पुणेतील दिवे घाटाच्या रस्त्यावरील बिबट्याचा व्हिडिओ दौलताबादच्या नावाने व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

छत्रपती संभाजीनगर जवळील दौलताबाद घाटात बिबट्या दिसला, या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दौलताबादचा नाही. हा बिबट्या पुणेच्या दिवे घाटमध्ये आढळला होता.

काय आहे दावा ?

चार सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक बिबट्या वेगाने रस्ता ओलांडतांना दिसतो. 

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ दौलताबाद घाटाचा नाही.

एबीपी माझाने हाच व्हिडिओ 7 जुलै रोजी युट्यूबवर शेअर केला होता. सोबत दिलेल्या महितीनुसार हा बिबट्या पुणेच्या देव घाटात आढळला होता.

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह

साम टीव्हीच्या बातमीनुसार हा बिबट्या 5 जुलै 2024 रोजी पुण्यातील प्रसिद्ध सासवड रोडवर असलेल्या दिवे घाटात आढळला होता. सासवडकडून वडकीकडे येताना घाटाच्या उताराला वडकीपासून तिसऱ्या वळणावर बिबट्या डोंगरावरून उतरून अचानक झाडांमध्ये जाताना लोकांना दिसला. 

बिबट्या रस्ता ओलांडताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली होती. त्याच वेळेस एका अज्ञत व्यक्तीकडून हा प्रसंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला होता. तसेच या घटनेनंतर घाटामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. अधिक माहिती येथे वाचू शकता. 

या पूर्वीदेखील दिवे घाटाच्या रस्त्यावर बिबट्या आढळला होता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, बिबट्याचा व्हायरल व्हिडिओ दौलताबादचा नसून पुण्यातील दिवे घाटाचा आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पुणेतील दिवे घाटाच्या रस्त्यावरील बिबट्याचा व्हिडिओ दौलताबादच्या नावाने व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply