दुर्गा पूजा पंडालचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार असून सध्या सर्वत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष साजरा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आयोध्येतील राम मंदिराचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रमक आहे. विद्युत रोषणाई केलेले आयोध्येतील राम मंदिर नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केलेली दिसते आणि लोक ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आहेत.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “राम मंदिर येथील विद्युत काम पूर्ण.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर चंदन एक्सप्लोरर्स नावाच्या चॅनलने युट्यूबवर याच मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ 21 ऑक्टोबर 2023 रोजी आपलोड केल्याचे आढळले. व्हिडिओसोबत माहिती दिली की, हा व्हिडिओ कोलकाता शहरातील आहे. तेथील दुर्गा पूजेच्या पंडालाचा हा व्हिडिओ आहे.
तसेच खालील व्हिडिओमध्ये 4 मिनिट 1 सेकंदावर देवीची मूर्ती दिसते.
हा धागा पकडून आधिक सर्च केल्यावर कळाले की, या वर्षी कोलकातामध्ये संतोष मित्र चौक या ठिकाणी नवरात्री निमित्त दुर्गा पंडाल बांधताना आयोध्येतील राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 16 ऑक्टोबर रोजी या ‘राम मंदिर’-प्रेरित दुर्गा पूजा पंडालचे अनावरण केले होते.
मूळ पोस्ट – इंडिया टुडे
तसेच तपन मेस्त्री नावक युजरने देखील या दुर्गा पंडालवर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.
अद्याप राम मंदिराचे काम अपूर्णच
नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी भव्य सोहळ्याची माहिती देताना सांगितले की, “सध्या गर्भगृह आणि राम मूर्ती तयार आहेत, मात्र संपूर्ण मंदिराच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागू शकतात.” अधिक महिती आपण येथे वाचू शकतात.
तसेच इंडिया टुडेने आपल्या युट्यूब चॅनल राम मंदिराचा व्हिडिओ शेअक केला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, राम मंदिराच्या इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
या आधीदेखील नागपुरच्या कोराडीमधील रामायण सांस्कृतिक केंद्रचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने व्हायरल झाला होता. त्याचे फॅक्ट-चेक आपण येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. नवरात्री दरम्यान कोलकाता शहरात राम मंदिराचा देखावा असणाऱ्या दुर्गा पंडालचा तो व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:दुर्गा पूजा पंडालचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False