूयूबवर चीनची अधिकृत सरकारी माध्यम असणाऱ्या सीजीटीएन या दुरचित्रवाणी वाहिनीचा व्हिडिओ दिसून आला. ही घटना पूर्व चीनमधील निंगबो येथे घडली असल्याचे या व्हिडिओ खाली दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Archive

जगभरातील प्रसारमाध्यमांनी जानेवारी 2017 मध्ये या घटनेचे वृत्त दिले असून एबीसी न्यूजने (संग्रहण) या घटनेचे वृत्त दिल्याचे आपण पाहू शकतो. 

निष्कर्ष 

विदर्भातील धानोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी संतोष खामनकर यांचा मृत्यू झाल्याची बाब खरी आहे. या माहितीसोबत पसरविण्यात येत असलेला व्हिडिओ मात्र या घटनेचा नसून तो चीनमधील तीन वर्षापुर्वी म्हणजे 2017 मध्ये घटनेचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : विदर्भातील म्हणून चीनमधील वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False