Fact : भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली नाही

False राजकीय | Political

हमीरपुर येथे भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ Avinash Owhal यांनी रणसंग्राम महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

भाजप आमदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना हमीरपुर या गावात खरंच घडली का? हे शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ नीट पाहिला. या व्हिडिओत हिमाचल परिवहन मजदुर संघ असा नामफलक आम्हाला दिसून आला. त्यामुळे हे हमीरपुर गाव हिमाचल प्रदेशातील असावे, असा कयास लावत आम्ही गूगलवर bjp mla beaten in himachal pradesh hamirpur असा शब्दप्रयोग करत शोध घेतला.

या शोधाच्या परिणामात आम्हाला जनसत्ताच्या संकेतस्थळावरील 23 जून 2018 रोजीचे एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शंकर सिंह ठाकुर असे आहे. तो हिमाचल परिवहन मजदुर संघाचा नेता आहे. त्याने महिलांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवत तो व्हॉटसअपवर व्हायरल केल्याने महिलांनी त्याला मारहाण केली. जनसत्ताप्रमाणेच ‘पंजाब केसरी’ नेही याबाबतचे अशाच स्वरुपाचे एक वृत्त प्रसिध्द केल्याचे आम्हाला दिसून आले.

https://lh3.googleusercontent.com/UT7OSvUKqP7dLcOXNoeYDG_92kzvkJNMoUnEL2BjESw73NbPm6yraEOYDFBljuDUjINxmpe1BID_88gtUdOJ9wIdsRsREUMpKlxwZ_0DQnky_w-jhYEXa09Z86oK98d2n5GqW6LfExkQY7uQSg
JanshattaPanjab Kesari
Archcive JanshattaArchive Kesari

त्यानंतर आम्ही युटयूबवरही याबाबत काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हिमाचल प्रदेशातील एका स्थानिक वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्याचे आम्हाला दिसून आले. सिटी चॅनल नावाच्या या स्थानिक वृत्तवाहिनीने या घटनेचे वृत्त देतानाच हिमाचल परिवहन मजदुर संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांची याबाबतची प्रतिक्रियाही दिली आहे. हे वृत्त आपण खाली पाहू शकता.

ARCHIVE VIDEO

याखेरीज TalentedIndia News या चॅनलनेही याबाबतचे वृत्त दिले आहे.

ARCHIVE VIDEO

‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने 1 ऑक्टोबर 2018 रोजी याबाबतचे फॅक्ट चेक केले होते. फॅक्ट क्रेसेंडोने केलेली हिंदी फॅक्ट चेक तुम्ही येथे वाचू शकता. 

निष्कर्ष

मारहाण करण्यात आलेली व्यक्ती ही भाजप आमदार नसून ती हिमाचल परिवहन मजदुर संघाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False