
न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी नुकतेच जाहीर केले. न्यूझीलंडमध्ये कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण नसल्याने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंडमधील शेवटचा रुग्ण बाहेर पडल्यावर कोरोना वॉर्ड बंद करण्यात आल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडमधील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
न्यूझीलंडमधील शेवटचा रुग्ण बाहेर पडल्यावर कोरोना वॉर्ड बंद करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी VisitItaly Community असा उल्लेख या व्हिडिओवर करण्यात आला असल्याचे दिसून आले. त्यानंतर VisitItaly Community असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी VisitItaly हे संकेतस्थळ दिसून आले. हे संकेतस्थळ इटलीतील पर्यटन स्थळांविषयी, खाद्यसंस्कृतीविषयी मार्गदर्शन करणारे पर्यटनस्थळ असल्याचे दिसून आले. त्यानंतर या संकेतस्थळाच्या फेसबुक पेजलाही भेट दिली. त्याठिकाणी 3 जून 2020 रोजी इटली पर्यटकांसाठी खूले करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून इटलीतील सध्यस्थिती दर्शविणारे विविध व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आले आहे. यात इटलीतील काही ठिकाणी कोविड 19 च्या रुग्णांची संख्या घटल्याने काही रुग्णालयातील कोविड 19 वॉर्ड बंद करण्यात आल्याचे काही व्हिडिओ देखील आहेत. यात 8 जून 2020 रोजी पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली लिहिले आहे की, इटलीतील बॅसिलिकाटा प्रांतातील मटेरा रुग्णालयातील कोरोना व्हायरसचा वॉर्ड बंद करण्यात आला आहे. हा तोच व्हिडिओ आहे जो समाजमाध्यमात इटलीचा म्हणून व्हायरल होत आहे.
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ न्यूझीलंडमधील नसून इटलीतील बॅसिलिकाटा प्रांतातील मटेरा रुग्णालयातील कोरोना व्हायरसचा वॉर्ड बंद करण्यात आल्याचा आहे.
निष्कर्ष
न्यूझीलंडमधील शेवटचा रुग्ण बाहेर पडल्यावर कोरोना वॉर्ड बंद करण्यात आल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे.

Title:न्यूझीलंडमधील कोरोना व्हायरसचा शेवटचा रुग्ण सोडल्यानंतरचा म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ इटलीतील; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
