छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे छायाचित्र म्हणून जोधपुरच्या महाराजांचा फोटो व्हायरल 

False राजकीय | Political

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपण दोन फोटो पाहू शकतो. पहिल्या फोटोमध्ये आपण नेहमी पाहत असलेला शिवाजी महाराजांचा छायाचित्र दिसते, तर दुसरीकडे एक व्यक्ती हातात तलवार घेऊन उभी दिसते. 

दावा केला जात आहे की, दुसऱ्या फोटोमध्ये दाखवलेला फोटो शिवाजी महाराजांचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हे छायाचित्र जोधपुरचे महाराज जसवंत सिंग दुसरे यांचे आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये एका फोटोमध्ये आपण नेहमी पाहत आलेलो शिवाजी महाराज दिसतात, तर दुसऱ्या फोटोमध्ये एक व्यक्ती हातात तलवार घेऊन उभा असलेला दिसतो.

युजर्स हे दोन्ही फोटो शेअर करताना करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आपल्या देशातील बॉलीवूड दिग्दर्शकही वास्तव दाखवत नाहीत.” (हिंदी भाषांतर)

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही.

बीबीसीने एका आर्टिकलमध्ये भारतातील जुना छायाचित्र दाखलण्यात आले होते. त्यामध्ये व्हायरल फोटोदेखील आढळला. फोटोसोबत दिलेल्या महितीनुसार हे जोधपुरचे महाराज जसवंत सिंग दुसरे असून हे छायाचित्र 1877 मध्ये काढण्यात आले होते.

शिवाजी महाराजांचे खरे छायाचित्र

छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधली. वा. सी. बेंद्रे हे सुप्रसिद्ध इतिहासकार असून त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विषयी त्यांनी संशोधन करून योग्य निष्कर्ष प्रसिद्ध केले. 

सुरतचे डच गव्हर्नर वॉन व्हॅलेंटाइन यांनी 1664 मध्ये शिवाजी महाराज आणि इतर राजपुत्रांची चित्रे तयार केली होती. युरोपमधील संशोधनादरम्यान बेंद्रेंना ही चित्रे सापडली आणि त्यांनी ती 1933 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित केली. अधिक महिती आपण येथे आणि येथे वाहू शकता. 

त्या पैकी शिवाजी महाराजांचे प्रकाशित केलेले चित्र आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही. हे छायाचित्र जोधपुरचे महाराजा जसवंत सिंग दुसरे यांचे आहे. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे छायाचित्र म्हणून जोधपुरच्या महाराजांचा फोटो व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply