
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्दायरल होत आहे. ज्यामध्ये रात्रीच्या वेळी एक व्यक्ती रस्त्यावर झोपलेला असताना त्या ठिकाणी एक वन्य प्राणी येतो आणि त्याला इजा न पोहचवता निघून जातो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ गुजरातमधील काठियावाड भागातील आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ खरा नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI तंत्राद्वारे तयार केलेला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक व्यक्ती दुकानाबाहेर झोपलेला असताना तेथे एक वन्य प्राणी येतो आणि त्या व्यक्तीचा वास घेऊन त्याला नुकसान न पोहचवता निघून जाताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “गुजरातच्या काठियावाड येथे रात्री देशी पौवा पिवून एक माणूस झोपला होता.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ खरा नाही.
अँटोनियो चावेझ नामक अकाउंटने ह्याच व्हिडिओचा स्क्रीनशॉट 8 जून रोजी ट्विटरवर शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हा व्हिडिओ एआयद्वारे तयार केलेला आहे.”
मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
पुढे मासिमो नामक ट्विटर पेजने हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.
ट्विटरवर शेअर केल्याचे आढळले. कॅप्शनमध्ये ‘theworldbeasts-d4x, ai’ असे लिहिले आढळले.
मूळ – ट्विटर
हा धागा पकडून ‘theworldbeasts-d4x’ सर्च केल्यावर ‘द वर्ल्ड बीस्ट्स’ नामक युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळला.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्पष्ट केले आहे की, “हा व्हिडिओमधील दृष्य आणि ध्वणी डिजीटली तंत्राद्वारे तयार करण्यात आलेले आहेत.”
पुढील तपासात या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ प्रमाणे AI तंत्राद्वारे तयार केलेल्या प्रण्यांचे अनेक क्लिप्स आढळल्या.
शिवाय, काही एआय डिटेक्टर टूल्सनीदेखील व्हायरल व्हिडिओ एआय-जनरेटेड असल्याची पुष्टी केली.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ खरा नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI तंत्राद्वारे तयार केलेला आहे. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:गुजरात विमान अपघात म्हणून राजस्थानमधील आगीचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
