
पालघर जिल्ह्यातील साधूंच्या खूनप्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करणारे प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बलसारा यांचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बसेरा यांचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
हे छायाचित्र प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बलसारा यांचे आहे का? हे जाणून घेण्यासाठी ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात kahankar या ब्लॉगवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील प्रसिद्ध प्राध्यापक व दिग्दर्शक के. पी. जयशंकर आणि अंजली मॉन्टेरो आहेत. त्यांनी 1996 मध्ये पालघरमधील आदिवासींवर बनविलेल्या एका वृत्तचित्राची माहितीही या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर डेक्कन क्रॉनिकल या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 19 डिसेंबर 2018 रोजी प्रसिध्द केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तातही हे दिग्दर्शक के. पी. जयशंकर आणि अंजली मॉन्टेरो असल्याचे म्हटले आहे.

डेक्कन क्रॉनिकलमधील सविस्तर वृत्त / Archive
त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संकेतस्थळावर असलेली प्राध्यापक के. पी. जयशंकर आणि अंजली मॉन्टेरो यांची माहिती दिसून आली.

TISS च्या संकेतस्थळावरील माहिती / Archive

TISS च्या संकेतस्थळावरील माहिती / Archive
अंजली मॉन्टेरो आणि के. पी. जयशंकर यांच्या वैयक्तिक संकेतस्थळावरही त्यांची सविस्तर माहिती असल्याचे दिसून येते. अंजली मॉन्टेरो आणि के. पी. जयशंकर यांना या असत्य माहितीमुळे जीवे मारण्याची धमकी येत असल्याने त्यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
निष्कर्ष
पालघरमधील प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बलसारा यांचे म्हणून व्हायरल होत असलेले छायाचित्र हे प्राध्यापक व दिग्दर्शक अंजली मॉन्टेरो आणि के. पी. जयशंकर यांचे आहे. ते असत्य माहितीसह समाजमाध्यमात पसरत आहे.

Title:पालघर प्रकरणात TISS च्या दोन प्राध्यापकांचा फोटो असत्य माहितीसह व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
