व्हायरल व्हिडिओतील ‘मुस्लिम घरात हिंदू मुलीला मारहाणीचा’ दावा खोटा; वाचा सत्य 

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

एक व्यक्ती महिलेला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मारहाण करणारा व्यक्ती मुस्लिम असून पीडित महिला त्याची हिंदू पत्नी आहे. सोशल मीडिया युजर्स हा व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’शी जोडून शेअर करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील आरोपी आणि पीडित महिला जन्मजात मुस्लिम दाम्पत्य असून यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला अमानुषपणे लाथा मारताना दिसतो तर बाजुला उभी असलेली महिला पीडितेचा बचाव करताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुस्लिम घरांमध्ये हिंदू मुलींची ही अवस्था असते आपल्या हिंदू समाजातील मुलींना चार दिवसांच्या चांदण्यानंतर एक अंधारी रात्र… हे सत्य समजावे आणि आपल्या बहिणी व मुलींचे डोळे उघडावेत यासाठी हे त्यांना दाखवले पाहिजे. अशा मुली प्रेमासाठी आपल्या आई-वडिलांना सोडून देतात; त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही, त्यांना ते समजत नाही. आज त्यांना आपल्या निर्णयाचा किती पश्चात्ताप होत असेल. ज्याने हा व्हिडिओ बनवला आहे, त्याचे आभार. जर त्याने व्हिडिओसोबत ठिकाण किंवा पत्ता दिला असता, तर त्याला पकडायला जास्त वेळ लागला नसता. व्हिडिओ पाहिल्यानंतर, कृपया तो तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून तो लवकरात लवकर पकडले जाईल आणि या मुलीला न्याय मिळेल !”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील हापुड शहरातील आहे.

इंडिया न्यूज यूपी/यूके नामक इंस्टग्राम पेजने हाच व्हिडिओ गेल्या वर्षी 19 जून 2025 रोजी शेअर केला होता.

व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, हापुडमध्ये पतीने पत्नीला निर्दयपणे मारहाण केली. 

तसेच ही पोस्ट हापुड पोलिसांना टॅग केलेली दिसते.

खंडन

भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हापुड पोलिसांनी 26 जून 2025 रोजी ट्विटरवरून या दाव्याचे खंडन केले.

पोस्टमधील कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “एका मुस्लिम दांपत्यामधील भांडणाला हिंदू-मुस्लिम मुद्दा ठरवून सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह पसरवले जात आहे.”

तसेच ग्राफिकमध्ये स्पष्ट केले आहे की, “संबंधित महिलेला मारहाण करणारा व्यक्ती तिचा पती असून हे दोघेही जन्मतः मुस्लिम आहेत. या प्रकरणी त्या वेळी हापुड नगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपपत्र माननीय न्यायालयात सादर करण्यात आले आहे. सध्या पती-पत्नी परस्पर संमतीने एकत्र राहत आहेत.”

पुढे, आम्ही हापुड़ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नरेंद्रन यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओ लव्ह जिहाद नाही तर कौटुंबिक वादाचे प्रकरण आहे. या घटने नंतर पीडित महिलेने 5 जानेवारी, 2025 रोजी हापूर पोलिस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. काही काळानंतर जोडप्यामधील वाद मिटला आणि सध्या ते ते एकत्र राहत आहेत.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ लव्ह जिहाद नाही तर एका जन्मजात मुस्लिम दांपत्यामधील कौटुंबिक वाद दर्शवतो. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक, इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: व्हायरल व्हिडिओतील ‘मुस्लिम घरात हिंदू मुलीला मारहाणीचा’ दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *