
या गाईची किंमत 12 कोटी रुपये आहे. ही गाय प्रतिदिन जवळपास 100 लीटर दुध देते. ही पुंगनुर गाय आहे. केवळ या गायीच्या दुधानेच तिरुपतीत देवाला अभिषेक होतो. या गाईला पाहणे अतिशय शुभ मानले जाते, अशी माहिती देत विनय अरोलकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अशीच माहिती देत लेक-माहेरचा कट्टा या पेजने एक फोटो पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
पुंगनुर गाय खरोखरच प्रतिदिन जवळपास 100 लीटर दुध देते का, या गाईची किंमत 12 कोटी रुपये आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील स्क्रीनशॉट घेऊन तो रिव्हर्स इमेज केला. अपेक्षित परिणाम न मिळाल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. पुंगनूर गायचे वैज्ञानिक नाव Bos Taurus असल्याचे दिसून आले. या गायीच्या भारतीय प्रजातीची माहितीही या ठिकाणी दिसून आली. प्रतिदिन जवळपास 100 लीटर दुध देते का, या गाईची किंमत 12 कोटी रुपये असल्याचे मात्र आम्हाला कुठेही दिसून आले नाही. त्यानंतर द लंलनटॉप या हिंदी संकेतस्थळाने दिलेली माहिती दिसून आली. यात स्पष्ट करण्यात आले की, ही गाय केवळ 3 ते 4 किलो लीटर दुध देते. या गायीच्या वंशाच्या एक हजार गायी सध्या भारतात आहेत. या एका गायीची किंमत एक लाखाच्या आसपास आहे.
तिरुपती तिरूमल्ला देवस्थानच्या संकेतस्थळालाही आम्ही भेट दिली. याठिकाणी एका ट्रस्टच्या माध्यमातून गोरक्षणाचे काम करत असल्याचे दिसून आले.
या व्यतिरिक्त काही पुजारी एका गायीची पुजा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा व्हिडिओ पुंगनूर गायीचा नसून पांढऱ्या रंगाच्या गाया या ऑगोले जातीच्या आहेत. भुऱ्या रंगाच्या गाया या गीर जातीच्या आहेत, अशी माहिती तिरुपती तिरुमल्ला देवस्थानचे डेअरी फार्मचे संचालक हरनाथ रेड्डी यांनी इंडिया टुडेला दिली आहे. या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, तिरुपती तिरुमल्ला देवस्थान पुंगनूरच नव्हे तर अन्य जातीच्या गायीच्या दुधाचाही वापर करते. पुंगनूर गायी केवळ 3 ते 4 लीटरच दुध देते. तिची किंमतही 12 कोटी नसून एक लाखाच्या आसपास आहे.
निष्कर्ष
तिरुपती तिरुमल्ला देवस्थान पुंगनूरच नव्हे तर अन्य जातीच्या गायीच्या दुधाचाही वापर करते. पुंगनूर गायी केवळ 3 ते 4 लीटरच दुध देते. तिची किंमतही 12 कोटी नसून एक लाखाच्या आसपास आहे. पुंगनूर गायीच्या नावाने अन्य जातीच्या गायीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. त्यामुळे या पोस्टमधील माहिती असत्य आहे.

Title:Fact Check : तिरुपती मंदिरात दुधाचा पुरवठा करणार्या गाईबद्दल करण्यात येणारे दावे किती खरे
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
