हुबळीतील मॉक ड्रीलचा व्हिडिओ दहशतवादी पकडल्याचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

हुबळी येथे दहशतवादी पकडण्यात आल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती डोक्याच्या मागे हात ठेवून गुडघ्यावर बसलेली दिसते. या व्यक्तीला पोलिसांनी वेढले असल्याचे दिसून येते. हुबळी येथे खरोखरच असा दहशतवादी पकडण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

हुबळी येथे दहशतवादी पकडण्यात आला आहे का, हे जाणून घेण्यासाठी हुबळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस. कामतगी यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ नुकत्याच घेण्यात आलेल्या मॉक ड्रीलचा आहे. हुबळी-धारवाड पोलिसांनी घेतलेली ही मॉक ड्रील होती. या भागात कोणताही दहशतवादी पकडण्यात आलेला नाही. हुबळी पोलीस कोणत्याही परिस्थितीसाठी सदैव सज्ज असल्याचा संदेश देण्यासाठी ही मॉक ड्रील घेण्यात आली. अशी परिस्थिती उद्भवल्यास काय करायले हवे, याची माहिती देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करणे हा उद्देशही यामागे होता. सुमारे दहा दिवसांपुर्वी ही मॉक ड्रील घेण्यात आली. 

त्यानंतर स्थानिक इंग्रजी संकेतस्थळ हुबळी टाईम्सने (संग्रहित) याबाबत दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार ही मॉक ड्रील 22 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. हुबळी टाईम्सने या मॉक ड्रीलचा सविस्तर व्हिडिओ देखील प्रकाशित केला असल्याचे दिसून आले. 

संग्रहित

निष्कर्ष 

हुबळी येथे दहशतवादी पकडण्यात आल्याचा दावा असत्य आहे. तेथे घेण्यात आलेल्या मॉक ड्रीलचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:हुबळीतील मॉक ड्रीलचा व्हिडिओ दहशतवादी पकडल्याचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False