Fact : ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची घेतलेली ही मुलाखत जुनी

Mixture/अर्धसत्य राजकीय | Political सामाजिक

(छायाचित्र सौजन्य : सन टीव्ही)

चांद्रयान २ आणि विक्रम लँडरबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची मुलाखत घेतली, अशी माहिती Loksatta ने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. ‘सन टीव्ही’ने खरोखरच अशी मुलाखत घेतली का, ती घेतली असल्यास कधी घेतली, त्याचा चांद्रयान 2 आणि विक्रम लँडरशी काय संबंध आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

लोकसत्ता / Archive
तथ्य पडताळणी 

डॉ. के. सिवान यांनी सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीला खरोखरच अशी मुलाखत दिली आहे का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला. या परिणामात swarajyamag.com या संकेतस्थळानेही अशा स्वरुपाचे वृत्त दिल्याचे दिसून येते. 

swarajyamag.com / Archive

हिंदूस्थान टाईम्सनेही या घटनेबाबतचे वृत्त दिल्याचे दिसून येते. हे वृत्त आपण खाली पाहू शकता. या वृत्तातुनही ही मुलाखत कधी घेण्यात आली हे स्पष्ट होत नाही.

हिंदूस्थान टाईम्स / Archive 

त्यानंतर आम्हाला ‘सन टीव्ही’ने 29 जानेवारी 2018 रोजी डॉ. के. सिवन यांची घेतलेली मुलाखत दिसून आली. यातून हे स्पष्ट झाले की, ‘सन टीव्ही’ने सिवन यांची घेतलेली ही मुलाखत दीड वर्ष जुनी आहे. आपण ही मुलाखत खाली पाहू शकता. 

यातुन हेही स्पष्ट झाले की, ही मुलाखत जुनी असून ती नवी असल्याचे भासवत पसरवली जात आहे. ही मुलाखत जुनी असल्याचे स्पष्ट करणे गरजेचे आहे. या मुलाखतीत विक्रम लॅंडरबाबत कोणता ही स्पष्ट उल्लेखही दिसून येत नाही. त्यामुळे या पोस्टमध्ये देण्यात असलेली माहिती दिशाभूल करणारी आहे.

निष्कर्ष 

‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची घेतलेली ही मुलाखत दीड वर्ष जुनी आहे. ही मुलाखत नुकतीच घेण्यात आलेली नाही. याचा कोणताही स्पष्ट उल्लेख या पोस्टमध्ये नसल्याने याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. ती नुकतीच घेण्यात आलेली मुलाखत म्हणून समाजमाध्यमात पसरत आहे. विक्रम लँडरचाही या मुलाखतीत कोणताही स्पष्ट उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे फ्रॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे. 

Avatar

Title:Fact : ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची घेतलेली ही मुलाखत जुनी

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture