केरळमध्ये गर्दीत वडिलांसाठी रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल
लहान मुलाचा रडतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, केरळमध्ये शबरीमला यात्राते एका लहान हिंदू मुलाला पोलिसांनी गुन्हेगारासारखे अटक केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओसोबत केला दावा खोटा आहे. हा मुलगा हरवला होता. त्यामुळे तो रडत होता.
काय आहे दावा ?
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, केरळमधील हिंदूची अवस्था, लहान मुलांना गुन्हेगारासारखा अटक करत आहेत.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील पोलिसांसमोर हात जोडून ओरडणारा मुलगा आपल्या वडिलांना शोधत होता.
‘एशियानेट न्यू’च्या बातमीनुसार ही घटना केरळच्या निलक्कल या ठिकाणी घडली होती.
‘एशियानेट न्यू’ने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. हा लहान मुलगा बसमध्ये बसलेला दिसतो. वडिल न दिसल्याने तो घाबरतो आणि रडत रडत वडिलांना आवाज देतो. पोलीस त्या मुलाची समजूत काढत आहेत. काही वेळेनंतर त्या मुलाला त्याचे वडिल दिसतात आणि त्याचे रडणे थांबते.
फॅक्ट क्रेसेंडोने शबरीमला सर्कल इन्स्पेक्टर महेश यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हिडिओमध्ये दिसणारी बस पोलिसांची गाडी नव्हती. ती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आहे. बसमध्ये बसलेल्या मुलाचे वडिल खाली दुकानात होते. बस सुरू झाल्यानंतरही ते बसमध्ये न आल्यामुळे हा मुलगा घाबरला आणि रडू लागला. खिडकीतून बाहेर पाहत तो रडत रडत त्याच्या वडिलांना आवाज देऊ लागला. हे पाहून पोलिसांनी त्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलाचे वडिल परत आल्याने तो शांत झाला. त्यामुळे या मुलाला पोलिसांनी अटक केल्याचा दावा खोटा आहे.”
या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शबरीमला मंदिरात सुधारित समन्वय आणि गर्दी व्यवस्थापन उपायांचे आवाहन केले.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. लहाना मुलाला पोलिसांनी अटक केले नव्हते. गर्दीत वडिल दिसत नसल्याने रडणाऱ्या मुलाला पोलिस धीर देत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:केरळमध्ये गर्दीत वडिलांसाठी रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल
Written By: Sagar Rawate
Result: Misleading