इसिसच्या कैदेतून मुलींना सोडविण्याचा सीरियामधील व्हिडिओ भारतीय लष्कराच्या नावाने व्हायरल

दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भारतीय लष्कराने बांग्लादेशमध्ये इसिसच्या कैदेतून 38 हिंदू मुलींना सोडविले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा नाही. हा व्हिडिओ सीरियातील आहे.  काय आहे […]

Continue Reading

व्हिडिओ गेमची क्लिप भारतीय लष्कराचे आधुनिक वाहतूक तंत्रज्ञान म्हणून व्हायरल; वाचा सत्य

रॉकेट घेऊन जाणाऱ्या ट्रकला पूराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्यासाठीचे नवे तंत्रज्ञान दाखवणारी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ भारतीय लष्कराने विकसित केलेल्या नवीन शस्त्रवाहतूक तंत्रज्ञानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणअंती कळाले की, व्हायरल क्लिप एका व्हिडिओ […]

Continue Reading

सीरियातील हेलिकॉप्टर स्फोटाचा व्हिडिओ बिपिन रावत यांच्या निधनाचा सांगत व्हायरल

भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे या महिन्याच्या सुरूवातील हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. अशाच एका क्लिपमध्ये हवेत गटंगळ्या खाणाऱ्या पेटलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो बिपिन रावत यांच्या अपघाताचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

सैनिकांशी हुज्जत घालणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ नागालँडमधील नाही; तो तर आहे कोलंबियातील

भारतीय सैन्याच्या एका गस्ती पथकाने 4 डिसेंबर रोजी नागालँडमध्ये मजुरांच्या एका गटावर केलेला गोळीबार आणि त्यानंतर सामान्य नागरिक व सैन्यात झालेल्या झटापटीत 13 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. सैन्याने हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते; पण स्थानिक नागरिकांनी सैन्याचा हा दावा फेटाळून लावला होता. यानंतर सोशल मीडियावर सैनिक आणि सामान्य लोक यांचा शेतात हुज्जत […]

Continue Reading

अरुणाचलमध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा जुना व्हिडिओ बिपिन रावत यांच्या अपघाताचा म्हणून व्हायरल

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर कोसळून बुधवारी मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो म्हणून अनेक जुने व असंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये दुर्गम भागात हेलिकॉप्टर उतरताना कोसळताना दिसते. यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ जनरल बिपिन […]

Continue Reading

व्हिडिओ गेममधील क्लिप भारतीय सैन्याचा POK वरील हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केल्याच्या बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने 19 नोव्हेंबर रोजी दिली. त्यावरून विविध मीडिया वेबसाईट्स, वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांनी या कथित हवाई हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली. परंतु, नंतर भारतीय सैन्याने या सर्व बातम्यांचे खंडन करीत अशी काही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सोशल मीडियावर पीओकेवरील या कल्पित हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून […]

Continue Reading

Coronavirus: भारतीय सैन्याने राजस्थानमध्ये दोन दिवसांत 1000 बेडचे हॉस्पिटल उभे केले का? वाचा सत्य

भारतीय लष्कराच्या मदतीने राजस्थानमध्ये एक हजार  बेड व शंभर व्हेंटिलेटर असणारे रुग्णालय केवळ दोन दिवसांत तयार करण्यात आले, अशा दाव्यासह काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. यात म्हटलेय की, चीनमध्ये कोरोनासाठी दहा दिवसांत हॉस्पिटल बांधले होते. भारतीय लष्काराने दोनच दिवसांत ही कामगिरी करून दाखविली. फॅक्ट क्रेसेंडोने याची तपासणी केली असता हा दावा खोटा […]

Continue Reading

पाकिस्तानी सैनिकांनी पांढरा झेंडा घेऊन भारताकडे समर्पण केले का? शेयर करण्यापूर्वी हे वाचा

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव सुरू असताना सोशल मीडियावर याविषयी विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. यापैकी एक म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांसमोर समर्पण केल्याचा फोटो फिरवला जात आहे. कथितरीत्या हातात पांढरा झेंडा घेऊन काही पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर हार मानल्याचा दावा या फोटोसोबत केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा – […]

Continue Reading

Fact Check : कुर्दिश मुलींचा फोटो देश की बेटिया म्हणून व्हायरल

आज पाहूया आपल्या देशातील या मुलींसाठी कोण जय हिंद लिहितं, अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पंकज बळी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी या फोटोला सत्य मानत त्याखाली जय हिंद म्हटले आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  या मुली खरंच भारतीय लष्करात आहेत का? असल्यास […]

Continue Reading