
अम्फान चक्रीवादळाचा देशाच्या पुर्व किनारपट्टीला मोठा फटका बसला. या वादळामुळे 106 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या वादळामुळे मान्सूनच्या प्रगती वेग मंदावला असून महाराष्ट्रात तो उशिरा दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात अम्फान वादळ हे किती भयाण होते, म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ अम्फान वादळाचा आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
अम्फान चक्रीवादळाचा हा व्हिडिओ आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी 3 मे 2019 रोजी हा व्हिडिओ न्यूज इन्फो या युटूयूब चॅनलवर अपलोड केला असल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत हा व्हिडिओ फेणी वादळाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा व्हिडिओ फेणी वादळाचाच असल्याचे युटूयूबवर अनेक ठिकाणी दिसून येते. 3 मे 2019 रोजी हा व्हिडिओ अनेकांची अपलोड केल्याचे दिसून येते. या व्हिडिओचे नेमके ठिकाण मात्र सांगण्यात आलेले नाही.
निष्कर्ष
अम्फान चक्रीवादळाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. फेणी चक्रीवादळाचा हा व्हिडिओ असून तो मे 2019 मधील आहे.

Title:अम्फान वादळाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ जुना; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
