इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र नाही. वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय | International वैद्यकीय

जगभर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत दहा हजारहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे इटलीत झाले आहेत. त्यातच इटलीत सुरू असणारे मृत्यूचे तांडव म्हणून सध्या समाजमाध्यमात काही छायाचित्रे पसरत आहेत. असेच इटलीतील कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या शवपेट्याचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. शिवाजी जाधव यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत जगातील सर्वोत्तम 2 ऱ्या स्थानावर वैद्यकीय सेवा असलेल्या इटलीमधील हे छायाचित्र असल्याचे म्हटले आहे.

screenshot-www.facebook.com-2020.03.23-20_05_30.png

फेसबुकवरील मूळ पोस्ट 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम छायाचित्राला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता द गार्डियन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर 10 ऑक्टोबर 2013 रोजी प्रसिद्ध झालेले छायाचित्र आढळले. लैम्पेडुसा नौका दुर्घटनेतील मृतांच्या शेवपेटयांचे हे छायाचित्र असल्याचे या वृत्तातुन स्पष्ट होते. या दुर्घटनेत 360 जणांचा मृत्यू झाला होता.  इटलीमध्ये अवैध पद्धतीने आश्रय घेण्यासाठी हे लोक बोटीतून चालले होते. लॅम्पेडुसा या बेटाजवळ या बोटीला आग लागली आणि ती बुडाली. रॉबर्टो सालोमोन या छायाचित्रकाराने टिपलेले आहे. 

screenshot-www.theguardian.com-2020.03.24-14_17_14.png

द गार्डियनच्या संकेतस्थळावरील मूळ वृत्त / Archive

लॉस एंजलिस टाईम्स (Archive), न्यूयॉर्क टाइम्स (Archive) या वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांनी 9 ऑक्टोबर 2013 रोजी हे छायाचित्र वापरले असल्याचे दिसून येते. यातून हे स्पष्ट होते की, हे छायाचित्र कोरोनोग्रस्तांच्या शवपेट्यांचे नाही. इटलीमध्ये 2013 मध्ये घडलेल्या एका बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र आहे.

निष्कर्ष

इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र नाही. इटलीत 2013 साली झालेल्या बोट दुर्घटनेतील मृतांचे हे छायाचित्र आहे.

Avatar

Title:इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र नाही. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False