मुंबईच्या लोखंडवाला पोलिसांच्या मॉक ड्रिलचा व्हिडिओ ; खऱ्या दहशतवाद्यांना अटक म्हणून व्हायरल

Missing Context Social

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींना पोलिस ताब्यात घेताना दिसत आहेत.

दावा केला जात आहे की, मुंबईच्या लोखंडवाला भागात पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ हा पोलिसांच्या मॉक ड्रिलचा एक भाग होता.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस दोन व्यक्तींना ताब्यात घेताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर कराताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काल मुंबईतील लोखंडवाला येथे दोन दहशतवाद्यांना अटक, कृपया शक्य तितके शेअर करा – 15/11/2025.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

तपासाची सुरुवात करताना आम्ही व्हिडिओमधील ऑडिओ नीट ऐकला. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले जाते की, “हे खरे नाही. हे फक्त दाखवले जात आहे की, त्यांना अटक केली आहे, हे फक्त पोलिस आहेत.”

यावरूनच स्पष्ट होते की व्हिडिओतील घटना प्रत्यक्ष अटकेची नाही.

फ्री प्रेस जर्नल’ने 16 नोव्हेंबर 2025 रोजी शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट देत सांगितले की, हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलचा आहे.

मूळ पोस्ट – फ्री प्रेस जर्नल

तसेच, ‘क्विर्क रिपोर्ट’ या न्यूज प्लॅटफॉर्मनेही 17 नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर करत तो मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्फोटानंतरचा इशारा

अधिक माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या मॉक ड्रिल आयोजित करण्यात आल्या होत्या.

निष्कर्ष:

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ मुंबईच्या लोखंडवाला परिसरात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलचा असून खऱ्या दहशतवाद्यांच्या अटकेचा नाही. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: मुंबईच्या लोखंडवाला पोलिसांच्या मॉक ड्रिलचा व्हिडिओ ; खऱ्या दहशतवाद्यांना अटक म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Missing Context